माझी शाळा〇माझे शैक्षणिक उपक्रम〇रंगनाथ सगर सर,लातूर〇

▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
   ➖🕳♍💲🅿🕳➖
        *_रंगनाथ सगर,लातूर_*
❱❱ *_महाराष्ट्र शिक्षक  पँनल_* ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
         〇 *_माझी शाळा_* 〇        
  *_🔸माझे शैक्षणिक उपक्रम🔸_*
════════════════
        *_चला तर मग...!!_*
              *_हसत खेळत...!!_*
         *_जोडाक्षरे शिकू या...!!_*
━━━━━━━━━━━━━━━━
*_भाषा विषयात मुले जोडाक्षरेविरहीत शब्द किंवा वाक्य सहज वाचतात पण मध्ये जोड शब्द आली की ती चुकतात._*
*_जोडाक्षरांचा सराव होण्यासाठी आपणास खालील भाषिक उपक्रम घेता येतात._*
*_🔸जोडाक्षराचा प्रत्यय लावून शब्द तयार करणे🔸_*
=====================
*_मुळ जोडाक्षरांपुढे क्य,थ्य,प्रत्यय लावून शब्द तयार करुन घेता येतात._*

*▪क्य-*
*वाक्य, मोजक्या, पडक्या.*
*▪थ्य-*
*काथ्या, पालथ्या,मेथ्या, पोथ्या.*
*अशा दुसऱ्या शब्दांना प्रत्यय लावून सराव घ्यावा.*

       *🔹उपक्रम दुसरा🔹*
   *============*
*🔸जोडाक्षरे वापरून वाक्य तयार करणे🔸*
*शिक्षकांनी किंवा गटनायकाने दिलेल्या जोडाक्षरांचा उपयोग करून वाक्य तयार करणे.*

*उदाहरणार्थ-*
*🔸अरण्य-*
*एका अरण्यात एक छोटासा वाघ होता.*

*🔹रम्य-*
*माथेरान रम्य ठिकाण आहे.*

*जोडाक्षरे वापरून वाक्य पुन्हा पुन्हा सराव करून घ्यावा.*
*🔸अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपुर्ण शब्द तयार करणे🔸*

*शिक्षक किंवा गटनायकाने फळ्यावर उलटसुलट क्रमाने अक्षरे दिसुन देतील.त्यांचा योग्य क्रम विद्यार्थ्यांकडून लावून शब्द वाचन व लेखन घ्यावे.*

*उदाहरणार्थ*👇
*▪त्ररापुज- राजपुत्र.*
*▪ळकाप्रात: - प्रात:काळ.*
*▪तुर्भुजच - चतुर्भुज.*

*🔸अक्षरांचा क्रम जुळवून अर्थपुर्ण फुलांची नावे लिहावे.🔸*
*१)बलागु-* 
*२)र्यफुसूल-*
*३)स्वंजाद-*
*४)गमोरा-*
*५)लीअबो-*

*उत्तर-१)गुलाब 🌹२)सुर्यफुल🌻 ३) जास्वंद🌺 ४)मोगरा ५)अबोली.*

         *🔸खेळ दुसरा🔸*
*⚽खेळांची नावे लिहा.⚽*
==================
*१)बड्डीक-*
*२)लंडीग-*
*३)बाॅबाटस्केल-*
*४)रपाब्यासुरं-*
*५)विदांटीडू*

          *🎾उत्तरे-🎾*
*१) कबड्डी.🤼‍♂*
*२)लंगडी🏃‍♀*
*३)बास्केटबाॅल.🏀*
*४)सुरंपारब्या.*
*५) विटीदांडू.🤺*
            
    *_वरील उपक्रमाच्या साह्याने भाषा विषयात मागे असणाऱ्या मुलांना हसतखेळत जोडाक्षरांचा सराव देऊन लवकरात लवकर प्रगत करता येते._*

📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
         *_रंगनाथ सगर, लातूर_*
       *_महाराष्ट्र शिक्षक पँनल_*
     📞 *_97 63 534721_* 📞
   ════════════════
  ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

Post a Comment

0 Comments