माणगाव खो-यातील रांगणागड...🚩


१२ मे १६६७...

सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सिमेवर माणगाव खोऱ्यात ऐतिहासिक किल्ला रांगणागड...🚩

पूर्वेला सह्याद्री पर्वताच्या रांगा तर पश्चिमेला अथांग अरबी समुद्र या दोघांच्या मध्ये कोकण प्रदेश वसला आहे या प्रदेशात फिरताना निसर्ग सौंदर्य तर डोळ्याला भावतेच त्याशिवाय सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात दुमदुमलेला व अरबी समुद्राच्या लाटा लाटांवर उसळणारा इतिहास साद घालतो तो केवळ इथले गिरिदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट यांच्या अस्तित्वा मुळेच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरताना येथील सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर १४ गिरिदुर्ग पाहायला मिळतात आपल्या देशात आपलेच राज्य असावे या हेतूने प्रेरित होत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली स्वराज्याच्या रक्षणासाठी हजारो मावळे सरसावले महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील उंच उंच शिखरांवर गिरिदुर्ग म्हणजे मुके मावळेच उभे केले काही गिरिदुर्ग जिंकून घेतले त्यापैकी एक असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माणगाव खोऱ्यातील रांगणागड हा आहे...

हा गड शिलाहार घराण्यातील दुसरा भोज राजाने उभारला आहे इ.स ११७५ ते १२१२ हा या राजाचा कालावधी आहे यावरून हा गड ८०० वर्षांहूनही अधिक काळापूर्वीचा आहे हे लक्षात येते शिलाहारांची पन्हाळा ही राजधानी होती राजा दुसरा भोजने आपल्या कारकीर्दीत १५ किल्ले उभारले त्यापैकी रांगणागड हा शिवाजी महाराजांनी जिंकून घेऊन स्वराज्यात सामील केला प्रतापगडावर १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला यानंतर १८ दिवसांनी म्हणजे २८ नोव्हेंबर १६५९ रोजी महाराजांनी पन्हाळा जिंकून घेतला पुढे पावणगड, वसंतगड व विशालगडाबरोबरच रांगणागडही जिंकून घेतला १६९५ मध्ये रांगणागडावर राजाराम महाराजांना राज्याभिषेक करण्यात आला होता...

१४ एप्रिल ते १२ मे १६६७ या काळात रांगण्याला बहलोलखान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता परंतु शिवरायांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला शिवरायांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी ६००० होन खर्च केल्याचा पुरावा सापडतो..औरंगजेबाला दख्खन मोहिमेत हा किल्ला जिंकता आला नाही वारणेच्या तहानुसार रांगण्याचा ताबा करवीरकर छत्रपतींकडे आला...

➖➖➖➖➖➖➖➖
फोटोग्राफी : शिवम ठाकूर...♥️

Post a Comment

0 Comments