स्वराज्याचे_प्रवेशद्वार “किल्ले गोरखगड”


#स्वराज्याचे_प्रवेशद्वार 
“किल्ले गोरखगड”  
“स्वराज्याचे प्रवेशद्वार” या उपक्रमाच्या माध्यामतून तिसरा दरवाजा बसविण्याचा मान मिळाला तो बुलंद असलेल्या गोरखगडला.  कल्याण नाणेघाट जुन्नर ते प्रतिष्ठान (पैठण) या सातवाहन कालीन व्यापारी मार्गावर देखरेख ठेवणारा, तसेच नवनाथ संप्रदायातील गोरक्षनाथ यांच्या साधनेचे ठिकाण असलेला हा किल्ले गोरखगड. या गडावरील प्रवेशद्वारास लाकडी सागवानी कवाड दिनांक १८ ऑक्टोबर २०१८ रोजी विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर स्वराज्यासाठी लोकार्पण करण्यात आले. या दरवाजासाठी आलेला सर्व खर्च हा लोकसहभागातून निधी उभारून करण्यात आला आहे.
“सह्याद्रीचे दुर्गसेवक”
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र 
(घेतलेला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)

Post a Comment

0 Comments