,,तर,,गुणवत्ता कशी टिकणार

*खेड्यातील गरीबांची लेकरं कशी शिकणार? रोज फोटोसाठी कार्यक्रम घेऊन शैक्षणिक गुणवत्ता कशी येणार ?*

(पालकांनो जागृत व्हा व शिक्षकांना साथ दया)
(आम्हाला फक्त शिकवू दया)

राज्यात दोन शिक्षकी शाळांची संख्या लक्षणीय म्हणजे पन्नास टक्क्यांपेक्षाही जास्त आहे.

१) शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ, माता पालक संघ, शालेय परिवहन समिती, शालेय पोषण आहार समिती, गुणवत्ता सनियंत्रण समिती अशा वेगवेगळ्या दहाहून जास्त समित्यांच्या महिनावार बैठका घ्या, इतिवृत्त लिहा.
२) वेगवेगळे विशेष दिवस, सप्ताह, पंधरवाडे, महिने साजरे करा उपक्रमांचे फोटो काढा, इतिवृत्त लिहा, हार्ड कॉपीत अहवाल पाठवा, ऑनलाइन रिपोर्ट करा.
३) एवढे करुन साधारण पन्नासेक रजिस्टर वर्षभर लिहायचे असतात. बँकेचे सगळे व्यवहार बघायचे असतात. रोज किर्द, खतावणी अशा गोष्टी असतातच मागे.
४) गोष्ट इथे संपत नाही. गाव ते तालुक्यातल्या वेगवेगळ्या बैठका, प्रशिक्षण, आणखी इव्हेंट असतात...
👇👇👇👇👇
१) तंबाखूमुक्त शाळा ,त्याचे रेकॉर्ड ,त्याचे डिजीटल बोर्ड करणे
२) रूबेला व गोवर ची लसीकरण ची जबाबदारी गुरुजींच्याच खांदयावर,त्याचे रेकॉर्ड ,प्रभात फेरी काढून गाव दवंडी दया.
३) निवडणूकामध्ये निवडणूक अधिकारी व्हा व निवडणूका घ्या मग त्याचे ट्रेनिंग करा व नंतर वर्षभर BLO म्हणून घरोघरी फिरून  नवीन मतदार नोंदवा मग त्याचे ट्रेनिंग करा व काम नाकारल्यास तहसिलदार गुन्हे दाखल करणार.
४) तेवढयात हात धुवा दिन साजरा करुन अहवाल फोटोसह पाठवा असे परिपत्रक शाळेत पोहोच होते.
५) तोपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी शाळेची जागा मोजून उतारे काढून विहित नमुन्यात माहिती सादर करायला सांगतात.
६) इतक्यात वरुन निरोप येतो ऑडिट आहे सगळी रजिस्टरे व कीर्द घेऊन या ऑडिट ला.
७) तेवढयात जंतनाशक गोळ्या  ट्रेनिंग व वाटप साठी PHC मध्ये  शिक्षकांना आमत्रंण आणि मग गोळ्या वाटप चे रजिस्टर त्यात दिल्या गोळ्या ,शिल्लक गोळ्या नोंद करुन यादी ठेवायची.
८) नित्याचा भाग म्हणून सर्व क्रांतीकारक ,थोर समाज सुधारक जयंती व पुण्यतिथी साजरी करायची.
९) शालेय पोषण आहार रेकॉर्ड (आज कोणती डाळ ,किती हळद ,किती मीठ, किती तेल,किती तांदूळ, किती तिखट ,किती मोहरी ,किती जिरे) व सँपल जेवण रोजचे रोज ठेवायचे व ऑनलाईन नोंदी रोजच्या रोज करा.
१०) धोकादायक शाळा खोली दुरुस्ती व निर्लेखन प्रस्ताव फोटोसह तयार  करा.
११) शैक्षणिक उठावासाठी गावभर फिरा व लोकांची बोलणी ऐका.
१२) शाळेत भौतिक सोईसुविधा निर्माण करा.
१३) U-D।ES ट्रेनिंग करा व तो फॉर्म ऑनलाईन भरा.
१४) शाळा सिद्धी प्रशिक्षण करुन कच्ची माहिती आराखडे बनवा व ऑनलाईन भरा.
