▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
➖🕳♍💲🅿🕳➖
*_रंगनाथ सगर,लातूर_*
❱❱ *_महाराष्ट्र शिक्षक पँनल_* ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
〇 *_माझी शाळा,माझे उपक्रम_* 〇
════════════════
*_🥓चला चवळीच्या शेंगातून ...!!!_*
*_संख्या शिकू या लिहू या...!!!🥓_*
━━━━━━━━━━━━━━━━
*_आमच्या वर्गामध्ये दररोज असे घडायचं सध्या शेतात चवळीच्या शेंगा खुप आहेत त्यामुळे मुले चवळीच्या शेंगा वर्गात खायचे कचरा टाकायचे. पण आज चवळीच्या शेंगा खात खात मुलांचा अभ्यासात उपयोग करून घ्यावयाचे ठरवलं._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*_साधी चवळीच्या शेंग सहज खायला घेतली आणि डोक्यात विचार आला चला मुलांनाही देऊ. पहिली व दुसरीचा वर्ग.प्रत्येकाच्या वाट्याला एकच शेंग आली._*
*_मी सुचना सांगायला सुरूवात केली आणि मुलांनी कृतीला..._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*_🥓चळवळीच्या शेंग हाताने सोला._*
*_🥓 शेंगेतील सोले (बिया) उजव्या हातावर घ्या._*
*_🥓चवळीच्या शेंगा तील सोले (बिया)मोजा._*
*_🥓 मोजलेल्या सोल्या(बिया) एवढं संख्याकार्ड घ्या व सांगा._*
*_🥓 संख्याकार्डावरील संख्या मोठयाने वाचा._*
*_🥓सर्वांत जास्त व सर्वांत कमी सोले (बिया)कोणाकडे आहेत ते उभे रहा व सांगा सर्व जणांनी लिहा._*
*_🥓बेरीजचा सराव होण्यासाठी रामकडील पाच सोले(बिया) व शामकडील तीन सोले(बिया) एकूण किती बिया झाल्या._*
*_🥓वजाबाकीचा सराव घेण्यासाठी प्रितीकडील पाच बिया आहेत व अंजली कडे तीन आहेत तर प्रितीकडे किती बिया जास्त आहेत._*
*_🥓याचप्रमाणे कमी जास्त हि संकल्पना पण मुलांना शिकवता येते_.*
*_🥓एक- एक शेंगामधील सोला (बिया)मोजत तोंडामध्ये टाका._*
*_🥓 चवळीच्या शेंगांची टरफले घ्या. व त्यातील घरे मोजा._*
*_( जवळपास प्रत्येक टरफलाची १०ते१२ घरे होती. )_*
*_🥓चवळीच्या शेंगाची टरफले कचराकुंडीत टाका._*
*_मुलांनी हसतखेळत संख्या वाचन व लेखनाचा व बेरीज, वजाबाकीचा सराव केला._*
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
*_रंगनाथ सगर, लातूर_*
*_महाराष्ट्र शिक्षक पँनल_*
📞 *_97 63 534721_* 📞
════════════════
┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄
0 Comments