जिल्हा परिषद शाळांचे विज देयक ग्रामपंचायतने भरणेबाबत.जिल्हा परिषद चंद्रपूर दि.२१/०१/२०२६

दिनांक :- 21/01/2026

प्रति,
ग्राम विकास अधिकारी
ग्राम पंचायत (सर्व) पंचायत समिती, चंद्रपूर

विषय- जिल्हा परिषद शाळांचे विज देयक ग्रामपंचायतने भरणेबाबत.
संदर्भ:- मा. शिखणाधिकरी (प्राथ), जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचे पत्र क्र. शिक्षण/साशिअ/370/2025 दिनांक 29/12/2025.

उपरोक्त विषयान्वये मा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी वरील संदर्भान्वये जिल्हा परिषद शाळांमध्ये LED, TV., Projector, Computer असल्यामुळे शाळांमधील विज कनेक्शन सुरळीत कार्यान्वित असणे अनिवार्य आहे, तरी शाळेच्या सादिल अनुदानातून विज देयके भरण्यास निधी अपूरा पडत असुन त्यामुळे विद्युत देयके ग्राम पंचायत स्तरावरुन भरण्यास कळविलेले आहे.

तरी आपणास कळविण्यात येत आहे की, आपल्या ग्राम पंचांयत अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळांचे विद्युत देयक आता आपल्या स्तरावरुन भरण्यात यावे.

गट विकास अधिकारी पंचायत समिती, चंद्रपूर

प्रतिलिपी,
1. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांना माहितीस सविनय सादर.
2. मा. शिक्षणाधिकारी (प्राथ), जिल्हा परिषद, चंद्रपूर यांना माहितीस सविनय सादर.
3. विस्तार अधिकारी (पंचायत), पंचायत समिती, चंद्रपूर यांना माहितीस तथा कार्यवाहीस अग्रेषित.
गट विकास अधिकारी पंचायत समिती, चंद्रपूर

Post a Comment

0 Comments