१५) झाडे लावा, त्यासाठी गावफेरी काढा, लावलेल्या झाडांना पाणी घालून जगवा व या सर्वाचा फोटोसह अहवाल पाठवा व ऑनलाईन वृक्षारोपन रिपोर्ट करा.
१६) मुलांचे मार्क ऑनलाईन भरा .
१७) सर्व मुलांची आधार कार्ड झेरॉक्स घेऊन आधारकार्ड नोंद करा .
१८) शाळेत ग्रामस्थ किंवा इतर कोणी बोनाफाईड /दाखला मागायला आले की दाखला काढून दया.
१९) वर्ग व शाळा सजावट ,बागबगिचा करा.
२०) सर्व मुलांची वजन व उंची घेऊन रजिस्टर मध्ये यादी करुन नोंदवा.
२१) तेवढयात जणगणना येते मग महिन्याभर शिक्षक गावातच .
२२) गणवेश वाटप व पावत्या संग्रह करा.
२३) शाळेच्या इमारती, नविन बांधकामे, मुतारी, संडास बांधकामे व देखरेख सगळी जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या डोक्यावरच
२४) अधिकारी व केंद्रप्रमुख शाळा भेटी व तपासण्या अहवाल तयार करणे
२५) शाळेत रिकामी पोती(बारदाने) गोळा करुन, मोजून, हिशेब ठेवणे.
२६) इंग्रजी/खाजगी शाळेतून आलेल्या मुलांची माहिती गोळा करुन स्वतंत्र अहवाल देणे.
२७) प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती रेकॉर्ड ठेवणे.
२८) उपस्थिती भत्ता, दारिद्ररेषेखालील लाभार्थी भत्ता यादी व रेकॉर्ड ठेवणे.
२९) ग्रामस्वच्छता अभियान राबवणे.
३०) किशोर वयीन मुलांमुलीसाठी कार्यशाळात उपस्थित राहून अहवाल तयार करणे.
३१) शाळा व्यवस्थापन कमिटी ट्रेनिंग ला उपस्थित रहाणे.
३२) ग्रामसभांना ग्रामसेवक नसल्यास सचिव म्हणून उपस्थित राहून ग्रामसभा पार पाडणे.
३३) मासिक कामे प्रत्येक महिना अखेर केंद्रशाळेत नेऊन देणे.
३४) केंद्रप्रमुख पद रिक्त ठिकाणी केंद्रसमन्वयक म्हणून फिरस्ती चे काम करणे.
३५) शाळेतील जीर्ण व गरज नसलेले साहित्य गटशिक्षणाधिकारी परवानगीने कमी करुन त्याचा घसारा रक्कम चलनाने राष्ट्रीय बँकेत भरणे(त्यासाठी तालुक्याला २/३ फेऱ्या)
३६) सगळेच एका वेळी सुरू असते. अंगावर येते हे. त्यात ढिगभर म्हणजे सुमारे सव्वाशे अशैक्षणिक (ऑनलाइन) कामे पाचवीला पूजलेली असतातच! त्यात ते लोकसहभागाचे नाटक आहेच सुरू...
शिक्षक भूमिकावादाच्या चक्रव्यूहात गुरफटलेला अभिमन्यू झालाय!

*जीव नखात आलाय चार्ज असलेल्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा!*

सोबत वाटयाला आलेल्या दोन वर्गाचे शैक्षणिक कामकाज बघायचे असतेच. महत्त्वाच्या शिकवण्याच्या कामाला अनेकदा पुरेसा वेळच मिळत नाही.

*इतकी प्रचंड अशैक्षणिक कामे लावता आणि   कोणत्या तोंडाने शैक्षणिक गुणवत्ता मागता?*

*गुरुजींना अशैक्षणिक  कामाला जुंपून शासनाला सरकारी शाळा तर बंद करून टाकायच्या नाहीत ना !..*✒

*व्यथा मांडणारा..*
गरिबांच्या लेकराना खेड्यापाड्यावर शिकवणारा
व अशैक्षणिक कामांंमधून *शिकवण्यासाठी वेळ शोधणारा* महाराष्ट्रातील प्रत्येक होतकरू *शिक्षक...*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Post a Comment

0 Comments