WORD BANK शब्दांची बॅक

▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
➖🕳♍💲🅿🕳➖
*सतीश कोळी, खुलताबाद*
❱❱ *महाराष्ट्र शिक्षक पँनल* ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬

〇 *अध्ययन निष्पत्ती साधू या..!!* 〇 ════════════════
*_WORD BANK_*
*_शब्दांची बॅक_*
━━━━━━━━━━━━━━━━
*_शब्दांची बॅक_* या उपक्रमातून इंग्रजी भाषेचे शब्द संग्रह वाढावा व वाचन, लेखन आणि संभाषण कौशल्य वाढीस लागावे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

*_🔡उपक्रमासाठी कृती🔠_*
 =================
👉 टिकाऊ खोके, डाईंग सिट, फळा, पेन.

      *_🔠उपक्रमाची कृती🔡_*
======================
💫खोक्याला पोस्ट बाॅक्सप्रमाणे आकर्षक करावे. त्यावर *_WORD BANK_*_(शब्दांची बॅक)_ असे नाव द्यावे.
💫 या उपक्रमाअंतर्गत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना *_खातेदार_* असे म्हणावे व त्यांच्या नावाची यादी तयार करण्यात यावी व सर्वाचे एकत्र *_BANK ACCOUNT_*_(बॅक खाते)_ तयार करावे.
💫वर्गात एका मोठ्या कार्डसीटवर खातेदारांची नावे लिहून त्यापुढे प्रत्येक दिवसाची *_शब्द बचत_*' संख्या लिहण्यासाठी *_महिन्याच्या तीस/एकतीस दिवसाचे_* रकाने करण्यात यावे.
💫 या उपक्रमाच्या सुरवातीला *_एक शब्द लेखन स्पर्धा_* घेऊन विद्यार्थ्यांचा *_शब्द संपत्तीचा अध्ययन स्तर_* लक्षात घ्यावे.
💫वर्गशिक्षकांनी आपापल्या वर्गात इयत्तेनुसार अभ्यासक्रमाप्रमाणे शब्द लिहून वर्गात एक  *_Word's Board_* _(शब्दांचा फळा)_  तयार करावा. यात *_एका महिन्यासाठी किंवा आडवडयासाठी उपेक्षित शब्द_* लिहावे.
💫फळ्यावरील शब्दांपैकी दररोज पाच शब्द पाठांतरासाठी द्यावे. जेवढे शब्द पाठ झाले आसतील त्यांची यादी करुन लिहावेत व *_बॅकेत जमा_* करावी व आपल्या खात्यावर त्यांची नोंद करावी.
💫याचप्रमाणे मुलांनी प्रतिदिनी २,४,५ याप्रमाणे शब्द पाठ करुन बॅकेत जमा केल्यावर आठवड्यात /महिण्याअखेर प्रत्येक सभासदांची बेरीज करुन एक लेखी स्पर्धा घेवून *_"महाठेवीदार"_* घोषीत करुन  त्यास  " *_LORD OF WORDS_* _( शब्दांचा राजा)_ हा घोषित करुन मुलांस पुरस्कार /बक्षीस देवून स्वागत करावे.
 *_हा उपक्रम इतर विषयासाठी देखिल घेता येतो_*

📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
         *सतीश कोळी, खुलताबाद*
       *महाराष्ट्र शिक्षक पँनल*
     📞 *91589 83616* 📞
   ════════════════
  ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

Post a Comment

0 Comments