मुख्याध्यापक यांची शैक्षणिक व प्रशासकीय कर्तव्ये व जबाबदा-या..

परिपत्रक
जिल्हा परिषद, पुणे.
जा.क्र.. प्राध-२,१११३/२०२१/ दिनांक ०९/०९/2021

विषय : मुख्याध्यापक यांची शैक्षणिक व प्रशासकीय कर्तव्ये व जबाबदा-या

वाचा:

१) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनयम २००९ (RTE)

२) प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम शासन निर्णय दिनांक १५/०६/२०१५

३) सातत्यपूर्ण व सर्वकष मूल्यमापन, शासन निर्णय पीआरई/२०१०/ (१३६/१००/प्रा.शि.५ दिनांक २०/०८/२०१०

४) माहिती अधिकार अधिनियम २००५

५) मुख्याध्यापक मार्गदर्शिका, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

६) महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१

७) महाराष्ट्र स्वयं अर्थसाहित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम २०१२

प्रस्तावना : प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि दर्जात्मक सुधारणा करण्यासाटी मुख्याध्यापकांची जवाबदारी महत्त्वाची आहे. अध्यापक, प्रशासक, व्यवस्थापक अशा विविध भूमिकेतून मुख्याध्यापकांना कार्य करावे लागते. शालेय शिस्त राखणे आणि शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी विविध शैक्षणिक उपक्रमांची कार्यवाही करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यांच्या दैनंदिन कामकाजातून शाळेचा दर्जा प्रतिबिंबोत होत असतो.

मुख्याध्यापक समाजाभिमुख असणे आवश्यक आहे. शाळेतील भौतिक सुविधा, शाळेचे बाह्यांग, शालेय दप्तर सुव्यवस्थित ठेऊन शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवणे, विकसीत करणे याकामी शाळा, समाज व प्रशासन यामध्ये समन्वयक साधून नेतृत्त्व करणे अपेक्षित आहे.

विविध नियमानुसार प्रशासन चालवून शालेय व्यवस्थापनही कुशलतेने करणे हे मुख्याध्यापक म्हणून काम करतांना एक आव्हान असते. शालेय व्यवस्थापन करतांना शिक्षक, विद्यार्थी, पालक, समाज, अधिकारी, NGO, विविध संस्थांचे प्रतिनिधी यांचेशी मुख्याध्यापकांचा संबंध येत असतो. विविध अंगी कार्यातून शाळेचा विकास करतांना मार्गदर्शक ठरतील अशा काही बाबी सुनिश्चित करणे हे प्रशासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार पुढील नमूद मुद्यानुसार मुख्याध्यापकांनी शाळाविकास करावा. सदर परिपत्रक जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी लागू राहील.

शाळाप्रमुख

१) शाळेचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कर्तव्ये व जबाबदारी स्विकारुन पार पाडणे,

२) मुख्याध्यापक म्हणून शाळेचे सर्वच क्षेत्रात नेतृत्त्व करणे. उदा. शाळेच्या भौतिक सुविधा विकसित करण्यामध्ये पुढाकार घेणे इ.

३) शाळेतील शिक्षकांचे शैक्षणिक नेतृत्त्व करणे. उदा. शिक्षकांना स्वतःच्या विविध क्षमता विकासाकरीता पाठिंबा देणे. मार्गदर्शन करणे, सहाय्य करणे.

४) शाळेच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी स्विकारुन कार्यरत राहणे. सहकारी शिक्षकांना जास्तीत जास्त प्रमाणात या उद्दिष्टामध्ये सहभागी करुन घेणे,

) विद्यार्थ्यांना विविध लाभाच्या योजनेंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे.

५ ६) शासनाकडून स्थापन केलेल्या विविध समित्यांमध्ये निर्धारीत पदांवर कार्य करणे. उदा. शाळा व्यवस्थापन समिती (SMC)' पालक शिक्षक संघ इ.

शैक्षणिक कर्तव्ये शाळा प्रवेश

१) शाळेचा मुख्याध्यापक म्हणून व अध्यापक म्हणून आपली कर्तव्ये व जबाबदा-या निष्ठापूर्वक पूर्ण करणे. उदा. प्रवेश पात्र विद्यार्थी शोध सूची तयार करणे, पात्र विद्यार्थ्यांचे १००टक्के प्रवेश पूर्ण करणे इ.

२) शाळेमध्ये प्रवेशपात्र सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, याकामी शाळा व्यवस्थापन समितीची मदत घेणे. (SMC)

३) शाळेच्या परिसरातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशीत करुन त्यांना शिक्षण देणे. याकामी शाळा व्यवस्थापन समितीची मदत घेणे. (SMC)

४) स्थलांतरीत प्रवेशित मुले शैक्षणिक वर्ष सुरु असतांना शाळा सोडून जाणार असतील तर अशा मुलांसाठी संचयी नोंदपत्रक देणे.

५) शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणा-या परिसरातील व इतर विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देणे,

६) शाळेच्या परिसरातील काही मुले शाळाबाह्य असतील तर शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य घेऊन सर्व विद्यार्थी प्रवेशित होतील याची कार्यवाही करणे.

७) शाळेच्या परिसरातील सर्व दिव्यांग विद्यार्थी शाळेत दाखल करुन घेणे. याकरीता विशेष शिक्षक व तालुका स्तरावरील विशेष साधन व्यक्ती यांची मदत घेणे.

८) शाळेत समावेशीत शिक्षण प्रक्रियानुसार सर्व मुले एकत्रित शिकतील याची कार्यवाही करणे.

९) शाळेत प्रवेश घेण्यासाठी काही वयानुरुप बालके आल्यास त्यांना वयानुरुप इयत्तेमध्ये प्रवेश देणे.

शैक्षणिक कार्याचे संचालन नियोजन

१) शाळेतील शिक्षकांना इयत्ता, विषय यांचे वितरण करणे.

२) शाळेचे वेळापत्रक सहकारी शिक्षकांच्या सहभागातून करुन घेणे.

३) शिक्षकांकडून शाळेच्या कामकाजाबाबत वार्षिक नियोजन / साप्ताहिक वार्षिक नियोजन, दैनिक पाठ नियोजन करुन घेणे,

४) सहशालेय उपक्रमांच्या अंमलबजावणीबाबत शिक्षकांना उपक्रमनिहाय जबाबदारीचे वाटप करणे.

५) दीर्घ सुट्टीनंतर शाळा सुरु होण्यापूर्वी स्वच्छता, भौतिक साधनांची उपलब्धता, उपयोगिता इत्यादीबाबत शाळापूर्व तयारी करणे. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करणे.

६) शाळेत वर्षभरात करावयाच्या मूल्यमापन विषयक बाबींची जबाबदारी शिक्षकांना वितरीत करुन त्यासाठी आवश्यक नोंद रजिष्टर उपलब्ध करुन देणे,

७) विद्यार्थी हजेरी, शिक्षक हजेरी, प्रवेश फॉर्म व शाळेसाठी आवश्यक असणारे नोंद रजिप्टर्स उपलब्ध करुन घेणे,

१) शालेय परिसर, वर्गखोल्या, ग्रंथालय, शिक्षक / शिक्षिका कक्ष, मैदाने, स्वच्छतागृह इत्यादी बाबी शाळा सुरु होण्यापूर्वी स्वच्छ करुन घ्याव्यात व नियमित स्वच्छ राहतील याबाबत दक्षता घ्यावी

स्वच्छता

२) शाळेतील विद्यार्थ्यांना संभाव्य धोक्याचे/ इजा करणारे काही साहित्य असल्यास ते योग्य प्रकारे ठेवण्यात यावे. वर्गखोलीत साहित्य जमा असल्यास दीर्घ सुट्टीनंतर विद्यार्थी लगेच अशा वर्गात न बसवता पूर्ण दक्षता घेऊनच विद्यार्थी वर्गात बसवावेत.

३) विद्यार्थ्यांना विविध साथ रोगांबाबत परिस्थितीनुसार माहिती देण्यात यावी. त्या अनुषंगाने साधने वापरण्यास सांगावे. उदा. कोविडच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे इ.

४) स्वच्छतागृहाचा वापर करणेवायत सर्व विद्यार्थ्यांना सूचित करावे. स्वच्छतागृह वापरण्यासाठी सुयोग्य स्थितीत चालू ठेवावे.

५) शाळेतील विद्याथी हाताळतील अशी सर्व साधने, घंटा, नकाशे, क्रीडा साहित्य स्वच्छ करुन वापरण्यास सज्ज ठेवावीत.

आपत्ती व्यवस्थापन

१) शाळेमध्ये अचानक कोणत्याही प्रकारची आपत्ती निर्माण होणार नाही यासाठी पूर्व काळजी / दक्षता घेण्यात यावी. उदा. वीज कनेक्शनमध्ये स्पार्किंग होत असल्यास वेळीच दुरुस्त करुन घ्यावे.

२) शाळेमध्ये आपत्ती व्यवस्थापन बाबत विद्यार्थी व शिक्षक यांना सर्वसाधारण सूचना द्याव्यात,

३) आपत्तीमध्ये मदत करणा-या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे संपर्क क्रमांक शाळेत असावेत,

४) विद्यार्थ्यांना व्यक्तीगत स्तरावर काही धोके होऊ नयेत यासाठी परिसरातील धोकादायक टिकाणे, वस्तू इत्यादी बाबत पूर्वसूचना देण्यात याव्यात. उदा. शाळेजवळ विहीर असल्यास, रस्ता असल्यास इ.

