▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
➖🕳♍💲🅿🕳➖
*_रंगनाथ सगर,लातूर_*
❱❱ *_महाराष्ट्र शिक्षक पँनल_* ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
〇 *_माझी शाळा,माझे उपक्रम_* 〇
*_🔸गणिती उपक्रम🔹_*
════════════════
*_📚 संख्याज्ञानाची साधने/माध्यमे📚_*
━━━━━━━━━━━━━━━━
*_सध्याला लाॅकडाउन मुळे आपली पहिली दुसरीची मुले घरीच आहे. त्यांना खेळायला खुप आवडते त्याच्या बालविश्वात तो विविध खेळणी घेऊन तो खेळत आसतो तोच खेळ आपण त्याला गणित विषयासाठी उपयोगात आणता येतो. पालकांना थोडंस मोबाईल वरुन मार्गदर्शन केले की आपला विद्यार्थी व पालकाचा पाल्य हसतखेळत संख्या व त्यावरील क्रिया शिकू शकतात आपली शिक्षक म्हणून फक्त मार्गदर्शकाची भुमिका असेल तर तर संख्याज्ञानाची साधने /माध्यम या उपक्रमांविषयी माहिती घेऊ._*
*_मुलांना संख्या व त्यावरील क्रिया शिकवताना पुढील माध्यमाचा आणि साधनाचा जास्तीत जास्त वापर केला लवकरात लवकर विद्यार्थी संख्याज्ञान होते._*
*_💠संख्याज्ञानाची साधने /उपक्रम_*💠
*====================*
*_🔸वस्तूरुपभाषा👉_*
▪🔹🕳🖌📚🍇
*_ठोकळे, मणी, बिया, चिंचोके इत्यादी वस्तूरुप साधने वापरून अंक ज्ञानाची ओळख करुन देता येते._*
_उदा. ताई जवळ किती पेन आहेत?_
_@ताईजवळील तीन पेना आण?_
*_🔹कृतीभाषा_*👉
🖐🖐🙋♀🙋♀🕺🕺
*_शिक्षकांनी स्वतः उभे राहून, उड्या किंवा बोटाच्या साह्याने अंक विद्यार्थ्यांना शिकविता येतात._*
_उदा. राम चार उड्या मार?_
*_🔸ध्वनीभाषा👉_*
👏🧙♀🔈🔊📢📣
*_टाळया-टिचकया वाजवून अंकाची ओळख करून देता येते._*
_उदा. पाच टाळ्या वाजव?_
_@मी किती टाळ्या वाजवल्या?_
*_🔹चित्रभाषा👉_*
🐘🐘🐋🐳🐬🐟🐇
*_संख्येइतकी चित्रे दाखवून किंवा स्वतः काढायला लावून अंकज्ञान मुलांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करता येतो_.*
_उदा. टेबलावर किती हत्तीचे चित्र आहेत?_
_¶ भिंतीवर चित्रात किती पक्षी आहेत?_
*_🔸व्यवहारातील बाबी👉सभोवताली आसलेल्या गोष्टींमधून किंवा अनुभवलेल्या घटनांतून संख्या किंवा त्यावरील क्रियाची संकल्पना मुलांत रुजवता येते. उदा. बागेत आंब्याची झाडे किती आहेत?_*
*_👉काल आपली ताई किती वाजता घरी आली?_*
*_🔹अंकचिनहाची भाषा👉 वरील सर्व भाषांमधून एक अंकी संख्याची संकल्पना पक्की झाल्यानंतरच अंकचिन्हाचे कार्डची ओळख करून द्यावी._*
*_वरील उपक्रम घेताना कधी वस्तू वापरून, कधी ध्वनीप भाषा वापरुन तर कृती भाषा वापरून घेतले तर मुलांना अंक ज्ञान लवकरात अवगत होते व गणिती संकल्पना रुजतात._*
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
*_रंगनाथ सगर, लातूर_*
*_महाराष्ट्र शिक्षक पँनल_*
📞 *_97 63 534721_* 📞
════════════════
┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄
0 Comments