एका भूताची गोष्ट......


एका भूताची गोष्ट......
रात्रीचे अाठ वाजत अाले होते.धो धो पाऊस बरसत होता.विजाही कडाडत होत्या.नवीन अापला खिडकीपाशी पुस्तक घेऊन वाचन करण्यात मग्न हौता.पुस्तकाचे नाव होते एका भुताची कथा.....अाजच त्याने ते लायब्ररीतुन अाणले होते.जेमतेम अाठ दहा पाने त्याने वाचली हौती.
          नवीनचे वाचन सुरुच होते.अाणी बाहेर निसर्गाचा तांडवही सूरु हौता ! खिडकीत बसलेल्या नवीनला खिडकीतुन मस्तपैकी बाहेर पाहता पाहता कथा वाचताना मजा येत होती.सतत पडत असणारा पाऊस , बरसणार्या धारा रात्रभर तरी थांबायचे नाव घेणार नाही असा अंदाज त्याला अाला होता.अाता ऊठुन जेवण करुन घ्यावे.म्हणुन तो ऊठला.मेसचा डबा ऊघडला.अाज मटनाची भाजी हौती.मेसवाली मावशी नाॅनव्हेज खाणार्यांना अाठवड्यातुन एक दिवस नाॅनव्हेज तर ईतरांना गोड पदार्थ देत हौती.नवीन  जेवन करणार तोच लाईट गेली.नवीन ऊठला अाणी एक मेणबत्ती त्याने खिडकीजवळच्या टेबलवर लावली.नंतर लाईट अाल्यावरच जेवावे असा विचार करुन त्याने डबा पुन्हा लावला.अाणी पुन्हा तौ पुस्तक वाचायला येऊन बसला.पुस्तक हातात घेतले अाणी बाहेर पाहीले.मातकट रंगाच्या पाण्याचे लहान मोठे ओहोळ भरभरुन वाहत हौते.तसे नवीनचे घर हे जरा एकांतीच होते.अाजुबाजुला वस्ती होती पण खुप विरळ.अाणी नवीनच्या घराच्या जरा दुरच.पण त्याच्या खिडकीतुन बाकीची घरे दिसत हौती.
                      पाऊस अापला तसाच धो धो बरसत होता.अाणी तोच नवीनने पाहीले कोणीतरी पावसात भिजलेली व्यक्ती हातातली सूटकेस डोक्यावर धरत धावतपळत गेट ऊघडुन अात येत हौती.ती व्यक्ती दरवाजाजवळ येऊन दरवाजा ठोठवू लागली.नवीनने जाऊन लगेच दार ऊघडले.ती व्यक्ती पूर्ण ओली झाली होती.केसातुन पाण्याचे थेंब टपकत होते.अंगात थंडी भरल्याने थरथर कापत हौती. "मी....,मला जरा वेळ ईथे निवारा देता का? खुप पाऊस सुरु अाहे....,,स्स...! " थंडीने त्याला बोलणेही हौत नव्हते.तौ अंग अाकडुन ऊभा होता." हो. या ना या." नवीनने त्याला अात घेतले.कपाटातला टाॅवेल त्या व्यक्तीच्या हाती देत नवीन म्हणाला '"घ्या.डोके पुसुन घ्या.मी तुम्हाला माझे कपडे देतौ.बदलुन घ्या.".त्या व्यक्तीने टाॅवेल हातात घेत म्हटले,"नाही.नको.म्हणजे कपडे अाहेत माझ्याकडे."तौ डोके पुसत म्हणाला. त्याने अंग कोरडे केले.सोबतच्या सुटकेसमधील  कपडे बदलले.अाणि नवीनजवळ येऊन तो बसला.तो अाताही थोडा थरथरत हौता.नवीनने त्याला पांघरण्यासाठी चादर दिलि .नंतर त्त्याने याच्यासाठी स्वयंपाकघरात जाऊन चहा केला अाणी त्याच्या हाती देत म्हणाला,"घ्या.तूम्हाला बरं वाटेल."त्या व्यक्तीने चहा घेतला.मग त्याला थोडे बरे वाटु लागले. 
