...या शिक्षकांना असणार प्रचाराचा अधिकार


https://www.pudhari.news/news/Konkan/private-teacher-have-a-right-to-campaign-in-election/m/
=====●●●=====●●●=====
*🗳'या' शिक्षकांना असणार प्रचाराचा अधिकार*
~~~~~~~ *srk* ~~~~~~~
Published On: Oct 03 2019 2:11AM | Last Updated: Oct 02 2019 11:08PM

सैतवडे ः वार्ताहर

राज्यातील खासगी शाळेतील निवडणूक कमी नियुक्त कर्मचार्‍यांव्यतिरिक्त शिक्षक व कर्मचारी यांना निवडणूक लढविण्याचा व प्रचारात सक्रिय सहभाग घेण्याचा अधिकार कायद्याने प्राप्त झाला असल्याचे रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले.

यावेळी राज्य उपाध्यक्ष भारत घुले, जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी देवकते, जिल्हा कार्यवाह रोहित जाधव, कायदेविषयक सल्लागार आत्माराम मेस्त्री, रामचंद्र महाडिक, सी.एस.पाटील, विलास कोळेकर, सदाशिव चावरे उपस्थित होते.

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील शिक्षक प्रचारात दिसल्यास कारवाई करण्यात येणार असल्याच्या बातम्या फिरत असल्याने खासगी शाळेतील शिक्षक व कर्मचार्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यावर बोलताना सागर पाटील यांनी ही माहिती दिली. 

ते म्हणाले, शासकिय कर्मचारी व प्राथमिक शाळेतील शिक्षकांना त्यांच्या सेवानियमानुसार निवडणूकीमध्ये सहभाग घेता येत नाही. परंतु  राज्यातील खासगी शाळा कर्मचार्‍यांना ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंतच्या सर्व निवडणूका लढविण्याच्या अधिकाराची महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी नियम 1981 च्या नियम 42 मध्ये स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे. यामुळे निवडणूक लढविणार्‍या   व निवडणूक कामामध्ये नियुक्त नसणार्‍या खासगी शाळा कर्मचार्‍यांना प्रचार करण्यापासून वंचीत ठेवता येणार नाही. या अनुषंगाने न्यायालयाने देखील विविध प्रकरणांमध्ये कायद्याच्या बाजूने निर्णय दिला आहे.असे  मत सागर पाटील,  भारत घुले यांनी व्यक्त केले. 

*आचारसंहिता बंधनकारक*

निवडणूक कामासाठी ज्या शिक्षक व कर्मचारी यांची सेवा अधिग्रहित करण्यात येते त्यांना निवडणूक आचारसंहिता बंधनकारक असते.महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी नियम 1981 च्या नियम 42 मधील तरतूद या कर्मचार्‍यांना लागू होत नाही.त्यामुळे निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचार्‍यांना प्रचारात सहभागी होता येणार नाही असे मत सागर पाटील व भारत घुले यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments