🕸 बोधकथा--हंस आणि बगळे 🕸


           *🕸 बोधकथा 🕸*

     *हंस आणि बगळे*
      
    *एकदा एका शेतात काही बगळे* *आणि हंस होते. काही पारध्यांनी ते पाहून त्यांच्यावर अचानक हल्ला केला.*
  
      *तेव्हा बगळे हलके आणि चपळ असल्याने ते तात्काळ उडून गेले. परंतु हंस मात्र जड अंगाचे असल्याने ते वेळेवर उडू शकले नाही व पारध्यांच्या हाती सापडले.*

*तात्पर्य :-*
   *जडपणा आणि आळशीपणा आपल्या अंगी कधीही जडू देऊ नये. कारण त्यांच्यामुळे आपले कधी ना कधी तरी फार मोठे नुकसान होते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Post a Comment

0 Comments