            तौ नवीनला म्हणाला."साॅरी तुम्हाला त्रास दिला.अाणी थँक्सपण.तुम्ही मला घरात घेतले.चहा दिला.""त्यात काय एवढ? वेळप्रसंग सांगुन थोडीच येत असतो.अाज तुमच्यावर अाहे.ऊद्या माझ्यावरही येऊ शकतो." "धन्यवाद! तुमचे मन खरंच खुप मोठे अाहे." ती व्यक्ती नवीनला म्हणाली. "पण ईतक्या पावसात तुम्ही कुठे चालला होता? नाव काय तुमचं? कूठे राहता." नवीनने त्याला विचारले. " "मी....मी ललित....जवळच्याच गावात राहतौ.कामानिमित्त ईथे अालो होतौ.तसा मित्र असतौ ईथे माझा...पण नेमका तो अाज घरी नाही.गावी गेलाय.मग मी असाच गावी निघलौ तर हा पाऊस सुरू झाला.मग तुमचेच घर दिसले.अाणि ईथे धावत अालो." ती व्यक्ती नवीनला म्हणाली."अच्छा! तर तुमचे नाव ललित अाहे.तुम्ही काही काळजी करु नका.ईथे अारामात रहा.सकाळ झाली कि तुमच्या गावाला जा." नवीन म्हणाला.तौच लाईट अाली.नवीन ललितला म्हणाला, "बरे झाले.लाईटही अाली.अापण जेवण करुन घेऊ."  "नको नको.तुम्ही जेवण करुन घ्या.मला भूक नाही."ललित म्हणाला."असं कसं ? जेवाव तर तुम्हाला लागेलच? चला या." म्हणत नवीनने जेवण दोन ताटात वाढुन घेतलं. दोघांचीही जेवणं अाटोपली. नवीनने ललितला पांघरुन घालुन दिले.अन तौही पलंगावर अंग टाकुन पुस्तक वाचु लागला. "काय वाचत अाहात तूम्ही? "ललितने विचारले. " मी एका भुताची गोष्ट वाचत अाहे.पूस्तकाचे नावच अाहे एका भुताची कथा..." नवीन म्हणाला." तुम्हाला भिती नाही वाटत ?"ललितने नवीनला विचारले." कशाची?" नवीन म्हणाला. " भूताची? अजून कशाची?" भूताच्या भू वर जरा जास्तच जोर देत ललित म्हणाला."मूळीच नाही." नवीन ललितकडे पाहत म्हणाला." तुम्हाला अावडतात भयकथा वाचायला?" ललित म्हणाला."हौ.मला खुप अावडतात भयकथा वाचायला.अाणी जेव्हा भूताची एन्र्टी  होते ना मला खुप ईन्र्टेष्ट येतो वाचण्यात.मला भूताच्या गोष्टी एवढ्या अावडतात कि मी अाजपर्यंत भरपुर पूस्तके वाचली अाहेत भूतावरची.अगदी ज्याला कुणाला भूताच्या गोष्टी माहित असतील मी त्याच्याकडुन त्या गोष्टी एकतो म्हणजे एकतोच.माझ्या जवळजवळ सर्व मित्रांकडुन मी भुताच्या गोष्टी एकलेल्या अाहेत."नवीन म्हणाला. "पण एवढी अावड चांगली नाही तीही अशा गोष्टींबाबत ज्यांचा जीवनाशी संबंधच तुटला अाहे.अाणी सांगायचं म्हणजे....जाऊ द्या." "काय जाऊ द्या? नाही सांगा ना....काय सांगायचे अाहे तुम्हाला? " नवीन म्हणाला.  "अहौ भूतांच्या एवढ्या गोष्टीचं वेड चांगलं नाही.ज्याला भुताच्या गोष्टी खुप अावडतात त्याला भुत भेटायला येतं म्हणतात." ललित म्हणाला."काहीही!मुळात भूतं नसतातच.माझा मूळीच विश्वास नाही भूतांवर.अाता हेच बघ ना? हे पुस्तकच बघ ना? एका भूताची गोष्ट......,याचा जो लेखक अाहे म्हणे तो अाता जिवंत नाही.अाणी त्याचे भूत झाले अाहे म्हणतात,अाणी जो कूणी हे पुस्तक वाचतो त्याला त्याचं भूत भेटायला येतं म्हणतं.पण मी नाही मानत या गोष्टी.अाणी म्हणुनच मी हे पुस्तक वाचायला अाणलं.