#आज_महाराष्ट्र_दिन_आणि_कामगार_दिन...!
【चला कोरोनाला हरवायचा संकल्प करूया】
आजच्याच दिवशी १ मे, १९६० रोजी मुंबईसह,
संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली..🙏
दिनांक २१ नोव्हेंबर १९५६ दिवशी मुंबईतील फ्लोरा फाउंटनचा भाग तणावग्रस्त होता.
कारण होते राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला नाकारलेली मुंबई.
मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या प्रकारामुळे महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेेत रोष निर्माण झाला.
महाराष्ट्रात सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता.
या सभामधून कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.
प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत,
फ्लोरा फाउंटनजवळ जमला.
मोरारजी देसाई यांच्या आदेशाने, मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला.
मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या सत्याग्रहीं मुळे हे प्रयत्न अयशस्वी झाले.
पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला.
या गोळीबारात १०७ आंदोलक हुतात्मे झाले.
या हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन ता. १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली.
त्यानंतर सन १९६५ मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.
महाराष्ट्रदिनाच्या दिवशी या हुतात्म्यांचे स्मरण करूया..🚩
महाराष्ट्र आणि त्याची धग जागती ठेव्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या त्या शूर हुतात्म्यांना त्रिवार सलाम🚩

0 Comments