एका जंगलात एकदा एक गाढव आणि वाघ भेटतात ।गाढव म्हणतो : निळं गवत किती छान दिसतंय ।
ह्यावर वाघ म्हणतो: गवत हिरवं आहे निळं नाही।
दोघे खूप वाद घालतात आणि ठरवतात की जंगलाच्या राजाला विचारू।
सिंह जंगलात मधोमध बसलेला असतो,दोघे तिथे जातात ।
गाढव सिंहाला विचारतो : महाराज गवत निळं आहे ना।
सिंह होकार देतो ।
गाढव सिंह ला: हा वाघ माझ्याशी वाद घालत होता की गवत हिरवं आहे म्हणून ।ह्याला काही तरी शिक्षा करा महाराज।
सिंह वाघाला एक वर्ष जेल सूनवतो ।
हे ऐकून गाढव उड्या मारत ओरडत सुटतो वाघाला एक वर्ष जेल झाली।
वाघ बिचारा सिंहाला विचारतो : गवत तर हिरवच असतं नाही का।
सिंह वाघाला: तुला शिक्षा गवताच्या रंगा मुळे नाही मिळाली ,तर तू गाढवाशी वाद घातलास आणि ते माझ्या पर्यंत आणलस म्हणून झाली।
तू किती हुशार ,चपळ समजूतदार प्राणी असून तू त्या गाढवाच्या नादी लागलास ।
तात्पर्य:- जो योग्य आहे त्यालाच निवडून द्या । आणि गाढवांशी वाद घालत बसू नका नाहीतर आपल्याला 5 वर्ष शिक्षा होईल ।
0 Comments