ऐतिहासिक_दिनविशेष #२_मे_१६५६/२_मे_१६६५


🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
#२_मे_१६५६
शिवरायांनी किल्ले रायरी उर्फ रायगड ताब्यात घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला.
शिवाजी राजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.
🚩#२_मे_१६६५
दाऊद खान कोंढण्याच्या (सिंहगड) दिशेने.
राजगडावरून प्रचंड मार खाऊन निघालेला दाऊद खान मराठ्यांच्या रेट्यासमोर टिकेनासा झाला.
राजगड पासून २ कोस मागे हटून आपला तळ गुंजण घेेऱ्याजवळ देऊन खेड शिवापूरच्या दिशेने नासधूस करत तो कोंढण्याच्या दिशेने निघाला
#२_मे_१६८३
शिवरायांच्या सांगण्यावरून राज्यव्यवहार कोष तयार करणारे मुत्सद्दी कारभारी "रघुनाथ नारायण हणमंते" यांचे निधन.
शिवरायांच्या सांगण्यावरून
रघुनाथपंतानें 'राजव्यवहार कोश,
रचिला आणि आपल्या सर्वाना शब्दाचा रास
उघड झाला.
आजही मराठीतील प्रचिलित असलेले
शब्द शिवराज्यकोशात असल्याचे पाहून
आनंद होतो . .🙏
सचिव , मंत्री , सभासद , न्यायधीश ,
दुर्ग , कोशागार , शस्त्रागार , चषक ,
सभा , लेखा , आय - व्यय (जमाखर्च ) , वेतन , ऋण , पतिभु (जामिन ) , कारागृह , आयपत्र , सहकारी , अनुक्रमणिका , सवांद , गणना.
असे अनेक असंख्य शब्द आजही आपल्या वापरात आहे.
राज्यव्यवहारकोश विविध आठ
नावांनी ओळखला जातो .
१) राज्यव्यवहारकोश
२) राजकोश
३) शिवचरित्रप्रतीप
४) राजकोश नीघुन्तु (#ट)
५) व्यवहारकोश
६) शिवराजकोश
७) श्री छत्रपती राजकोश
८) श्री छत्रपती राज्यव्यवहारकोश
#संदर्भ:-''शिवराजकोश''

Post a Comment

0 Comments