बोधकथा -- सिंह व बेडूक

  आजची फ्रेश बोधकथा -
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••


                 *सिंह  व बेडूक*

एका जंगलात एक सिंह राहायचा.त्याला त्या जंगलात कंटाळा आला तो दुसऱ्या  जंगलात राहायला गेला .एकदा सिंह मोठया ने गरजला.त्या जंगलात अनेक पशु-पक्षी तसेच काही बेडूक ही राहत होते .त्यांनी यापुर्वी सिंह पाहिले नव्हते .त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला ,"कोणीतरी मोठा आवाज काढत आहे .आता मीही मोठा आवाज काढतो ."बेडकानी मोठा आवाज काढला . सिंहासाठी हा आवाज नवीन होता. सिंहाला वाटले , कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे, आपण सावध राहिले पाहिजे.' सिंहाने आपली गर्जना थांबवली. तो शांत उभा राहिला. बेडूक मोठ्या मोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला. सिंहाने त्याला पहिले व त्याचा आवाज ऐकला. सिंह वेगाने पुढे सरकला. सिंहाने बेडकाचे डोक्यावर पाय दिला. बेडूक गयावया करू लागला. सिंहाने त्याला सोडून दिल. बेडूक आनंदाने पाण्यात गेला.
बोध: आव्हान पेलण्याची ताकद असावी मग कोणी कितीही सामर्थ्यशाली असले तरी.

~~

Post a Comment

0 Comments