जुलै २०११ पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET तून सूट देण्यासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री मा. धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण विभागाला सूचना

जुलै २०११ पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET तून सूट देण्यासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री मा. धर्मेंद्र प्रधान यांनी  केंद्रीय शिक्षण विभागाला सूचना केल्याची बातमी आलेली आहे. 
   विविध राज्यातील खासदार महोदयांनी यासाठी संसदेत प्रश्न उपस्थित केले होते आणि मा. केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांची भेट घेऊन पत्र सुद्धा दिले होते.
  *_भविष्यात या संबंधाने अनुकूल निर्णय होईल अशी अपेक्षा असून सर्वांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत._*
   TET च्या गंभीर विषयावर देशातील विविध राजकीय पक्षाच्या सन्मा. लोकप्रतिनिधींनी, खासदार व आमदार महोदयांनी शिक्षकांच्या बाजूने घेतलेली भूमिका आणि केवळ प्रसिद्धी लोलूप न राहता प्रामाणिकपणे शिक्षकांच्या बाजूने चळवळ उभी करणाऱ्या शिक्षक संघटना व TET साठीच्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या समस्त शिक्षक बांधवांमुळे हा विषय ऐरणीवर आला आहे. 
   *TET संबंधाने विशेष प्रयत्न करणारे सन्मा. लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकारी, चळवळीत सहभागी होणारे शिक्षक या सर्वांप्रती जाहीर आभार...!*
    *_लढ़ेंगे.‌‌.. जितेंगे.._*
            विजय कोंबे 
            राज्याध्यक्ष 
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

Post a Comment

0 Comments