चला चवळीच्या/मुगाच्या शेंगातून...संख्या शिकू या लिहू या...!!


▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
➖🕳♍💲🅿🕳➖
*__सतीश कोळी, खुलताबाद_*
❱❱ *_महाराष्ट्र शिक्षक पँनल_* ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬

〇 *_माझी शाळा,माझे उपक्रम_* 〇
════════════════
*_🥓चला चवळीच्या/मुगाच्या शेंगातून...!!!_*
*_संख्या शिकू या लिहू या...!!!🥓_*
━━━━━━━━━━━━━━━━
*_गेल्या वर्षी माझ्या शाळेत हा गणिती उपक्रम घेतला होता. यावर्षी मी कॅप्टन कोव्हीड यांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला. सध्याला मुगाच्या किंवा चवळीच्या शेंगा प्रत्येकाच्या घरी आहेत आपण देखील हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करावा._*
*_आमच्या वर्गामध्ये दररोज असे घडायचं सध्या शेतात चवळीच्या शेंगा खुप आहेत त्यामुळे मुले चवळीच्या शेंगा वर्गात खायचे कचरा टाकायचे. पण आज चवळीच्या शेंगा खात खात मुलांचा अभ्यासात उपयोग करून  घ्यावयाचे ठरवलं._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*_साधी चवळीच्या शेंग सहज खायला घेतली आणि डोक्यात विचार आला चला मुलांनाही देऊ. पहिली व दुसरीचा वर्ग.प्रत्येकाच्या वाट्याला एकच शेंग आली._*
*_मी सुचना सांगायला सुरूवात केली आणि मुलांनी कृतीला..._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

*_🥓चळवळीच्या शेंग हाताने सोला._*
*_🥓 शेंगेतील सोले (बिया) उजव्या हातावर घ्या._*
*_🥓चवळीच्या शेंगा तील सोले (बिया)मोजा._*
*_🥓 मोजलेल्या सोल्या(बिया) एवढं संख्याकार्ड घ्या व सांगा._*
*_🥓 संख्याकार्डावरील संख्या मोठयाने वाचा._* 
*_🥓सर्वांत जास्त व सर्वांत कमी सोले (बिया)कोणाकडे आहेत ते उभे रहा व सांगा सर्व जणांनी लिहा._*
*_🥓बेरीजचा सराव होण्यासाठी रामूकडील पाच सोले(बिया) व शामूकडील तीन सोले(बिया) एकूण किती बिया झाल्या._*
*_🥓वजाबाकीचा सराव घेण्यासाठी प्रियंकाकडील पाच बिया आहेत व अवंतीकडे तीन आहेत तर प्रियंकाकडे किती बिया जास्त आहेत._*
*_🥓याचप्रमाणे कमी जास्त हि संकल्पना पण मुलांना शिकवता येते_.*
*_🥓एक- एक शेंगामधील सोला (बिया)मोजत तोंडामध्ये टाका._*
*_🥓 चवळीच्या शेंगांची टरफले घ्या. व त्यातील घरे मोजा._*
*_( जवळपास प्रत्येक टरफलाची १० ते १२ घरे होती. )_*
*_🥓चवळीच्या शेंगाची टरफले कचराकुंडीत टाका._*
    *_मुलांनी हसतखेळत संख्या  वाचन व लेखनाचा व बेरीज, वजाबाकीचा सराव केला._*

📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
         *_सतीश कोळी, खुलताबाद_*
       *_महाराष्ट्र शिक्षक पँनल_*
     📞 *_91589 83616_* 📞
   ════════════════
  ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

Post a Comment

0 Comments