दिनांक: १९ मे, २०१६
विषय:- फौजदारी स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये पंचनाम्यासाठी शिक्षकांना न घेण्याबाबत दिनांक १५.९.२०१५ रोजी दु. १२.०० मा. राज्यमंत्री (गृह) (शहरे) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली बैठक
संदर्भ:- गृह विभाग शासन निर्णय क्र. डीपीपी-२०१२/प्र.क्र.१०/पोल-१० दिनांक १२.०५.२०१५ (१४ पैकी शासन निर्णय क्र. १२)
वरील विषयाबाबत शासन स्तरावर खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे:-
" स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शिक्षक हे निम शासकीय कर्मचाऱ्यामध्ये मोडतात तर, खाजगी शाळातील शिक्षक हे त्या-त्या व्यवस्थापनांतर्गत खाजगी कर्मचारी म्हणून गणण्यात येतात. त्यामुळे शासन निर्णय दिनांक १२.०५.२०१५ च्या तरतुदीनुसार पंचनाम्याच्या कामासाठी शिक्षकांच्या सेवा न घेता शक्यतोवर शासकीय कार्यालयातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा घेण्यात याव्यात."
तरी उपरोक्त निर्णयाप्रमाणे आवश्यक त्या सूचना आपल्या स्तरावरुन संबंधितांना कृपया देण्यात याव्यात.
आपला, (अ.वि. जोशी) कार्यासन अधिकारी, गृह विभाग, महाराष्ट्र शासन.
0 Comments