12/02/2026
प्रति,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा परिषद, नागपूर/वर्धा/भंडारा/गोंदिया/चंद्रपूर/गडचिरोली
विषय :- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित झाल्याबरोबरच कर्मचारी हजेरी रजिस्टरबर स्वाक्षरी करू देण्याबाबत,
संदर्भ : अध्यक्ष, भाजप शिक्षक आघाडी पूर्व विदर्भ, नागपूर यांचे निवेदन दि. 16.01.2026
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेत गेल्यानंतर शालेय कामकाज सुरु होण्या अगोदरच सुरुवातीला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची हजेरीवर स्वाक्षरी होणे अनिवार्य आहे. परंतु बऱ्याच शाळेत मुख्याध्यापक आपली मनमर्जी करून त्या संबंधित शिक्षकांना शिक्षक हजेरीवर स्वाक्षरी करू न देता शालेय कामकाज पूर्ण झाल्याबर स्वाक्षरी करायला स्वाक्षरी हजेरी देतात ही बाब अतिशय गंभीर व नियमबाह्य आहे, असे निवेदन या कार्यालयास अध्यक्ष, भाजप शिक्षक आघाडी पूर्व विदर्भ, नागपूर यांचे कडून प्राप्त झाले आहे.
याबी, सदर निवेदन आपलेकडे वर्ग करण्यात येत आहे. निबेदनाचा अनुषंगांने नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात
सहपत्र :- संदर्भिय पत्राची प्रत
MADHURI GOVINDRAO SAWARKAR Date: 12-02-2026 19:59:32
(डॉ. माधुरी सावरकर) विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग, नागपूर.
प्रतिलिपी - अध्यक्ष, भाजप शिक्षक आघाडी पूर्व विदर्भ, नागपूर यांना माहितीस्तव अग्रेषित,
0 Comments