थोडेफार वाचलंही.अजुनपर्यंत तरी नाही भूत भेटायला अालं."नवीन म्हणाला."बाप रे! नका वाचू मग ते पूस्तक.खरंच नका वाचू." ललित म्हणाला."भूत वगैरे काहीच नसत.बरं सांगा तुम्हाला येते का भूताची गोष्ट.येत असेल तर सांगा ना!"नवीन ललितला म्हणाला."न..न...नाही..." ललित अडखळत बोलला."म्हणजे? तुम्हाला येत नाही भूताची गोष्ट?एकही माहित नाही.?" नवीन म्हणाला." म्ह...म्हणजे येते.पण खुप भयानक अाहे ती...एवढी भयानक की खुप भितीदायक..घाबरसाल तुम्ही..."ललित म्हणाला."अाता तर मला एकायचीच अाहे ती..सांगा ....सांगा ती गोष्ट.पाहतौ किती भितीदायक अाहे ती!" नवीन म्हणाला.
         "सांगतो मग.एका तर.असाच तुमच्यासारखाच एक माणुस हौता.त्याला खुप भुताच्या गोष्टी अावडायच्या.सतत जो भेटेल ,जिथे जाईल तिथल्या लोकांना फक्त भुताच्या गोष्टीच विचारायच्या.फक्त भूत भूत अन भूत.अशाच तुमच्यासारख्याच भूताच्या गोष्टींचं पुस्तक वाचायचा.मग एके दिवशी असाच तो बसलेला असतो त्याच्या घरात पुस्तक वाचत....एका भूताची गोष्ट....." ललित एवढे सांगतो.अाणी अचानक लाईट जाते.नवीन ऊठतौ अाणी  टेबलावर मेणबत्ती लावतो. क्रमश:
                _अरुणा शिरसाट.
--------------------------------------
*एका भूताची गोष्ट भाग 2)*
मेणबत्ती लावुन नवीन पुन्हा येऊन पलंगावर भिंतीला पाठ टेकुन बसला अाणी म्हणला ,"पुढे काय होतं मग?" ललित म्हणतो ,"अाता राहू द्या ना ती कथा.खुप भयानक अाहे.लाईटही नाही.अंधार अाहे सगळीकडे.भिती वाटेल तुम्हाला." "नाही वाटत भिती.तुम्ही सांगा पुढे काय होतं ते?मला अंधाराचीही भिती वाटत नाही.मुळात माझा भुतावर विश्वासच नाही तर काय भिती वाटेल.सांगा अाता पुढे काय हौतं?" "न....न..नको.अहौ तुम्हाला वाटत नाही तरी मला वाटते ना! मी नाही सांगणार!" ललित म्हणाला. "प्लिज सांगा अाता.मी एवढा अाधार दिला तुम्हाला पावसात.घरात घेतले.तुम्हालाही एवढे माझ्यासाठी करावेच लागेल."नवीन म्हणाला. "ठिक अाहे." ललित ऊठत म्हणाला अाणि भिंतीला पाठ टेकवुन बसला.मेणबत्तीच्या ऊजेडात भिंतीवरच्या त्या दोघांच्या सावल्या भेसुर भासत होत्या. "तुमची ईच्छाच अाहे तर मग ऐका.पण जर तुम्ही घाबरले तर मी जबाबदार नाही." ललित  मेणबत्तीकडे एकटक पाहत म्हणाला. "हो.सांगा अाता.करा सुरुवात सुरस कथेला." नविन अजुन उल्हासात येऊन म्हणाला. "बरं सांगतो तर मग.ऐका त्या माणसाची गोष्ठ." ललित ठंडपणे म्हणाला.नंतर शांतपणे त्याने मेणबत्तीकडे एकटक पाहत सांगायला सुरुवात केली.. " त्याला भूताचं खुप  वेड हौतं. कुठे लग्नाला गेला ...किंवा वाढदिवसाला ....अथवा कुणाच्या बारशाला...चार लोक जमले कि याचे सुरु व्हायचे....भुताची गोष्ट सांगा...भूताची गोष्ट सांगा..भुताची गोष्ट सांगा.." अचानकपणे भुताच्या भु वर अत्यंत जोर देत मोठ्या अावाजात ललित जवळजवळ ओरडलाच.त्याच्या अशा ओरडण्याने नवीन जरा हबकला.