धोडप किल्ला


सह्याद्रीतलं पहिलं प्रेम असणारा हा किल्ला अन ह्या सह्याद्रीतलं अलौकिक रत्न म्हणजे किल्ला “धोडप”...🚩

नाशिक जिल्ह्यातली सातमाळ डोंगररांग ही डोंगर भटक्यांची आवडती याच डोंगररांगेत किल्ला धोडप हा जणू काही आपले दंड थोपटून एखाद्या पहिलवानासारखा उभा आहे स्वत:च रांगड व्यक्तीमत्त्व असणारा हा किल्ला त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे नेहमीच लक्षवेधी ठरला आहे...

किल्ल्याच्या पूर्वाभिमुख असलेल्या कातळ कोरीव दरवाज्यावर बाहेरील बाजूस ‘फारशी’ भाषेत शिलालेख आहे महादरवाजा, सोनार माची, महादेव, गणेश, मारुति मंदिर, कमान व पायऱ्या असलेली विहीर, तोफ असे अनेक स्थापत्य येथे आहे किल्ल्याला प्रचंड भूगोलाप्रमाणे प्रचंड इतिहास सुद्धा आहे राघोबा दादा आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या संघर्षा मध्ये धोडपचे स्थान महत्त्वाचे आहे येथेच त्यांची दिलजमाई झाली होती....

किल्ल्याला प्रचंड भूगोलाप्रमाणे प्रचंड इतिहास सुद्धा आहे राघोबा दादा आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या संघर्षा मध्ये धोडपचे स्थान महत्त्वाचे आहे येथेच त्यांची दिलजमाई झाली होती नंतर इ.स १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रज अधिकारी ब्रिग्ज याने मराठ्याकडून जिंकून घेतला...

Post a Comment

0 Comments