११ जानेवारी लालबहादूर शास्त्री यांचा स्मृतीदिनानिमित्त विनम्र आभिवादन !
💐💐💐💐💐
आजकाल राजकारण म्हटले म्हणजे तत्वापेक्षा स्वार्थ , पैसा या गोष्टींचा विचार केला जातो. मात्र स्वातंत्र्यपूर्व काळात निस्वार्थ भावनेने देशहिताचे राजकारण करणारे अनेक नेते होऊन केले. त्यांतील एक तत्वनिष्ठ निस्वार्थ नेते म्हणजे लालबहादूर शास्त्री होय. लालबहादूर शास्त्री यांचा जन्म २ अॉक्टोबर १९०४ मध्ये उत्तरप्रदेशातील मोगलसराई येथे झाला. त्यांचे मूळ आडनाव श्रीवास्तव होते. मात्र त्यांना आपल्या विदवत्तेच्या बळावर काशी या विद्यापीठाची शास्त्री" ही पदवी मिळाली. त्यामुळे पुढे त्यांचे शास्ञी हे आडनाव रुढ झाले.अतिशय गरीबींच्या परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. गांधीजींच्या सविनय कायदेभंग चळवळ , भारत छोडो आंदोलन त्यांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांना नऊ वर्षाचा कारावास झाला. एकदा ते तुरुंगात असताना त्यांच्या मुलाला विषमज्वर झाला होता. त्यावेळी त्यांची काही काळ जामीनावर सुटका झाली.मात्र जामीनाची मुदत संपल्यानंतर ही मुलाची तब्येत बरी
झाली नाही. त्यावेळी ब्रिटिशांनी त्यांना सांगितले तुम्ही जर राजकीय चळवळीत भाग घेणार नसाल तर तुमची कायमची सुटका होईल. मात्र मुलापेक्षा देश महत्त्वाचा आहे असे म्हणून लालबहादूर शास्ञी तुरुंगात रवाना झाले. भारत स्वतंत्र झाल्यावर ते पहिले रेल्वे मंत्री झाले. त्यामुळे आध्रंप्रदेशात झालेल्या रेल्वे अपघाताची जबाबदारी घेऊन त्यांनी त्वरीत आपल्या पदाचा राजीनामा दिला. देशहितापुढे पदाचा त्यांना मोह नव्हता . पंडित नेहरुच्या मृत्यूनंतर दुसरे पंतप्रधान म्हणून त्यांनी पदभार सांभाळला. त्यावेळी भारतासमोर अन्न समस्या बिकट होती. तर दुसरीकडे पाकिस्तानचे संकट दरवाजा ठोठावत होते. अशा बिकट प्रसंगी " जय जवान जय किसान " हा नारा लालबहादूर शास्त्रींनी दिला. अन्नसमस्येतूनही मार्ग काढला. पाक सैन्याला चारीमुंड्या चीत करुन आपले प्रभावी नेतृत्व सिद्ध केले. आपली साधी राहणी उच्च विचारसरणीचे व्रत लालबहादूर शास्त्री शेवटपर्यत पाळले. असा निस्वार्थ पंतप्रधान आपल्याला जास्त काळ लाभला नाही. भारत-पाक युद्धाबाबत ताश्कंद येथे करार झाला. त्याच ठिकाणी लालबहादूर शास्त्री यांचा ह हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला असे सांगण्यात येते पण त्यांचे शवविच्छेदन झाले नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत शंका निर्माण केली जाते.

0 Comments