जा.क्र.स.शि./संप्रो/33/२०२५.
प्रति,
मुख्याध्यापक (प्राथमिक), जि.प./नपा/मनपा/शासकीय / खाजगी अनुदानित/अशंतः अनुदानित खाजगी विनाअनुदानित/स्वयंअर्थसहायित शाळा,
जिल्हा नाशिक.
विषय- ५/२०२५ सुमोटो मध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मुख्याध्यापक यांना नोडल अधिकारी नियुक्त करणेबाबत..
संदर्भ- मा.आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील पत्र आस्था-क/टे.क्र.प्राथ/शा.प.अ./२०२५ ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णय क्र. मुसपंअ-२०२५/प्र.क्र.१५२, दिनांक ०६/०८/२०२५.
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये दि.७/११/२०२५ रोजी झालेल्या सुनावणीअंती मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार भटक्या जनावरांमुळे मानवाच्या दैनंदिन जीवनात होणारा उपद्रव तसेच मानव व श्वान संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर निर्देशान्वये जिल्हयातील सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यमांच्या प्राथमिक/जि.प./मनपा शाळांचे मुख्याध्यापक यांना जिल्हास्तरावरुन नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.
नियुक्त नोडल अधिकारी तथा मुख्याध्यापक यांनी संदर्भिय पत्राचे अवलोकन करुन सुमोटो याचिका निर्देशानुसार कार्यवाही करावी.
(सरोज जगताप) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद नाशिक
प्रत माहितीस्तव सविनय सादर
मा. विभागीय शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग नाशिक.
प्रत कार्यवाहीस्तव
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व) व प्रशासन अधिकारी, मनपा नाशिक व मालेगाव. /- आपल्या अधिनस्त सर्व प्राथमिक शाळांमध्ये संदर्भिय पत्रानुसार कार्यवाही करुन घ्यावी.
0 Comments