त्याला असे हबकलेले पाहुन ललितने शांतपणे त्याच्याकडे हळूवारपणे मान फिरवत थंड डोळ्यांनी म्हटले," अगदी कुणाच्या मयतीलाही त्याचे तेच!अहो हवे वेड पण ई____त____के.?" ललित नवीनकडे पाहत शेवटचा ईतके हा शब्द तुटकपणे म्हणाला.अाता त्याच्या डोळ्यात कमालीचा थंडावा दिसत होता.कुठलिच हालचालही तो शरीराची करत नव्हता.त्याच्या डोळ्यात अाता कुठलेच भाव दिसत नव्हते.तसाच तो नवीनकडे शांत डोळ्यांनी पाहत म्हणाला," अशा माणसाचं काही खरं नसतं.भुताची अाठवण जास्त काढू नये म्हणतात.जेवढं अापण भूत भूत म्हटलं त्या भूतांना जाणवणी होते त्याची." नंतर ललितने पुन्हा मान मेणबत्तीकडे वळवली अाणी मेणबत्तीकडे एकटक पाहत त्याने पुन्हा सांगायला सुरुवात केली..," कुणी रोगानं मरतं,कुणी अपघातानं,कुणी जीव देतं,तर कुणी जळुन...तर कुणी पाण्यात बूडुन!या सर्वांची भूतं खुप भयानक असतात. अहो साहेब, बाळंतपणात मेलेल्या बाईचंही भूत हौतं अन.......गर्भातच मेलेल्या अर्भकाचंही....! लहान लेकरांच्या रडण्याचा वेळि अवेळी येणारा अावाज.....तर अांगणात ऊभं असलेलं जळलेल्या माणसाचं भूत...रस्त्यापलीकडच्या मोकळ्या जागेत दिसणारं अपघातानं अवेळी मेलेल्या माणसाचं भुत.....ही भूतं त्याच्या जगात खुश असतात .....पण माणसं..,.जीवंत माणसं त्यांना सतत अावाज देतात त्यांच्या गोष्टी विचारुन त्यांच्या गोष्टी सांगुन...तर कधी त्यांच्या गोष्टींची पुस्तक वाचुन ...अशाच तुमच्यासारख्या!" ललितने पुन्हा एकवेळ नविनकडे पाहीलं. "असाच तोही होता मुर्ख.त्याला खुप जणांनी सांगीतलं.समजावलं.नको ईतका या गोष्टीत पडु.पण तो पडलाच.कळलं मग भुतांना.ह्याच्या मनाचा अावाज भुतांबद्दलची ऊत्सुकता अावड...पोहोचलं त्यांच्यापर्यंत..." एवढे बोलुन ललित थांबला तो अगदी चुपच.फक्त एकटक नवीनकडे पाहत हौता.नवीनला मनातुन भिती वाटत हौती पण तौ दाखवत नव्हता.पण ललितला असं चुप पाहुन नवीनचा थोडाचा थरकाप उडाला.बाहेर पाऊस मूसळधारपणे बरसतच होता.विजांचा कडकडाटही अाता ऐकु येवू लागला होता.नविनने घड्याळात पाहीले.रात्रीचे दहा वाजत अालेले  होते."घड्याळात काय पाहत अाहात? तुम्हाला जाणुन नाही घ्यायचे का पूढे त्या माणसाचे काय झाले? " ललित म्हणाला." रात्र खुप झाली...." नवीन म्हणाला."मग काय झालं? संपली तर नाही ना? " ललित नवीनकडे एकटक पाहत स्वताच्या खांद्याला हिसका देत म्हणाला.नंतर पुन्हा नजर मेणबत्तीकडे वळवत ललित पुढे अतिशय घाईघाईत न थांबता बोलू लागला,"अशीच पावसाळी रात्र हौती.विजा चमकत होत्या.ढगांचा गडगडात सर्वदुर पसरला होता.अशा या रात्रि तो घरात एकटाच हौता.अापल्या अावडीनुसार जेवण वगैरे करुन तो  घरात पुस्तक वाचत..बसला....एका भूताच्याच कथेचं.अाणी अचानक लाईट गेली.त्याने मेणबत्ती पेटवली.वार्याच्या येणार्या झोतामूळे ती मेणबत्ती फडफड करीत होती..,अगदी अशीच या मेणबत्ती सारखी..." टेबलावरील मेणबत्तीकडे बोट दाखवत ललित म्हणाला.तोच नवीननेही मेणबत्तीकडे नजर वळवली.