इतिहासाची साक्षी देत शत्रूंपासून संरक्षण करण्यास सुलभ जावे आणि सभोवतालच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता यावे म्हणून एकाकाळी अरबी सागरावर अमर्याद हुकूमत गाजवणारा “मुरुडचा जंजिरा”....🚩
दराऱ्याने पश्चिम सागरावर प्रभुत्व गाजवणारा जंजिरा म्हणजे एक देखण दुर्गशिल्प आणि बेटावर मेढेकोट ह्याबाबत थोडक्यात :
जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रुढ झालेला आहे अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरुन तो आलेला आहे जझीरा म्हणजे बेट या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता.. दराऱ्याने पश्चिम सागरावर प्रभुत्व गाजवणारा जंजिरा म्हणजे एक देखण दुर्गशिल्प आहे जंजिरा स्वतंत्र कोळी राजाच्या सत्तेखाली होता कदाचित हा शासक जंजिऱ्याचा जनक असला पाहिजे यादव राज्य बुडून सुलतानी राज्य आल्या नंतरपण सन १४९० पर्यंत हा किल्ला स्वतंत्र होता या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता त्यावेळी राजपुरीला मुख्यत: कोळी लोकांची वस्ती होती या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहेमीच उपद्रव होत असे तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे रहात असत त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला १४८५ मध्ये जुन्नरच्या मलिक अहमदने जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण अभेद्य किल्ला आणि रामराव कोळीचा पराक्रम ह्या पुढे मलिकने हात टेकले त्यामुळे निजामशाहाने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही याची कल्पना पिरमखानाला होती तो अतिशय चतुर होता चार वर्षानंतर एक व्यापारी जहाज जंजिऱ्याच्या तटाला लागले पेरीमखानाने व त्याच्या सिद्दी नोकरांनी आपण व्यापारी असुन सुरतेहून आल्याची बतावणी केली व आसरा मागितला...
➖➖➖➖➖➖➖
फोटोग्राफी : सतीश कोळी...♥️

0 Comments