माझी शाळा,माझे उपक्रम 〇 🏆भाषिक खेळ🏆पाकळ्या आणि फुले

▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
〇 *_माझी शाळा,माझे उपक्रम_* 〇
*🏆भाषिक खेळ🏆*
════════════════
*_🍃🍂पाकळ्या आणि फुले 🌹🌺_*
━━━━━━━━━━━━━━━━
*_सध्याला सर्वत्र लाॅकडाउनमुळे विद्यार्थी शाळेच्या शैक्षणिक प्रवाहापासून दुर गेला आहे. तो सध्याला घरीच आपल्यामुळे त्यांच्या बुध्दीला खुराक मिळावा या उद्देशाने "पाकळ्या आणि फुले" या भाषिक उपक्रम आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठीचा हा हट्टहास आपण आपल्या विद्यार्थी पालक गुपवर हा उपक्रम पाठवून द्यावा व उपक्रमाची यशस्वीता तपासून घ्यावी हीच विनंती._*

*_🎍उपक्रमाचा मुख्य उद्देश 🎍_*
===================
पाकळ्या आणि फुले या भाषिक खेळाचा मुख्य उद्देश मुलांनी जास्तीत जास्त समानार्थी शब्द बनविणे हाच आहे.

*🔸उपक्रमाची कृती🔹*
==============
💫पाकळ्या आणि फुले हा खेळ कितीही मुले खेळू शकतील.
💫 हा खेळ व्यक्तीग व गटात खेळाता येतो.
💫 या खेळासाठी वेळ तीन मिनिटाचा द्यावा.
💫खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे दिलेल्या अक्षरपाकळयापासून दिलेल्या अर्थाकरिता दोन अक्षरी शब्द फुले द्या.
*_🍃अक्षर पाकळ्या🍂_*
=======================
अक्षर पाकळ्या :- व. ब. क. च. घ. ध
ट. द. झ. ड. न. ळ.

*_उदाहरणार्थ :-फळांचा जुडगा - "घड"._*

१) पारंब्या आसलेले वृक्ष. २) शक्ती.  ३)बोल.
४)माराची खुण.   ५)एका पक्ष्यांचे नाव.  ६) पाहा.
७) हत्या.  ८) रान.  ९) कावा.  १०) भांडे.
११)संपत्ती.  १२) शरीर.  १३)लवकर. 
१४)नाटकात काम करणारा. 
१५)हिवाळ्यात गवतावर पडणारे थेंब.
१६) पाकळी.  १७)पाण्याची तोटी.
१८) एकसारखे पाहणे.  १९) रुची.
२०) सतत पाऊस पडत राहणे.
२१) पुजा करताना घालायचे वस्त्र.
२२) ही डोंगरात राहते.
   
              वरील दिलेल्या वाक्य किंवा शब्दासाठीचे समानार्थी शब्द /उत्तर वरील अक्षर पाकळ्यात लपले आहेत. मुलांना थोडंस मार्गदर्शन करुन त्यांना उत्तरे शोधण्यासाठी प्रवृत्त करावे.
जेणेकरून मुले आपल्या कल्पना शक्तीच्या जोरावर हसतखेळत उत्तरे शोधतील.

     *🍂उपक्रमातून फलनिष्पत्ती🍃*
====================
💫मुले पाकळ्या आणि फुले या भाषिक खेळातून समानार्थी शब्द हसतखेळत बनविण्याचा प्रयत्न करतील व त्यांच्या कल्पना शक्तीला आपोआप वाव मिळेल आणि त्यांच्या शब्दसंपत्तीत निश्चितच वाढ होई. 

📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
         *_रंगनाथ सगर, लातूर_*
       *_महाराष्ट्र शिक्षक पँनल_*
     📞 *_97 63 534721_* 📞
   ════════════════
  ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄
🏆🎍🎍👏👏🙏🏆
 वरील प्रश्नाची उत्तरे खालील प्रमाणे:-
१)वड.  २)बळ.  ३)वद.  ४)वळ.  ५) बक.
६)बघ.  ७)वध.  ८)वन.  ९) कट.    १०) घट.
११) धन.  १२) धड.  १३) झट. १४) नट. १५)दव.
१६)दळ.  १७)नळ.  १८)टक.  १९) चव. २०) झड.
२१)कद.  २२) घळ.

Post a Comment

0 Comments