दि. 9/4/2025
प्रति,
1. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व 2. शिक्षणाधिकारी, महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर
विषयः- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत उष्णतेच्या लाटेसंदर्भात मार्गदर्शक सूचनांबाबत.
1. मा. अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांचे पत्र दि.21/3/2025
2. मा. निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र जाक्र 2024/जि. आव्य/जि.नि.कक्ष/कावि-431दि.8/4/2025
उक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, उष्णतेच्या लाटांमुळे विदयार्थ्यांच्या आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेऊन करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुषंगाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विदयार्थ्यांना आवश्यकतेनुसार सरबत, ताक आणि ORS पॅकेट पुरक पोषण आहारामध्ये उपलब्ध करुन दयावेत. जेणे करुन उष्णतेचा त्रास विदयार्थ्यांना होणार नाही.
सोबतः- संदर्भीय पत्राची प्रत.
(जयश्री. चव्हाण) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर
0 Comments