#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
#३०_एप्रिल_१६५७
छत्रपती श्री शिवरायांनी जुन्नर या मोगली ठाण्यावर छापा टाकला.
काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवरायांनी औरंजेबाला दक्षिणेतील सुभेदार या नात्याने पत्र पाठवले होते.
औरंगजेबाने ही शिवरायांना आपला "प्रेमाचा" खलिता पाठविलेला होता.
त्या खलित्यात छत्रपती श्री शिवरायांनी "मोगलांचे अधिकारी" या नात्याने विजापूरकरांचा जो प्रदेश जिंकलेला आहे त्याला संमती दिलेली होती.
या संमती पत्राची तारीख आहे:- २३ एप्रिल इ.स.१६५७.
जुन्नर येथील मोगली अंमलदारांना वाटले की ज्या अर्थी शहजादाचे पत्र मिळाले त्या अर्थी शिवराय नक्की दिल्ली दरबाराचा निष्ठावान झाला.
पण या गैरसावधपणाचा पुरेपूर फायदा घेऊन महाराजांनी स्वतः जुन्नरला छापा घातला व लक्षावधी रूपयांची संपत्ती गोळा केली.
दात कोरायला काडीही शिल्लक ठेवली नाही. त्यामध्ये महाराजांनी साडे दहा लाख रुपये, हिरे, मोती, सातशे घोडे हस्तगत केले.
#३०_एप्रिल_१६५७
मराठा सरदार मिनाजी भोसले यांचा नगर जवळील श्रीगोंद्यावर छापा.
#३०_एप्रिल_१६५७
मुघल फौजेने किल्ले राजगडवर केलेलं आक्रमण मराठा फौजांनी उधळून लावलं.
🚩🏇🏻🚩

0 Comments