प्रति,
सर्व केंद्रसंचालक
छत्रपती संभाजीनगर विभाग
छत्रपती संभाजीनगर/बीड/जालना/परभणी व हिंगोली
विषयः- इ.१० वी व इ. १२ वी परीक्षेस मुस्लिम परीक्षार्थीना बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी देण्याबाबत...
संदर्भः-
१) राज्य मंडळाचे पत्र क.रा.मं. / परीक्ष-५/१०१२ दि. २७.०२.२०१७ चे पत्र.
२) राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन यांचे पत्र SAR/H2H/MRJPHS/NO19 परीक्षा प्राधान्य दि. ०९/०२/२०२६ रोजीचे पत्र.
उपरोक्त विषयाच्या संदर्भिय पत्रास अनुसरुन आपणास कळविण्यात येते की, माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु/मार्च-२०२६ च्या परीक्षेस मुस्लिम विद्यार्थीनींना परीक्षेच्या वेळी बुरखा परिधान करुन परीक्षा देण्याबाबत परवानगी देण्यात येत आहे. तसेच परीक्षेच्या वेळी आवश्यकता वाटल्यास प्रकरणपरत्वे तपासणीसाठी महिला पोलिस/अधिकारी किंवा महिला शिक्षक कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी. यासंदर्भात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत. याची कटाक्षाने दक्षता घ्यावी.
प्र. विभागीय सचिव, का विभागीय मंडळ, छत्रपती संभाजीनगर.
प्रत माहितीस्तवः-
१. मा. सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे.
२. शेख अब्दुल रहीम, राज्य प्रवक्ता, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
0 Comments