शिस्तभंगविषयक कार्यवाहीमध्ये शिक्षा दिलेल्या प्रकरणी सेवापुस्तकात घेण्यात येणा-या नोंदीबाबत.

विषय : शिस्तभंगविषयक कार्यवाहीमध्ये शिक्षा दिलेल्या प्रकरणी सेवापुस्तकात घेण्यात येणा-या नोंदीबाबत.
उपरोक्त विषयानुसार कळविण्यात येते की, शालेय शिक्षण विभागात कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांचेविरुध्द शिस्तभंगविषयक कार्यवाहीमध्ये प्रकरणपरत्वे निलंबन/वेतनवाढ रोखणे/ठपका ठेवणे इ. विविध शिक्षा आदेशित करण्यात येतात. शिक्षा दिलेल्या प्रकरणी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे सेवापुस्तकात तशी नोंद घेऊन त्याबाबतचा अहवाल (सेवापुस्तकातील नोंदीच्या छायाप्रतीसह) शासन/शिक्षण आयुक्तालयास/नियुक्ती प्राधिका-यास विहीत वेळेत सादर करणे आवश्यक असते. तथापि काही प्रकरणी शासन आदेश/शिक्षा आदेश यांची अंमलबजावणी विहित कालमर्यादेत होत नसल्याचे व त्यानुसार आवश्यक नोंदी सेवापुस्तकात वेळीच घेण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यानुसार सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, शिस्तभंगविषयक कार्यवाहीमध्ये शिक्षा आदेशित केलेल्या प्रकरणी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे सेवापुस्तकात तशी नोंद घेऊन त्याबाबतचा अहवाल (सेवापुस्तकातील नोंदीच्या छायाप्रतीसह) शासन/शिक्षण आयुक्तालय/नियुक्ती प्राधिका-यास वेळोवेळी विहीत वेळेत सादर करण्याची दक्षता घ्यावी.

Digitally signed by Harun Ismail Atar Date: 29-09-2026 17:1हन छाकर)

शिक्षण सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे ४११ ००१

Post a Comment

0 Comments