खरोखरच मेणबत्तीची ज्योत हवेमुळे फडफड करीत हौती.नवीनच्या कपाळावर घर्मबिंदु जमले होते.तोच ललित ऊठला अाणी सांगु लागला," तोच दरवाजा वाजला.ईतक्या रात्री कोण अालं असेल? त्याने खिडकीतुन बाहेर डोकावुन पाहीले.." ललित खिडकीतुन स्वता बाहेर डोकावत पाहत म्हणाला.     " एक वाटसरु अाश्रयाला अाला होता.अगदी पावसात चिंब झालेला...याला दया अाली.त्याने दरवाजा ऊघडला अाणी तिथेच....तिथेच घात झाला...नव्हता ....नव्हता ऊघडायला पाहीजे दरवाजा त्याने.." ललित बाजुच्या भिंतीवर हाताने बुक्क्या मारत चिडुन बोलला अाणी अचानक रडु लागला.ललितचा असा अवतार पाहुन नवीन खुप घाबरला.पण तरीही नवीनने घाबरत घाबरतच विचारले "म...म...मग काय झालं?" नवीनचा अावाज एकुन ललितने भिंतीवर बुक्क्या मारणे अचानक बंद केले .तो हळुहळु नवीनकडे वळला अाणी म्हणाला," मग? मग तो माणूस मेला ज्याने दरवाजा ऊघडुन वाटसरुला अाश्रय दिला हौता.कारण तो वाटसरु नव्हता एक भुत होता."ललित नवीनकडे हळूहळु पावलं टाकत येत बोलला."त्या भुताला चहा दिला, जेवण दिले ,अंथरुण पांघरुनही दिले...पण तो भुत तर याचा जीव घ्यायला अाला होता ना...ना की या सर्व गोष्टींसाठी"ललित नवीनकडे हळुवारपणे पावलं टाकत सांगत होता. " तो भूत याला म्हणाला..,तुला खुप अावडतात ना भूतं...,मग ये अामच्याच जगात.भुत होवुन जा..." अगदी हळु अावाजात ललित म्हणाला." तो माणुस भुताला नाही नाही म्हणत हौता.खुप विनवत होता.पण ते भूत काहीच एकायला तैयार नव्हतं.नंतर  तो माणूस त्याच्या घरात मेलेला दिसला...माहित अाहे तो मेलेला माणूस कोण हौता? ज्याचा त्या अाश्रित बनुन अालेल्या भुताने जीव घेतला होता? " ललितने नविनला विचारलं. " क...क...कोण हौता? " नवीन ने विचारले पण नवीन अाता खुप घाबरला हौता."तुला अजुनही कळले नाही तौ माणूस कोण होता? " ललितने मान वाकडी करत दात विचकत नवीनला विचारले. नवीन अाता काहीच बोलायच्या मनस्थितीत नव्हता."तो माणुस ललित हौता. हो हो.....मी...मी होतो तो.....ज्याचा भुताने जीव घेतला.काय चुक होती माझी? फक्त भुतांच्या गोष्टींचा नाद होता मला.अावड होती....हो होती जरा जास्तच..म..,म...म्हणुन काय मारुन  टाकायचे?  पण अाता मीही तेच करणार.नाही सोडणार...नाही सोडणार कुणाला....जे माझ्यासोबत झालं ते सर्वांसोबतच झालं पाहीजे .अगदी तुझ्यासोबतही." ललित डोळै फिरवत नवीनकडे पाहत म्हणाला.नवीन खुप घाबरला होता.अाता ललित हळुहळु नवीनकडे पाय ऊचलु लागला." चल...चल माझ्यासोबत...भूताची गोष्ट ऐकायची अाहे ना? चल...मी सांगतो....अाता तुही भूत बनणार. तुला सोबत घेऊन जाणार मी ...तुला सोबत घेऊन जाणार....." म्हणत ललित नवीनच्या गळ्याजवळ अापले हात नेऊ लागला.             "न...नको...माझ्याजवळ येऊ नकोस. ..नको येऊस माझ्याजवळ.. "  नवीन जीवाच्या अाकांताने ओरडत होता. ललितचे हात मात्र हळुहळु समोर सरकत होते.नवीनच्या गळ्याभोवती ते अावरायला ऊत्सुक होते अाणि तोच.......
