वीर_बाजीराव_पेशवा


🚩
#वीर_बाजीराव_पेशवा🚩
दिल्लीचा वजीर "मोहम्मद खान बंगश"
छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला.
तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली.
बंगश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते व त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावना एक पत्र पाठवले कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता.
टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगशवर चालून गले.
ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगशला काहीच समजले नाहि.
बेसावध बंगश एका गढीत अडकला.
बाजीरावांच्या झंजावातापुढे मोगल हैराण झाले.
मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली.
३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले ,
या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून,
नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने
२८ एप्रिल १७४० (वैशाख शुद्ध शके १६६२)
रोजी पहाटे थोरले बाजीराव यांचे निधन झाले.
फक्त ४० वर्षांच्या जीवनात ४७ लढाया जिंकल्या.
थोरले बाजीराव हे अपराजित सेनापती होते.
बाजीरावांनी वयाच्या अकराव्या वर्षीच दिल्ली
पाहिली होती.
सर्व हिंदुस्थान त्यांनी नजरेत भरून घेतला.
बाजीरावांनी दिल्लीवर स्वारी केली तेव्हा तत्कालीन बादशहा जीव मुठीत धरून लपून बसला.
संपूर्ण दिल्ली हादरली परंतु 'दिल्ली महास्थळ पातशहा बरबाद जालियात फायदा नाही'
या पत्रामुळे बाजीरावांनी दिल्ली हातात आली असतानाही सोडून दिली.
' श्री राजा शाहू नरपति हर्षनिधान
बाजीराव बल्लाळ पंतप्रधान '
ही मुद्रा धारण करणार्‍या बाजीरावांकडे कोणतेही छक्केपंजे नव्हते.
नेपोलियनने जसे सामान्यांतून मार्शल निर्माण केले तसे बाजीरावांनी अठरापगड जाती-जमातीतून लढवय्यै सरदार निर्माण केले.
संबंध भारतभूमीत स्फुल्लिंग पेटवला, अस्मिता निर्माण केली.
अस्थिर झालेल्या स्वराज्याला त्यांनी स्थिर केले एवढेच नाही तर संभाव्य विस्ताराचा मार्ग आखून दिला.
हिंदुस्थानच्या इतिहासात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून दिले.
एवढा अफाट साम्राज्य विस्तार करताना ते कधीही विश्रांतीसाठी थांबले नाहीत.
खर्‍या अर्थाने ते कर्तबगार,
खर्‍या अर्थाने थोरले,
खर्‍या अर्थाने ते श्रीमंत होते.
#मुजरा_श्रीमंत🙏

Post a Comment

0 Comments