SIR च्या कामकाजासाठी दि.16-03-2026 ते दि. 31-03-2026 या कालावधीत BLO यांना पुर्णवेळ कामाकरीता कार्यमुक्त करण्याबाबत आदेश

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर

जा.क्र.२०२६/पुनरीक्षण पुर्व त्यारी/कावि- 299
जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर
दिनांक 13 मार्च, २०२६

:: आदेशः:

ज्याअर्थी, मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लवकरच मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) महाराष्ट्र राज्यात सुरुवात करण्याची घोषणा करणार आहे. मा. मुख्य निवडणूक अधिकारी महराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालयाकडून दिनांक २४.१२.२०२५ रोजी च्या पत्रान्वये पुनरिक्षण पुर्व उपक्रमाची तयारी बाबत लेखी निर्देश दिले आहेत. तसेच दिनांक १८.०२.२०२६ रोजी मुंबई येथे मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे समवेत झालेल्या चर्चेनुसार ऑक्टोंबर २०२४ च्या मतदार यादीमध्ये असलेले सन २००२ रोजीच्या मतदार यादीमधील मतदारांशी मतदार मॅपींग करणे, अस्पष्ट (Blur Photo) मतदारांचे नवीन रंगीत फोटो गोळा करून अद्यावत करणे, DSE च्या नोंदीची पडताळणी करून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे इत्यादी कामे विहित मुदतीत पुर्ण करणे याबाबत निर्देशीत करण्यात आले आहे.

तसेच संदर्भ क्र. ४ व ५ अन्वये जिल्हयातील शिक्षक संघटना व राजकीय पक्ष यांनीसुध्दा SIR (Special Intensive Revision) मोहिमेसाठी BLO यांना शाळेच्या कामातून कार्यमुक्त करुन त्यांना Mapping व Progeny Mapping च्या कामासाठी पूर्ण वेळ उपलब्ध करुन देण्याबाबत तसेच जनजागृतीसाठी अधिकृत जाहिराती देणेबाबत या कार्यालयाकडे विनंती केलेली आहे.

त्याअर्थी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १०४-सिल्लोड, १०५-कन्नड, १०६ फुलंब्री, १०७-औरंगाबाद मध्य, १०८ औरंगाबाद पश्चिम, १०९ औरंगाबाद पुर्व, ११०-पैठण, १११-गंगापूर, ११२-वैजापूर विधानसभमतदारसंघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व पर्यवेक्षक (BLO Supervisor) यांना मतदार मॅपींग करणे, Blur Photo गोळा करून अद्यावत करणे, DSE च्या नोंदीची पडताळणी करणे या कामकाजासाठी दि.16-03-2026 ते दि. 31-03-2026 या कालावधीत पुर्णवेळ कामाकरीता कार्यमुक्त करण्यात येत आहे. तसेच ज्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व पर्यवेक्षक (BLO Supervisor) यांच्या पैकी ज्यांची सदर कालावधीत दहावी व बारावी परिक्षाकरीता नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी त्या दिवशी परिक्षाचे कामकाज पुर्ण करून दुस-या दिवशी मतदार यादी संबंधित मतदार मॅपींग करणे, Blur Photo गोळा करून अद्यावत करणे, DSE च्या नोंदीची पडताळणी करून त्यावर योग्य ती कार्यवाही करून कामकाज पूर्ण करावयाचे आहे.
तसेच उक्त कामकाजाकडे दुर्लक्ष किंवा टाळाटाळ केल्याचे माझे निदर्शनास आल्यास संबंधीताविरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० च्या तरतुदी अन्वये नियमानुसार योग्य ती कार्यवाही अनुसरली जाईल याबाबत सर्व संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

दिलीप स्वामी, भाप्रसे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी 'छत्रपती संभाजीनगर

Post a Comment

0 Comments