“देवदत्त सेनानी-थोरले बाजीराव पेशवे


“आपल्या अद्वितीय पराक्रमाने “रायाच्या नावे येथे सर्व गर्भगळीत होतात’ असा दरारा निर्माण करणारे, वीस वर्षांच्या वादळी कारकिर्दीत पराक्रमाचे नवनवे अध्याय रचणारे, विविध मोहिमांमध्ये सुमारे पावणेदोन लाख किलोमीटरची घोडदौड करणारे, “देवदत्त सेनानी” असा लौकिक मिळविणारे, तसेच मराठा साम्राज्याचा दरारा उभ्या हिंदुस्थानावर निर्माण करणारे थोरले बाजीराव पेशवे यांचे स्मरण ठेवणे आवश्‍यक आहे,”बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासून रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४० (वैशाख शुध्द शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले.

Post a Comment

0 Comments