➖🕳♍💲🅿🕳➖
*सतीश कोळी,खुलताबाद*
❱❱ *महाराष्ट्र शिक्षक पँनल* ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
〇 *माझी शाळा, माझे उपक्रम* 〇
*🎊दप्तराविना शैक्षणिक उपक्रम🎊*
════════════════
*🏃♀चला खेळू या...!!!*
*🙋अभ्यासाचा खो खो.....!!*
━━━━━━━━━━━━━━━━
*हसत खेळत आनंददायी अध्ययन अध्यापन होण्यासाठी चला खेळू या अभ्यासाचा खो-खो हा उपक्रम उपयोगी पडतो.*
*हा खेळ पहिली ते आठवीपर्यंत घेता येतो.*
🏃♀ *उपक्रमाची कार्यवाही*🤾♀
----------------------------------
🔹 हा उपक्रम मैदानावर घेता येतो.
🔸खो खो खेळाप्रमाणे नऊ मुलांना घेवुन हा खेळ खेळता येतो.
🔹खाली बसलेल्या नऊ खेळाडूना नऊ मराठी अक्षर,इंग्रजी अक्षर या संख्यांची नावे शिक्षकांनी मुलांना दयावे.
🔸दिलेले अक्षर हे त्या मुलांचे नाव राहील हे त्या गटातील मुलांना लक्षात ठेवायचे आहे.
🔹खेळ खेळत आसताना एकमेकांना खो देताना खो म्हणतो पण या खेळात *खो* न म्हणता त्याच्या गळ्यातील मराठी, इंग्रजी अक्षरापासुन शब्दांच्या कार्डाचे उच्चार करायचा आहे.
🔸अंक असेल तर संख्या उच्चार करावे.
🔹यातुनच विद्यार्थ्यांचा खेळ पण होईल आणि अभ्यास होईल.
🏃♀ *उदाहरणार्थ*🙋
---------------------------------
🔹नऊ मुलांना वेगवेगळे अंक या अक्षर दयावे.नऊ मुलांपैकी एखादयाला C हा एखादयाला अक्षर दिला असेल तर त्याला इतर मुले खो देताना Cपासुन चालू होणारे शब्द सांगतील. उदा.Car,Cup,Cat,Calgate
🔸मराठी शब्द 'क' असेल तर कप,कमला,करण,करंजी असे शब्द उच्चारतील तर गणितामध्ये एखादया मुलांस '2' अंक असेल तर 22,423,225,42,82 असे अंक उच्चारतील.
🔸या उपक्रमात शिक्षकांची मार्गदर्शकांची आसते.जो विद्यार्थी चुकीचा उच्चार करेल त्याला बाद करून दुसऱ्या मुलांना संधी दयावी.
*या उपक्रमाच्या साहयाने मुलांच्या बौद्धिक विकासासोबत शारिरीक क्षमतेचा देखील विकास होतो.विद्यार्थी हसत खेळत मराठी, इंग्रजी व अंकज्ञानाचा सराव होतो.*
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
🌲 *संकलन* 🌲
*सतीश कोळी,खुलताबाद*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल*
📞 *91589 83616* 📞
════════════════
┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

0 Comments