५) शाळेत चालू स्थितीतील अग्निशमन यंत्र सातत्याने उपलव्ध राहिल याची दक्षता घ्यावी.

६) धोकादायक इमारतीपासून विद्यार्थ्यांना धोका पोहचणार नाही यासाठी नियोजन करावे.

१) शाळापूर्व तयारी नंतर शाळा प्रत्यक्ष सुरु होताच मोफत पाठ्यपुस्तके योजनेतील पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात यावीत

२) विद्याथ्यांना उजळणी स्वरुपात अध्ययन अध्यापन सुरु करण्यात यावे.

३) प्रत्येक विद्यार्थ्यांचा अध्ययनातील सहभाग हा आनंददायी व बालस्नेही वातावरणातून /पद्धतीने घ्यावा. RTE २००९ च्या अधिनियमानुसार कलम क्र. १७ चे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.

४) प्रत्येक विद्यार्थ्यांकरीता अध्ययन साहित्य, अध्ययन पूरक कृती या कृति आराखड्यानुसार निश्चित कराव्यात. मूल निहाय कृति आराखडा तयार करावा.

५) प्रत्येक विद्यार्थी प्रभुत्त्व पातळीपर्यंत अध्ययन घटकाचे संपादन करेल यासाठी. शाळेतील शिक्षकांकडून नियोजनपूर्वक अध्यापन करुन घ्यावे. मुख्याध्यापकांनी स्वतः नियोजित विषयाचे वर्गाचे अध्यापन करावे,

६) विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा विचारात घेऊन अध्यापन करावे.

७) विशेप संपादणूक दर्जा असणा-या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अध्ययन अनुभवांची रचना करुन अध्यापन करावे.

८) अपेक्षित संपादणूक दर्जा प्राप्त करु न शकणा-या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व मूलनिहाय नियोजन करुन अध्यापन करावे.

९) शाळेतील शिक्षकांकडून अध्यापनाद्वारे अपेक्षित क्षमता संपादन करण्यात विद्यार्थ्यांना अडचणी असल्यास CRC/BRC/DIET यांच्याशी संपर्क करुन अडचणी सोडवाव्यात.

१०) शाळेतील मूल्यमापन हे RTE २००९ कलम २९ नुसार करण्यात यावे

११) शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन प्रक्रियेची अंमलबजावणी करावी.

१२) विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या नोंदी वेळोवेळी नोंद करुन ठेवाव्यात

१३) विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या नोंदी घेताना फक्त सकारात्मक नोंदी घ्याव्यात. नकारात्मक नोंदी घेऊ नये.

१४) वेळोवेळी नैदानिक चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांच्या संपादणुकीत असणा-या अडथळ्यांचा शोध घेऊन उपाय करावेत. या कामी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे चे
अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन

मार्गदर्शन घ्यावे.

१५) शाळास्तरावर नैदानिक चाचण्यांची निर्मिती करुन आयोजन करण्यात यावे. अधिक मार्गदर्शन हवे असल्यास विषय साधन व्यक्ती किंया डायटची मदत घ्यावी.

१६) प्रत्येक विद्यार्थी किमान कर या श्रेणीपर्यंतच्या अध्ययन पातळीपर्यंत संपादणूक प्राप्त करेल यासाठी अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन प्रक्रिया कार्यान्यीत करावी.

१७) विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या बाबी शाळा व्यवस्थापन समिती (SMC) बैठकांमधून सादर करण्यात याव्या, तसेच काही विद्यार्थ्यांना शाळा स्तरावरील कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या सोडविण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य घ्यावे.

१८) इयत्ता आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण पूर्तता प्रमाणपत्र देण्यात यावे.

स्पर्धा परीक्षा

१) शाळेतोल विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांबाबत माहिती देण्यात यावी. स्पर्धा परीक्षांना बसणेबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात यावे.

२) स्पर्धा परीक्षेस पात्र विद्यार्थ्यांना आवेदनपत्र भरणे, त्यासाठी आवश्यक इतर कागदपत्र यासाठी मार्गदर्शन करणे.

३) शाळास्तरावर, वर्गस्तरावर विविध स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन तासिकांचे नियोजन करुन शिक्षकांच्याकडून नियोजनाप्रमाणे मार्गदर्शन उपलब्ध करुन द्यावे.

४) जवाहर नवोदन विद्यालय प्रवेश पूर्व परीक्षा, विद्या निकेतन प्रवेश पूर्व परीक्षा, सैनिकी विद्यालय प्रवेश पूर्व परीक्षा, क्रीडा प्रबोधिनी प्रवेश पूर्व चाचणी, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इत्यादी.

