➖🕳♍💲🅿🕳➖
*सतीश कोळी,खुलताबाद*
❱❱ *महाराष्ट्र शिक्षक पँनल* ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
〇 *अध्ययन निष्पत्ती साधू या..!!* 〇
*🥀चला वर्ग प्रगत करु या..!!*
════════════════
*_चला तर मग... !!!_*
*_भागाकार शिकू या... !!!_*
━━━━━━━━━━━━━━━━
*_मुलांना भागाकाराची उदाहरणे शिकण्यासाठी खुप आडचणी येतात त्यामुळे मुले भागाकारात मागे राहतात. या शैक्षणिक साहित्याचा साह्याने मुलांना भागाकाराची संकल्पना लवकरात लवकर शिकता येते.चला तर मग आपण त्या शैक्षणिक साहित्याची ओळख करून घेऊ या._*
*_💫हे शैक्षणिक साहित्य टाकाऊ वस्तू पासून तयार करण्यात आले आहे._*
*_💫 या शैक्षणिक साहित्याच्या साह्याने पहिली दुसरीचे विद्यार्थी देखील भागाकाराची उदाहरणे सोडवू शकतात._*
*_⚜शैक्षणिक साहित्यासाठी लागणारे साहित्य⚜_*
=====================
*_थर्माकुलची एक सीट, वहयाचे खपट, टाकाऊ चहाचे कप, रंगीत पेन व आईस्क्रीमच्या कांडया._*
*_💫शैक्षणिक साहित्य तयार करण्याची पध्दती💫_*
=====================
*_🥀सुरवातीला थर्मास सिटवर रंगीत कागद चिटकून घ्यायचा._*
*_🥀थर्माकुल सीटच्या डाव्या बाजूला 1ते 20 अंक रंगीत पेनने लिहून घ्यावे व त्यांच्या समोर चित्रात दाखवल्याप्रमाणे आईस्क्रीमची काडी बसेल इतके 1ते 20 अंकाच्या समोर छिद्रे पाडावी._*
*_🥀थर्माकुलच्या मध्ये मध्यभागी तीन कप्पे करुन घ्यावे._*
*_💠पहिला कप्पा उदाहरणाची चिठ्ठी ठेवण्यासाठी._*
*_💠दुसरा कप्पा आलेल्या उत्तरासाठी तर तिसरा कप्पा भागाकाराची बाकी आली असेल तर त्यासाठी._*
*_🥀थर्माकुलच्या उजव्या बाजूला चित्रात दाखवल्याप्रमाणे चहाचे कपाचे अर्धा भाग करुन त्यावर 1ते 10 अंक लिहून चिटकून घ्यावे._*
*_हे आपले चित्रात दाखवल्याप्रमाणे भागाकार चटपट शिकण्यासाठी शैक्षणिक साहित्य तयार झाले._*
*_💠शैक्षणिक साहित्याचे प्रत्यक्ष वापरण्याची पध्दती💠_*
=======================
*_उदाहरणार्थ :-👇_*
*_17÷4=_*
समजा हे उदाहरण आहे.
ते सोडविण्यासाठी खालील पध्दतीचा वापर करता येतो.
*_1) उदाहरणार्थ भाज्य 17 आसल्यामुळे आईसक्रीमच्या सतरा कांड्या घेतल्या._*
*_2) आईसक्रीमच्या 17 कांडया डाव्या बाजूच्या छिद्रात अडकवून ठेवायच्या._*
*_3)भाज्यक 4 आसल्यामुळे प्रत्येक उजव्या बाजूला आसलेल्या कपात डाव्या बाजुच्या चार आईस्क्रीम कांडया टाकल्या._*
*_4)अशाप्रकारे पहिल्या कपात 4, दुसर्या कपात 4,तिसऱ्या कपात 4 व चौथ्या कपात चार आईस्क्रीम च्या कांडया टाकल्या_*.
*_5) चार कपात प्रत्येकी चार कांडया पडल्या मुळे आपला भागाकार म्हणजेच उत्तर 4 आले व एक कांडी उरल्या मुळे बाकी एक राहिली._*
*_अशाप्रकारे सहज हसतखेळत आपणास मुलांना भागाकाराची उदाहरणे शिकवता येतात. मुले देखील दडपण न घेता शिक्षकाच्या मदतीने भागाकाराची उदाहरणे सोडवत आसतात._*
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
*सतीश कोळी,खुलताबाद*
*महाराष्ट्र शिक्षक पँनल*
📞 *91589 83616* 📞
════════════════

0 Comments