_*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे संस्थापक अध्यक्ष कै.भानुदास वालचंद शिंपी उर्फ भावा शिंपी गुरुजी यांची आज दि.3 ऑक्टोबर रोजी पुण्यतिथी.*_
*❀꧁❀संकलन❀꧂❀*
_सतीश कोळी प्रसिध्दीप्रमुख शिक्षक समिती छत्रपती संभाजनगर_
*✧═══•❁❀❁•═══✧*
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे संस्थापक अध्यक्ष कै.भानुदास वालचंद शिंपी उर्फ भावा शिंपी गुरुजी यांची आज दि.3 ऑक्टोबर रोजी पुण्यतिथी.आज त्यांच्या पुण्यतिथी च्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा छोटासा आढावा आपल्या माध्यमातून मांडत आहे. भा वा शिंपी गुरुजी यांचा जन्म उंदीर खेडे तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथे झाला.दोन भाऊ आणि दोन बहिणी असे त्यांचे कुटुंब होते भावा शिंपी गुरुजींचा जन्म 3 ऑक्टोबर 1931 रोजी झाला 1948 मध्ये भावा शिंपी गुरुजींना प्राथमिक शिक्षकांची नोकरी लागली.प्रथम नेमणूक खडकवाडी येथे मिळाली. 1955 मध्ये त्यांचा विवाह पातोंडा तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथील पाचवी शिकलेल्या कलावती देवी यांच्याशी झाला. त्यावेळी मुंबई राज्य असल्याने शिक्षकाची नोकरी करीत असताना शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई राज्य विद्यार्थी शिक्षक समितीची स्थापना भावा शिंपी गुरुजी व विभा येवले गुरुजी यांनी स्थापन केली. पहिल्यांदा त्यांनी ड्युटी पे चा प्रश्न हाती घेतला. प्रत्येक शिक्षकाकडून 25 पैसे वार्षिक वर्गणी गोळा करून संघटना चालवली. 14 नोव्हेंबर 1961 मध्ये पुण्याच्या शनिवारवाड्याच्या समोर मारुती मंदिरात ड्युटी पे च्या प्रश्नासाठी आमरण उपोषण केले,पाचव्या दिवशी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दवाखान्यात नेले त्यावेळी एस एम जोशी आणि तत्कालीन शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाई या दोघांनी शिंपी गुरुजींची भेट घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले, तेव्हा त्यांनी उपोषण सोडले. नंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी नागपूरला येणार होत्या तेव्हा शिक्षकांच्या प्रश्नासाठी 7000 शिक्षकांचा मोर्चा काढण्याचे नियोजन केले परंतु जमावबंदी आदेश लागू केल्याने त्यांना मोर्चा काढता आला नाही परंतु तत्कालीन आयुक्तांनी भावा शिंपी गुरुजींची भेट पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी घालून दिली ड्युटी पे चा प्रश्न शिंपी गुरुजींनी पंतप्रधानांच्या कानावर घातला त्याच वेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री एम सी छागला यांच्या सोबतही या प्रश्नांची चर्चा केली,अनेक शिक्षकांच्या आग्रहा खातर 22 जुलै 1962 रविवार पुणे येथे गोखले हॉलमध्ये १००० शिक्षकांच्या उपस्थित मुंबई राज्य विद्यार्थी शिक्षक समिती विसर्जित करून शिक्षकांच्या व शिक्षणाच्या प्रश्नासाठी त्याग आणि सेवा न्यायाची चाड ,अन्यायाची चीड या लोकशाही तत्त्वाचा अंगीकार करणारी व सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची स्थापना आपल्या असंख्य सहकाऱ्यांना बरोबर घेऊन केली.
*✧═══•❁❀❁•═══✧*
पहिले राज्य अध्यक्ष म्हणून दत्तो वामन पोतदार व कार्याध्यक्ष म्हणून भावा शिंपी गुरुजी आणि सरचिटणीस पदावर येवले गुरुजी यांची निवड करण्यात आली. शिक्षक समितीच्या नेतृत्वात भा.वा.शिंपी गुरुजी यांनी अनेक आंदोलने करून महाराष्ट्र सरकारकडून शिक्षकांना पेन्शन व ग्राच्युटी मान्य करून घेण्यात यश मिळवले.
त्यानंतर शिक्षक समितीने शिक्षकासाठी वेतन मंडळाची मागणी केली त्यासाठी दिनांक 29 नोव्हेंबर 1964 रोजी 3000 शिक्षकांचा भावा शिंपी गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर अधिवेशना वर मोर्चा काढण्यात आला, याची दखल महाराष्ट्र सरकारने घेवून बडकस आयोगाची स्थापना केली.