शैक्षणिक साहित्य

१) विद्यार्थ्यांना शिकण्यास पूरक, पोषक व संकल्पना स्पष्ट करणारे शैक्षणिक साहित्य शाळास्तरावर, वर्गस्तरावर, शिक्षकांकडून तयार करुन घ्यावे.

२) प्रत्येक मूल शिकते करण्यासाठी मूलनिहाय व स्तरनिहाय शैक्षणिक साहित्य शाळेमध्ये उपलब्ध करुन घ्यावे,

३) काही आवश्यक व वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रतिकृती, चार्टस् खरेदी करणे या व्यतिरिक्त जास्तीत जास्त शैक्षणिक साहित्य शिक्षकांनी स्वतः तयार करावे.

४) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचेकडून शैक्षणिक साहित्य तयार करणे, वापरणे याकरिता प्रशिक्षणाची मागणी करावी.

ग्रंथालय

१) शाळेतील ग्रंथालय सतत वापरात ठेवावे.

२) ग्रंथालयातील पुस्तके वाटप, जमा नोंद वेळच्या वेळी ठेवण्यात याव्यात.

३) ग्रंथालयातील ग्रंथ संपदा विविध मार्गानी वाढवावी. उदा. पुस्तके ग्रंथालयास भेट देणे, वाढदिवसानिमित्त ग्रंथ, पुस्तके भेट देणे,

४) वाचून झालेली, आवडती पुस्तके ग्रंथालयास भेट देणे इ.

५) CSR मधून ग्रंथ संपदा वाढविणे इ.

सहल /क्षेत्रभेट

१) शिक्षणाधिकारी यांच्या पूर्व परवानगीने शाळेमार्फत विविध उद्देशाने सहलीचे आयोजन करण्यात यावे. उदा. ऐतिहासिक सहल, वैज्ञानिक सहल, भौगोलिक सहल इ.

२) शाळेच्या परिसरातील ऐतिहासिक, भौगोलिक, नैसर्गिक परिसरात हेतूपर्वक क्षेत्रभेटीचे नियोजन करुन क्षेत्रभेटी कराव्यात.

तंत्रज्ञान व सुरक्षा

१) शाळेतील माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या अध्ययन, अध्यापनासाठी तंत्रज्ञानाचा व साधनांचा वापर करण्यात यावा

२) शाळेतील शिक्षकांना विविध साधने, APP वापरणेबाबत प्रोत्साहित करुन अध्ययन अध्यापन मूल्यमापन प्रक्रिया अधिक गतिमान करुन तंत्रज्ञानाच्या मदतीने शैक्षणिक गुणवत्ता विकास करावा.

३) तंत्रज्ञानविषयक साधने वापरताना सायबर सुरक्षा नियमावलीचे पालन करण्यात यावे.

४) शाळेतील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान साधने वापरताना घ्यावयाची काळजी याबाबत सूचना देऊन योग्य ती काळजी घ्यावी. कोणतेही आक्षेपार्ह दृश्य विद्यार्थ्यांना दाखविणे अशा बाबी शाळेत घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी

५) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) कडून शिक्षकांना तंत्रज्ञान साधनांचा अध्ययन, अध्यापन व मूल्यमापनातील वापर याबाबत आवश्यकतेनुसार प्रशिक्षण मागणी करुन प्रशिक्षण द्यावे.

आरोग्य

१) शाळेत विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना व्यक्तिगत व सार्वजनिक ठिकाणी आरोग्याबाबत पाळावयाच्या सूचना द्याव्यात

२) अत्यावश्यक सूचना शाळेच्या, वर्गाच्या दर्शनी भागावर सर्वांना वाचता येतील अशा पद्धतीने लिहाव्यात / लावाव्यात.

३) शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन घ्यावी. शाळास्तरावरील तपासणीमधून ज्या विद्यार्थ्यांना पुढील तपासणीसाठी रेफर केले जाईल. अशा विद्याथ्यांच्या पालकांची भेट बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबतच्या सर्व वैद्यकीय वाबींची पूर्तता करुन घ्यावी.

४) वैद्यकीय तपासणीतून ज्या विद्यार्थ्यांना दिव्यांग विद्यार्थी म्हणून गणले जाईल अशा विद्यार्थ्यांना विशेष शिक्षक, विशेष तज्ञ यांचेमार्फत पुढील कार्यवाहीसाठी नोंदवावे. याकामी गटसाधन केंद्र व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) यांचे मार्गदर्शन घ्यावे.

परीपत्रकात नमुद उपरोक्त बाबीशिवाय स्थानिक गरजा व उपक्रमनिहाय बाबींची अंमलबजावणी करुन मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त गुणवत्ता विकसित करावी.
आयुष प्रसाद, भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

प्रति,
गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती (सर्व)


Post a Comment

0 Comments