पाडोपाडी होडीवल्हवत जाणाया अंगणवाडी सेविका
नर्मदा काठावर टापूचा परिसर असलेल्या पाड्यांवर होडीनं प्रवास करून घरोघर जाणा-या टेलू वसावे.
लोकमत दि.1/11/2020
सातपुड्यातील रेलू वसावे. हे नाव सर्वदूर चर्चेत आहे. नर्मदा काठावर टापूचा परिसर असलेल्या पाड्यांवर होडीनं प्रवास करून आणि डोंगरद-यात पायपीट करून कुपोषित बालकं, स्तनदा माता,गर्भवती माता, किशोरवयीन बालिका यांना पोषण आहार व महिला बालकल्याण विभागातर्फे पुरवल्या जाणाऱ्या सेवा देणाऱ्या या अंगणवाडीसेविकेचे कार्य तिच्या कामाप्रतिच्या निष्ठेमुळे आणि त्यासाठी घेत असलेल्या कष्टामुळे कौतुकास्पद ठरलं आहे.चिमलखेडी, ता.अक्कलकुवा हे नर्मदा काठावरील ६६३ वस्तीचं गाव. एकूण सात पाड्यात हे गाव विभागलं आहे. या गावाला जाण्यासाठी आजही रस्ता नाही. अक्कलकुवा या तालुक्याच्या ठिकाणापासून मोलगी, पिंपळखुटा-डनेलपर्यंत रस्ता आहे. तेथून खाट नदीच्या पाण्यात सरदार सरोवर प्रकल्पाच्या पाणलोटाचा फुगवटा आल्यानं या पाण्यातून अर्धा तास होडीनं प्रवास केल्यानंतर चिमलखेडी हे गाव येतं. याच गावातील अंगणवाडीत रेलू वसावे याअंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. २०१४मध्ये त्या तिथं नोकरीला रुजू झाल्या. चिमलखेडी गावातील सात पाड्यांपैकी दोन पाडे अलिगडपाडा आणि दादरपाडा ही टापूची गावं. या पाड्यांच्या चौफेर पाणी असल्यान होडीतूनच या पाड्यांवर जावं लागतं. तर तर इतर पाच पाडे दोन ते पाच किलोमीटर अंतराव अंतरावर डोंगरदऱ्याच्या उतारावर वसलेली आहेत.
चिमलखेडी शून्य ते सहा अंगणवाडीत एकूण १३९ शुन्य ते सहा वयोगटातील बालक आहेत, तर १५ गरोदर माता, सात स्तनदा माता आणि ४७ किशोरी आहेत. लॉकडाऊनमध्ये शासनानं अंगणवाडीसेविकांना लाभार्थीच्या घरापर्यंत पोषण आहार पोहोचविण्याची जबाबदारी सोपवल्यान रेलू वसावे आणि त्यांची मदतनीस सावित्री वसावे या दोघी नियोजनानुसार सात पाड्यांमध्ये कधी पायपीट करीत तर कधी बोटीनं प्रवास करीत लाभार्थींच्या घरापर्यंत जातात आणि त्यांना पोषण आहार देतात.
रेलू वसावे यांचं शिक्षण बी.ए.पर्यंत झालं असून, त्यांचे पती रमेश वसावे हे देवमोगरा पुनर्वसन वसाहतीत शिक्षक आहेत. त्या चिमलखेडी येथेच वास्तव्याला आहेत. त्या
सांगतात पाड्यांवर गरज असेल तेव्हा पोहोचता यावं यासाठी भाड्याच्या बोटीवर अवलंबून राहाण्यापेक्षा स्वत: बोट चालवणं शिकून घेतलं. त्यामुळे दोन वर्षापासून जेव्हा कुणी सोबतीला नसतं तेव्हा एकटीनच पाड्यांवर जाता येत
या अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रात गेल्या सात वर्षात एकाही बालकाचा कुपोषणानं मृत्यू झाला नाही किंवा अर्भक मृत्यू व माता मृत्यूही नाही, असे त्या दाव्यानं सांगतात. त्यांच्या सेवेबाबत कार्यक्षेत्रातील लोकांमध्येही समाधान असल्यानं त्यांचे काम संपूर्ण सातपुड्यात आदर्श ठरलं आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनानेही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
-रमाकांत पाटील
(लेखक लोकमतच्या नंदुरबार आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)
तो प्रसंग आजही अंगावर शहारे आणतो...
नियमित पोषण आहार व अंगणवाडी सेवेसाठी बोटीनं पाण्यातून जाणाऱ्या रेलू वसावे यांना काहीवेळा जीवघेण्या प्रसंगांनाही सामोरं जावे लागलं. त्यातील एक प्रसंग सांगताना त्या म्हणाल्या, जुलै महिन्यात आपण व मणिबेलीच्या अंगणवाडीसेविका पोषण आहार घेऊन गमणहून बोटीनं चिमलखेडीकडे जात होतो. बोट सुरू केली आणि काही वेळातच जोरदार वादळासह पावसाला सुरुवात झाली. एक प्रसंग असा आला की, बोट बुडेल की काय अशी अवस्था निर्माण झाली. पण अशा प्रसंगी एक नावाडी देवदूत म्हणून मदतीला आला. त्याने अचानक आमची बोट खेचली आणि ती काठावर आणली आम्ही त्या जिवघेण्या प्रसंगातून बचावलो,आजही अंगावर शहारे येतात.
-रेलू रमेश वसावे,



0 Comments