*✧═══•❁❀❁•═══✧*
शिक्षक समितीच्या दुसऱ्या राज्या अधिवेशनात भा.वा शिंपी गुरुजी राज्याचे अध्यक्ष झाले 1964 मध्ये त्यांनी शिक्षक मित्र नावाचे पाक्षिक सुरू केले त्यातून शिक्षणाचे व शिक्षकांचे ज्वलंत प्रश्न लेखणीच्या माध्यमातून मांडू लागले ,शिक्षक समितीची चळवळ वेगाने सुरू होती. जिल्हा परिषद अधिकारी व पदाधिकारी यांना भावा शिंपी गुरुजींच्या कार्याचा त्रास होऊ लागला म्हणून भावा शिंपी गुरुजींना अधिकारी व पदाधिकारी त्रास देऊ लागले म्हणूनच शिंपी गुरुजींनी 1965 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला. घराचा उदारनिर्वाह करणे अवघड झाले म्हणून त्यांच्या पत्नीने ट्रेनिंग करून शिक्षिकेची नोकरी धरली नंतर शिंपी गुरुजींनी राजीनामा दिल्यामुळे पूर्ण वेळ संघटनेचे काम जोमाने सुरू झाले.एकदा शिक्षण मंत्री यांना भेटण्यासाठी नागपूरला जायचे होते जवळ पैसे नव्हते मुलाच्या फी साठी ठेवलेले पैसे पत्नीला माहीत नसताना घेऊन गेले आणि नागपुरात त्याची चप्पल तुटली तेव्हा अनवाणी पायाने मंत्र्यांच्या भेटीला गेल्याची माहिती त्यावेळेचे सहकारी चंद्रकांत आणावकर यांनी दिली.
*✧═══•❁❀❁•═══✧*
1970 मध्ये शिंपी गुरुजींनी शिक्षक समितीच्या व्यासपीठावरून शिक्षकांसाठी बोनसची मागणी केली व नंतर संघर्ष करून ती मान्य करून घेतली. शेवटी 1977 मध्ये शिक्षक समितीचे पाचवे राज्य अधिवेशन सोलापूर येथे झाले त्या अधिवेशनात शिंपी गुरुजींनी राज्याध्यक्ष पद सोडले व वि.भा येवले गुरुजींना राज्याध्यक्ष आणि सरचिटणीस राजाराम माळी यांना केले व स्वतः मार्गदर्शक म्हणून राहिले. शेवटी डिसेंबर 1977 मध्ये हडपसर येथे झालेल्या राज्य कार्यकारिणींमध्ये अखेरचे भाषण केले 14 डिसेंबर 1977 च्या बेमुद्त संपात शिक्षक समिती पूर्ण ताकदीनशी संपात उतरली.
शेवटी 2 जानेवारी 1978 रोजी घरी येत असतात दुपारी एकच्या दरम्यान शिंपी गुरुजी चक्कर येऊन पडले आणि त्यांना के.एम हॉस्पिटलमध्ये दाखल केले शेवटी 12 जानेवारी 1978 रोजी अकरा वाजता भावा शिंपी गुरुजींची प्राणज्योत मावळली, त्यावेळी खऱ्या अर्थाने हजारो शिक्षकांचा तारणहार आपल्यातून निघून गेला अशा प्रकारची भावना शिक्षकांच्या मध्ये निर्माण झाली.
सत्कर्माच्या दिव्य फुलांनी !देव पूजिला ज्यांनी!अनंत तयाची स्मरण यात्रा! कधी न सरे मरणांनी! आणि पुढे त्याच जोमाने प्रभाकर आरडे ,कै.देवाजी नाना गांगुर्डे ,नाना जोशी, काळू बोरसे, उदय शिंदे, यांनी भावा शिंपी गुरुजी यांचा वारसा पुढे चालवला व आत्ता विद्यमान अध्यक्ष विजय कोंबे हे तळागाळामध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या जोरावर शिक्षक समितीचा महायज्ञ महाराष्ट्रात पुढे नेहत असून अनेक असंख्य कार्यकर्ते निष्ठेने काम करत आहे.
*✧═══•❁❀❁•═══✧*
तरी महाराष्ट्रातील शिक्षक समितीच्या सर्व शिलेदारांनी त्याग आणि सेवा,न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड हा भावा शिंपी गुरुजी यांनी दिलेला विचारांचा आणि संघर्षाचा वारसा पुढे न्यावा व प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय द्यावा, हीच खरी भावा शिंपी गुरुजी यांना आदरांजली ठरेल.
_*संकलन - सतीश कोळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती*_
0 Comments