नवीन जोरजोराने हसायला लागला.ईतका का त्याला हसु अावरेना.तो पोट धरुन गडबडा लोळायला लागला ईतके त्याला हसायला येत होतं.
                                 —अरुणा  शिरसाट.
---------------------------------------
*एका भुताची गोष्ट अंतिम भाग...*
नवीन खुप हसत होता अाणी त्याला असे हसताना पाहुन ललितही जागेवरच थांबला.अाता तो नाॅर्मल झाला अाणी त्याने नवीनला विचारले," तुम्ही असे अचानक का हसायला लागले?" "तुमची अॅक्टींग बघुन.." नवीन हसु अावरत म्हणाला. "पण तुम्हाला कसं कळलं कि मी खोटं बोलत अाहे.अॅक्टींग करत अाहे म्हणुन." ललित अापल्या जागेवर जाऊन बसत म्हणाला."कारण की भूताला कळतं कोण भुत अाहे किंवा नाही ते!" नवीन अचानकपणे गंभीर होऊन बोलला. "म्ह...म्ह...म्हणजे?" ललितने घाबरुन विचारले. नवीनने घड्याळात पाहीले.रात्रीचे साडेअकरा वाजत अाले होते.घड्याळाचा सेकंद काटा ठराविक वेगाने फिरत होता.त्याचा हौणारा अावाज तेथील शांतता भंग करीत होता.अाता पावसाचा जोरही ओसरला होता.नवीन अाणी ललितच्या सावल्या त्या अंधारात भिंतीवर भयाण वाटत होत्या.खिडकीतुन येणार्या वार्याच्या झोताने मेणबत्तीची ज्योत फडफडत हौती.नवीन खिडकीजवळ ऊभा  राहुन बाहेर शांतपणे पाहु लागला."अशीच एक रात्र होती ललित.असाच धो धो पाऊस कोसळत हौता.मी हे पुस्तक घरी घेऊन अालो होतौ वाचायला.'एका भुताची गोष्ट' या नावाचं हे पुस्तक अामच्या लायब्ररीमध्ये खुप वर्षांपासुन पडुन होतं.यात एका भूताची गोष्ट सांगातली अाहे लेखकाने जे लोकांना घाबरवत असत.पण ह्या पुस्तकाच्या लेखकाचा अचानकपणे रहस्यमय मृत्यु झाला.तो कसा मेला माहित नाही.पण नंतर लोकांना वाईट अनूभव येऊ लागले.जो कुणी हे पुस्तक वाचायला न्यायचा त्याचा मृत्यु व्हायचा.नंतर अशी गोष्टच पसरली कि या पुस्तकाचा लेखकच येऊन पुस्तक वाचणार्याचा जीव घेतो.पण माझा यावर विश्वास नव्हता.मी हे पुस्तक घेऊन घरी अालौ हौतौ अाणी रात्री वाचायला बसलौ होतो.मी जवळजवळ काही पाने वाचली हौती तोच खरंच त्या पुस्तकाचा लेखक या पुस्तकामधून बाहेर अाला.मला कळुन चुकले कि हे पुस्तक शापित अाहे.पण वेळ निघुन गेली होती.मी माझ्या जीवाला केव्हाचा मुकलो होतो.ही घटना जवळजवळ पाच वर्षांअाधीची अाहे.तेव्हापासुन मी ईथेच असतौ.कुनी येत नाही ईथे.फक्त अाज तु अालास." एवढे म्हणुन नवीन चुप झाला.तौच लाईट अाली.ललितने घड्याळात पाहीले.बाराला पाच कमी हौते.अाता ललितही जोरजोरात हसायला लागला होताा.नवीन मात्र अजुनही पाठमोराच उभा होता.