May 30, 2021
30 मे गोव्याला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळाली त्याबाबत लेख!
समुद्रीकिनारी वसलेले व निसर्गाने नटलेले "गोवा " हे राज्य फारच सुंदर ठिकाण आहे. गोवा राज्याला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. अगदी इ,स. पूर्व तिसऱ्या शतकात मौर्यांनी "गोवा " ज्यांचे गोमातंक नावाने ओळखले याठिकाणी आपले राज्य निर्माण केले होते. तर इ.स. पहिल्या शतकात सातवाहन राज्यांचे राज्य या प्रदेशावर होते. यानंतर बदामी , चालुक्य व कदंब राज्यांनी याठिकाणी राज्य केले. त्यानंतर दिल्लीतील सुलतानांनी तुघलकांची काही काळ गोव्यांवर सत्ता होती. मात्र विजयनगरचा राजा हरिहर प्रथम याने गोवा राज्य ताब्यात घेतले.1469 मध्ये बहमनी सुलतानांनी गोवा विजयनगरच्या राज्याकडून जिंकले.बहमनी राज्याचे शकले पडल्यानंतर विजापूरच्या आदिलशाहकडे हे राज्य होते. त्यानंतर 1510 मध्ये पोर्तुगीजांनी गोवा राज्य जिंकले. गोवा पोर्तुगीजाच्या ताब्यातून घेण्यासाठी मुघल तसेच शिवरायांनी व संभाजी महाराजांनी प्रयत्न केले होते. मात्र पोर्तुगीजांचे आरमार फारच प्रबळ होते.त्यामुळे पोर्तुगीजांना गोवा राखता आले. श्रीमंत बाजीराव पेशवे यांनाही गोवा जिंकण्याची प्रबळ इच्छा होती. वसई जिंकल्यावर तिला मूर्त रुप येणार असे वाटत असतान दिल्लीवर इराणचा बादशहा नादिरशहाने आक्रमण केले. त्यावेळी दिल्लीच्या संरक्षणासाठी बाजीरावांना त्वरीत दिल्लीच्या मोहिमेला जावे लागले. नंतर अकाली निधन झाले त्यामुळे बाजीराव पेशव्यांची गोवा जिंकण्याची इच्छा अपूर्णच राहिली. 15 आँगस्ट 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावरही गोवा पोर्तुगीजांच्याच ताब्यात होते. त्यानंतर गोवामुक्ती आंदोलन जोर धरु लागले. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती या चळवळीसाठी दिली. अखेर 19 डिसेंबर 1961 भारतीय सेनेने पोर्तुगीजांवर आक्रमण करुन गोवा मुक्त केले. मात्र भारतातील पंचवीसावे राज्य म्हणून मान्यता 30 मे 1987 मिळाली. रेखीव मंदिरे , भव्य चर्च , नारळा फणसांचे व काजूचे झाडे व भुरळ पाडणारे मनोहारी समुद्रकिनारे त्यामुळे आज ही आखिल जगाचे लक्ष गोवा हे राज्य आकर्षित केले.
-सतीश कोळी,खुलताबाद

0 Comments