=======❚❂❚❂❚▬▬▬▬
➖🕳♍💲🅿🕳➖
*रंगनाथ सगर,लातूर*
❱❱ *महाराष्ट्र शिक्षक पँनल* ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
〇 *माझी शाळा,माझे उपक्रम* 〇
════════════════
*📚 चला संख्या बनवू या... !!!! 📚*
*टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ संख्या गणिती शैक्षणिक साहित्य बनवू...*
━━━━━━━━━━━━━━━━
चला संख्या बनवू या...!!! या गणिती साहित्यातून संख्येचा बोध किंवा संख्या तयार करणे व इतर गणिती क्रिया करता येतात.
*🔸शैक्षणिक साहित्य🔸*
*====================*
*👉 लाकडी फळी, चहाचे कप, स्केच पेन, फेव्हीकाॅल व रंगीत कागद.*
*शैक्षणिक साहित्याची कृती*
*====================*
🔸फळीला रंगीत कागद चिटकवून घेऊन त्यावर कप चिटकवून घ्यावे व कपाच्या खाली वर्गाच्या स्तरापासून एकक, दशक,शतक, हजार, दहाहजार असे लिहावे.
🔸हे शैक्षणिक साहित्य 1ली ते 8 वर्गासाठी वापरता येते.
🔹सुरवातीला फळीवर चिकटवलेल्या कपावर 0 लिहावे.
🔹सुरवातीला गटप्रमुखाने किंवा शिक्षकांने कपाची अदलाबदल करून संख्या तयार करून दाखवावे.नंतर मुलांकडून संख्या तयार करुन त्याचे वाचन लेखन करुन घ्यावे.
*उदाहरणार्थ👇*.
👉समजा 4935 संख्या तयार करावयाची आहे
हजार शब्द कपावर 4 लिहलेला कप चिटकावा, 9 अंक कप शतक लिहिलेल्या कपावर, दशक लिहलेले कपावर 3 अंक लिहलेला कप तर एकक लिहलेले कपावर 5 लिहलेला कप चिटकावा.
अशाप्रकारे 4935 संख्या तयार होते.
*शैक्षणिक निष्पत्ती*
*=================*
*👉या गणिती शैक्षणिक साहित्याच्या मदतीने संख्या तयार करुन लेखन वाचनाचा सराव घेता येतो.*
*🔹असेही करुन पाहा🔸*
*==================*
*👉 या शैक्षणिक साहित्याच्या मदतीने अंकवाचन, लेखन, एकक, दशक, शतक, हजार, संख्येची विस्तारित मांडणी, नाणी नोटा तयार करणे, मागची पुढची संख्या सांगणे व इतर क्रियांचा सराव घेता येतो.*
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
*रंगनाथ सगर, लातूर*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल*
📞 *97 63 534721* 📞
════════════════
┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄
0 Comments