▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
➖🕳♍💲🅿🕳➖
*रंगनाथ सगर,लातूर*
❱❱ *महाराष्ट्र शिक्षक पँनल* ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
〇 *माझी शाळा* 〇
*🔘आमचे शैक्षणिक उपक्रम🔘*
════════════════
*🌴झाडे,फुले,पाने होऊ या...!!!*
*💐त्यांचे महत्व सांगू या.....!!!*
━━━━━━━━━━━━━━━━
*इयत्ता तिसरी मराठी विषयाचा " एकदा गंमत झाली " हा पाठ शिकवित आसताना मनुली व झाडांच्या पानाचा संदर्भ देताना मला " झाडे,फुले होवू या,महत्त्व सांगू या" या उपक्रमाची संकल्पना लक्षात आली व मुलांना सर्व प्रकारची पाने आणायला लावली.*
*कुणी केळीची,कुणी नारळाची,कुणी नारळाची,कुणी आंब्याची,तर कुणी वड,जास्वंदीची आणली.*
*त्या बालरुपी झाडांनी पानांआडून आपले महत्व सांगण्यास सुरवात केली.*
*🍌केळी म्हणते🍌*
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
*मी आहे केळी,मी आहे केळी*
*उपयोगी येते उपवासाच्या व भुकेच्या वेळी*
*सत्यनारायण पुजेला*
*लग्नाच्या वेळेला*
*चौरंगाला लावायला माझाच मान*
*अशी आहे मी केळी*
*उपयोगी येते बहु वेळी.*
*🌺जास्वांदी म्हणते🌺*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*मी आहे जास्वंदी*
*आहे बरं का,बहुछंदी*
*मज असे दोन रंग*
*एक असे लालेलाल*
*दुसरा असे धवल*
*मी नव्हे साधीसुदी*
*म्हणतात मला जास्वंदी.*
*🍋आंबा म्हणतो🍋*
🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋
*मी आहे आंबा,मी आहे आंबा*
*अधीर होऊ नका,थांबा*
*आधी महती सांगतो पानांची*
*मग मजा चाखा फळांची*
*लग्नसमारंगात,मुंजीसाठी*
*मलाच मान*
*मी तर आहे फळांचा राजा*
*पहिला ना तुम्ही रुबाब माझा.*
*🔸अशा प्रकारे मुलांनी आणलेल्या पानांचे उपयोगाचे वर्गासमोर सादरीकरण केल्यास मुलांच्या नकळत शब्दसंपत्तीत वाढ,सभाधिटपणा,आपले विचार इतरापुढे मांडण्याचे कौशल्य यांच बरोबर नकळत सबंधीत विषयाचा अभ्यास होत आसतो*.
*🔹मुलांनी जी झाडांची,फुलांची पाने व फळे आणली आहेत त्यांचे आपणास "साप्ताहिक प्रदर्शन" या उपक्रमासाठी देखील उपयोग करुन घेता येईल.*
*🔸या उपक्रमात शिक्षकांची भुमिका ही मार्गदर्शकांची आहे.*
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
*रंगनाथ सगर, लातूर*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल*
📞 *97 63 534721* 📞
════════════════
┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄
0 Comments