कोविड मुळे मृत्यू झालेल्या शिक्षक, कर्मचार्‍यांच्या वारसांना शासकीय सेवेत नियुक्ती द्या

प्राथमिक शिक्षक समितीची मुख्यमंञी कडे मागणी

अमरावती दि.२७मे- कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत राज्यातील शासकीय- निमशासकीय शिक्षक- कर्मचा-यांच्या सेवा कोविड विषयक विविध कार्यासाठी अधिग्रहित केल्या आहेत. मागील एक वर्षापासून राज्यातील शासकीय आणि निम-शासकीय विविध संवर्गीय कर्मचारी आणि शिक्षक सातत्याने कोविड संबंधाने कर्तव्य बजावत आहे.कर्तव्यावर असतांना राज्यातील कित्येक शिक्षक,कर्मचारी यांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे त्यांच्या वारसांना विशेष बाब म्हणुन तात्काळ शासकीय, निमशासकीय सेवेत नियुक्ती करावी अशी मागणीचे निवेदन प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे,राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी दिल्याचे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी सांगीतले.

कोविड संबंधाने कर्तव्य बजावत असताना राज्यातील अनेक शिक्षक- कर्मचाऱ्यांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. अशा शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी शासनाने ५० लाख रुपयाचे सानुग्रह सहाय्य/विमा कवच लागू केले आहे. मात्र त्यांच्या परिवारावर अकाली कोसळतेल्या आघातामुळे संबंधित शिक्षक- कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेला परिवार सैरभैर आणि हवालदिल झाला आहे. त्यांचेसाठी सानुग्रह सहाय्य/विमा कवच एकमेव मदत ठरू शकत नाही.
राज्यात सेवेत असणाऱ्या शिक्षक कर्मचा-यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामावून घेतल्या जाते. मात्र अनुकंपा योजनेंतर्गत सेवेत सामावून घेण्यासाठी प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागते.
कोविड कर्तव्य बजावत असताना कोविड बाधित होऊन जे शिक्षक- कर्मचारी मृत्यू पावले आहेत त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीची प्रदीर्घकाळ प्रतिक्षा न करता शीघ्रतेने नियुक्ती देऊन आधार देण्याची गरज आहे.

करिता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंञी,उपमुख्यमंञी व मुख्य सचिव यांना  करण्यात आली, कोविड कर्तव्य बजावत असताना ज्या शिक्षक-कर्मचाऱ्यांचा कोविडने मृत्यू झाला अशांच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय,निम-शासकीय सेवेत समावुन घेऊन त्यांच्या परीवाराला आधार देण्यासाठी विशेष बाब म्हणुन शासन स्तरावरुन तात्काळ धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे,राज्य सरचिटणीस विजय कोंबे,उपाध्यक्ष राजन कोरगावकर,कार्याध्यक्ष राजेन्द्र नवले,कोषाध्यक्ष केदु देशमाने,संघटक सयाजी पाटील, कार्यालयीन चिटणीस शिवाजी दुशिंग,संपर्क प्रमुख राजेंद्र खेडकर, प्रवक्ता आबा शिंपी,राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर,आॅडीटर राजेंद्र पाटिल,न.पा.मनपा आघाडी प्रमुख सुधाकर सावंत,महीला आघाडी प्रमुख सौ.वर्षा केनवडे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments