ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान" या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ग्रामपंचायत अंतर्गत कामांची व्याप्ती वाढवणेबाबत दिनांकः २९ सप्टेंबर, २०२६

"ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान" या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ग्रामपंचायत अंतर्गत कामांची व्याप्ती वाढवणेबाबत दिनांकः २९ सप्टेंबर, २०२६

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग
शासन निर्णय क्रमांकः विकास-२०२६/प्र.क्र.१४९ (संगणक क्र. १७५६३०५)/यो-६ बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ, फोर्ट, मंत्रालय, मुंबई - ४००००१ दिनांकः २९ सप्टेंबर, २०२६

वाचा 
१) ग्रा.वि.व.ज.सं.वि., शासन निर्णय क्र. ददभू-२०१०/प्र.क्र.६२/पंरा-६, दि.१६.९.२०१०.

२) ग्रा.वि.व.ज.सं.वि., शासन निर्णय क्र. ग्रापंई-२०१३/प्र.क्र.१८९/पंरा-७, दि.३०.१.२०१४

३) ग्रा.वि.व.ज.सं.वि., शासन शुध्दिपत्रक क्र. जनसु-२०१६/प्र.क्र.२१०/यो-०६, दि.०३.०१.२०१७

४) ग्रा.वि.वि., शासन निर्णय क्र. जनसु-२०१७/प्र.क्र.१११/यो-०६, दि.२५.०१.२०१८

५) ग्रा.वि.वि., शासन निर्णय क्र. विकास-२०२६/प्र.क्र.१४९/यो-०६, दि.२०.०७.२०२६

प्रस्तावना:-
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत "ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान" याबाबत दि.१६.९.२०१० रोजीच्या शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत. तसेच, संदर्भाधीन क्र.४ व ५ येथील शासन निर्णयान्वये जनसुविधा योजनेतंर्गत कामांची व्याप्ती वाढविण्यात आली असून सदर कामांना खर्चाची मर्यादा लागू करण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत कामांची व्याप्ती वाढविण्याची मागणी होत असल्याने काही नवीन कामांचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-
"ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान" या जिल्हास्तरीय योजनेंतर्गत संदर्भाधीन क्र.४ येथील शासन निर्णयामधील कामांमध्ये अ.क्र.१ (फ) नुसार खालील नवीन कामांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
अ.क्र./ कामे.  )खर्चाची मर्यादा (रक्कम रु. लक्ष)
(फ)

जनसुविधा योजनेतंर्गत कामांची व्याप्ती वाढविणे १) जि.प. शाळा / अंगणवाडी केंद्र नविन इमारत बांधकाम /वर्ग खोली बांधकाम करणे.
२०,०० रु.लक्ष

२) जि.प. शाळा / अंगणवाडी केंद्र जुन्या इमारत दुरुस्ती व रंगरंगोटी करणे ०५,००  रु.लक्ष

३) जि.प. शाळा / अंगणवाडी केंद्रांकरिता शौचालय बांधकाम / दुरुस्ती करणे. ०३.०० रु.लक्ष

४) जि.प. शाळा / अंगणवाडी केंद्रावर सोलर बसविणे व जि.प. शाळा / अंगणवाडी केंद्र इमारत विद्युतीकरण करणे. ०५.०० रु.लक्ष

५) जि.प. शाळा / अंगणवाडी केंद्रांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संरक्षण भिंत बांधकाम करणे.
०५.०० रु.लक्ष

६) जि.प. शाळा / अंगणवाडी केंद्रांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून व्हिडिओ निगराणी यंत्रणा (CCTV) /अग्नीशमन यंत्र स्थापित करणे ०३.०० रु.लक्ष
२. उपरोक्त कामे ही अन्य कुठल्याही योजनेत/विभागाकडून प्रस्तावित नसल्याची खात्री करुन घ्यावी. तसेच कामांची द्विरुक्ती होणार नाही याची दक्षता कामे प्रस्तावित करतांना घ्यावी ३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०९२९१६३३२६५९२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

प्रशांत पाटील
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,
१) मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई
२) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई.
३) मा. उप मुख्यमंत्री (नगर विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
४) मा. उप मुख्यमंत्री (अल्पसंख्याक) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
५) मा. मंत्री, सर्व यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
६) मा. राज्यमंत्री, सर्व यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
७) मा. विधानसभा व मा. विधानपरिषद सदस्य, सर्व
८) मा. मुख्य सचिव यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
९) सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
१०) सचिव, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई
११) महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, १/२, महाराष्ट्र, मुंबई/ महाराष्ट्र-२ नागपूर.
१२) महालेखापाल, लेखा व परिक्षा, १/२, महाराष्ट्र, मुंबई/ महाराष्ट्र-२ नागपूर.
१३) सर्व विभागीय आयुक्त
१४) सर्व जिल्हाधिकारी
१५) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
१६) निवड नस्ती (का. यो-६), ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

Post a Comment

0 Comments