दि. 9/4/2025
प्रति,
1. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर
2. शिक्षणाधिकारी,
विषयः- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत माहे एप्रिल 2025 या महिन्यामध्ये दि.8 एप्रिल 2025 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये पोषण पखवाडा साजरा करणे बाबत.दि.
संदर्भ:- मा.शिक्षण संचालक (प्रा) म रा पुणे यांचे पत्र जान प्राशिसं/पीएमपोषण/2025/02301 दि.8/4/2025
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत उपक्रमाचा एक भाग म्हणून दि.8 एप्रिल 2025 ते 25 एप्रिल 2025 हा कालावधी पोषण पखवाडा म्हणून घोषित केला आहे. या उपक्रमाचा मुख्य उददेश पोषणाच्या महत्त्वाबददल जागरुकता निर्माण करणे आणि देशभरात आरोग्य आणि निरोगीपणाला प्रोत्साहन देणे आहे. पोषण पखवाडा 2025 साजरा करण्यासाठी संपुर्ण उपक्रमाची यादी व उपक्रमाचा सारांश रुपरेषा शाळास्तरावर राबवण्यासाठी सुलभ संदर्भीय पत्राची पत्र यासोबत देण्यात येत आहे.
आपल्या स्तरवरुन सर्व मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांना याबाबत कळविण्यात येऊन पोषण पखवाडा 2025 उपक्रम सोबतच्या पत्रात नमुद केल्याप्रमाणे राबविण्यात यावा. तसेच केलेल्या कार्यवाहीचा एकत्रीत अहवाल या कार्यालयास सादर करावा.
सोबतः- संदर्भीय पत्राची प्रत.
(जयश्री चव्हाण) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर
प्रतिलिपीः-
1. मा.शिक्षण संचालक(प्रा) म रा पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर.
0 Comments