ललित हसतच म्हणाला," काय तुम्हीपण.,माझाच डाव माझ्याावर ऊलटवत अाहात." "मानलं भुताला कळतं कोण भुत अाहे अाणी नाही ते.हौ.मी भूत नाही पण तरीही मला माहित अाहे  कि तुम्हीही भुत नाही." ललित नवीनला म्हणाला."कशावरुन मी भुत नाही?" नवीनने ललितला प्रश्न केला.तौ अजुनही पाठमोराच ऊभा होता.ललित त्याच्या मागे जाऊन ऊभा राहीला अाणी म्हणाला,"कारण कि तुमचीहि सावली माझ्यासारखीच मेणबत्तीच्या ऊजेडात दिसत हौती.अाणी तुमचे  प्रतिबिंबही या अारशात दिसत अाहे.पहा." ललात त्या दोघांच्या मागे असलेल्या भिंतीवरील अारशात पाहत म्हणाला. नवीन अाता ललितकडे वळून पाहु लागला.ललितने नवीनला ते अारशातील प्रतिबिंब पुन्हा  पुन्हा दाखवले.अारशात ललितच्या मागे ऊभा असलेला नवीन स्पष्टपणे दिसत होता.अाणी अचानक नवीनचे प्रतिबिंब हळुहळु नाहीसे झाले.तसे ललातने मागे वळुन पाहीले.तर मागे नवीन उभा हौता.ललितने पुन्हा अारशात पाहीले तर तिथे नवीन दिसत नव्हता.ललित विजेच्या वेगाने नवीनपासुन दुर झाला."क,..क...कोण अाहेस तु?" "मी नवीन.मी तुला सांगितलेली माझी कथा ही सत्य हौती.घड्याळात बघ.बारा वाजलेत रात्रीचे.रात्री बारानंतर अामचे प्रतिबिंब अामचि सावलीसुध्दा दिसत नाही."असे म्हणत नवीन पुन्हा खिडकीकडे वळून ऊभा राहिला.अाणी ललितचा जोराचा हार्ट अटॅक अाला.नवीन मात्र मंदपणे हसत होता.
          काही वर्षांनंतर..,...
    धो धौ पाऊस कोसळत हौता.अनिल या पावसात पुरता भिजला होता,कुठेतरी अाश्रय घेणे महत्वाचे होते.तोच एक घर अनिलला दिसले.अनिल धावतपळत तेथे पोहोचला.अाणी त्याने गेट ऊघडले.तो धावत अात गेला अाणी दरवाजा ठोठावला.दरवाजा ऊघडला गेला.."खुप पाऊस अाहे.मला फक्त अाजची रात्र ईथे अासरा द्याल?" अनिल थंडीने थरथरत म्हणाला.तोच..."कोण अाहे ललित?"  टेबलावर पुस्तक वाचत बसलेल्या नवीनने ललितला विचारले."वाटसरू अाहे नवीन साहेब.अासरा मागताय रात्रभर" ललित म्हणाला."मग येऊ दे की!" नवीन हसतच म्हणाला व पुस्तक वाचण्यात मग्न झाला."या.बसा.मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो.तोपर्यंत हा टाॅवेल घ्या.डोके पूसुन घ्या"म्हणत ललित अातमध्ये निघुन गेला.अारशात मात्र ललित अाणी नवीनचेही प्रतिबिंब दिसत होते,
           पण तुम्ही नका जाऊ कधी अशी वेळ अाली तर!कुणाकडेही पावसात अाश्रय नका मागु बरं!नवीनकडे तर मुळीच नाही.
         -अरुणा शिरसाट.
संकलन:-@सतीश कोळी# खुलताबाद#

Post a Comment

0 Comments