〇 *अध्ययन निष्पत्ती साधू या..!!* 〇
*🥀चला वर्ग प्रगत करु या..!!*
════════════════
*📚 अध्ययन निष्पत्ती नुसार उपक्रम 📚*
*इयत्ता दुसरी - - विषय गणित*
*💠घटक-- टप्प्याने संख्या मोजूया💠*
━━━━━━━━━━━━━━━━
इयत्ता दुसरी वर्गातील गणित विषयातील *टप्प्याने संख्या वाचन* या संख्येच्या पाठातील साध्य करावयाच्या अध्ययन निष्पत्ती खालील प्रमाणे व त्या अध्ययन निष्पत्ती मुलांत रुजविण्यासाठी खालील उपक्रमाची मदत होते.
*🔹टप्प्याने संख्या मोजू या... 🔹*
*======================*
🥀दोन अंकी संख्या वर कृती करतात.
🥀99 पर्यंतच्या संख्याचे वाचन-लेखन करतात.
🥀दैनंदिन जीवनात वस्तुंच्या व अंकाच्या साह्याने पटीत पाढे तयार करणे.
*🌈अध्ययन निष्पत्ती प्राप्त होण्यासाठी उपक्रम /कृती🌈*
===================
🥀संख्या कार्ड क्रमांने मांडणे दिलेली संख्या कार्ड ओळखणे.
🥀मणीमाळेवर संख्या दाखवणे.
🥀दोन अंकी संख्या कार्ड वापरून दिलेला टप्पा ओळखणे.
🥀मणी, बिया, खडे वापरून टप्पा ओळखणे.
🥀 उड्या मारू या संख्याचे टप्पे सांगू या.
🥀फासा टाकून संख्या ओळखा.
🥀शतकवीर.
🥀100 ची सारणी वापरून टप्पा ओळखणे.
🥀टप्प्याने संख्या मोजू या.... .
लिहु या वाचू या.....
तर आज मी आमच्या दुसरी वर्गातील मुलांना टप्प्याने संख्या मोजू या... या गणिती क्रियासाठी टप्प्याने संख्या मोजणे.... हा उपक्रम घेतला. 👇
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
*❱❱टप्पात संख्या मोजू या.....*
*वाचू या लिहू या... ❰❰*
*=====================*
*👉शैक्षणिक साहित्य :-१०० संख्याचा चौरस व मणी.*
*👉 उपक्रमाची कृती 👈*
*====================*
🥀चार विद्यार्थ्यांचा गट करावा. गटनायक नेमावा.
🥀गटनायकाने संख्याचा चौरस समोर ठेवावा.
🥀गटनायकाने पहिल्या विद्यार्थ्यांला संख्या सुचवावी.
जसे:-१५ तसेच टप्पाही सुचवला जसे:- २ चा टप्पा.
🥀पहिल्या विद्यार्थ्यांने एक मणी १५ वर ठेवावा व इतर मणी क्रमाने २ टप्प्याने येणाऱ्या संख्यावर ठेवावेत जसे:-१५,१७,१९,२१,२३ याप्रमाणे मणी ठेवून संख्या मोठ्याने वाचून दाखवाव्यात.
🥀या प्रमाणे वेगवेगळा टप्पा सांगून -(२,३,४,५ टप्पा) सर्व मुलांना संधी द्यावी.
*या उपक्रमामुळे संख्यावाचन व लेखनाचाही सराव होतो आणि मुले हसतखेळत संख्या वाचन करतात.*
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
*सतीश कोळी, खुलताबाद*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल*
📞 *91589 83616* 📞
════════════════
┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄
0 Comments