22/०५/२०२६.
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व.
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, संबंधित सर्व.
३) शिक्षण निरीक्षक, (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई.
४) अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (माध्यमिक) संबंधित सर्व.
विषय- राज्यातील १०० टक्के अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट (ABHA) कार्ड काढणेबाबत.22/०५/२०२६.
संदर्भ : १. शासन पत्र क्रमांक वैखप्र-१६२५/(१४९/२५)/टीएनटी-५ दिनांक २५ फेब्रुवारी २०२६.
२. प्रस्तूत कार्यालयाचे पत्र शिसंमा/२०२५-२६/टि-७/आयुष्यमान /६१५७ दिनांक ०५/०३/२०२६.
उपरोक्त संदर्भाधीन पत्रानुसार, राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी १०० टक्के अनुदानित शाळांमधील कर्मचायांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करुन कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकिय सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत मागणी केली होती.
तथापि, याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागास सादर केला असता सदर योजनेमध्ये शुभ्र शिधापत्रिका धारकांसह राज्याच्या सर्व अधिवासी नागरिकांना योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमार्फत विस्तारीत महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. ५.०० लक्ष चे आरोग्य संरक्षणाचे लाभ अनुज्ञेय आहेत. या लाभार्थ्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आपल्या स्तरावरून सर्वांना अवगत करण्यात यावे असे कळविण्यात आले होते.
त्याअनुषंगाने आभा कार्ड काढण्याची कार्य पध्दती तसेच व्हिडीयो लिंक या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. त्यानुसार सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आभा कार्ड काढणे अनिवार्य आहे. यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याचे रु ५.०० लाखापर्यंतचे वैदयकीय प्रतिपूर्तीचे देयक स्विकारले जाणार नाही
(डॉ. एकनाथ आंबोकर) शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
0 Comments