मुख्यालयी राहण्याची सक्ती करु नये...


शिक्षक समितीचे ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन
 
दि. १३ (प्रतिनिधी)- राज्यात मुख्यालयी राहण्याची कुठेही सक्ती नसताना औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रकार होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून बुधवारी जारी आलेल्या परिपत्रकानुसार शिक्षकांनाही मुख्यालयी राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

यामुळे शिक्षकांमध्ये कमालीचे चिंतेचे वातावरण आहे या परिस्थिवर तोडगा काढण्यासाठी शिक्षक समिती जिल्हा शाखेकडून ग्रामविकास मंत्री महा.शासन यांना जिल्हाध्यक्ष विजय साळकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन पाठविण्यात आले.. सोबतच जि.प.अध्यक्षा,उपाध्यक्ष,शिक्षण सभापती यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली व या अटीबाबत तोडगा काढण्याची मागणी केली.

गावात बहुतांश ठिकाणी घरे उपलब्ध होऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. कारण ग्रामीण भागात शक्यतो प्रत्येक जण आपल्या सोयीप्रमाणे बांधकाम करत असतो. शाळांच्या 
एकूण संख्येपैकी  अधिकतम् शाळा या वाडी-वस्तीवरील असल्याने तिथे तर बहुतांश पालकांनाच पक्की घरे नसताना शिक्षकांना ती कशी उपलब्ध होतील, याबाबत प्रशासनाने कुठलाही ऑन फिल्ड विचार केलेला नाही.

 एखादी खोली भाड्याने मिळालीच तर स्वच्छतागृह, मुबलक पाणी व इतरही सोयी-सुविधांच्या सामोरे जावे लागण्याची संभावना राहील. अशा परिस्थितीत शिक्षिकांची हेळसांड तर प्रचंड मोठ्या प्रमाणात होईलच. सोबतच सुरक्षेचीदेखील हमी कोण घेईल, असा सवाल शिक्षक समितीने उपस्थित केला आहे.शासनाने ग्रामीण भागात सर्व सोयीयुक्त निवासस्थाने उपलब्ध करून दिली पाहिजे. असेही निवेदनात म्हटले आहे.
राज्य मंत्री, जि.प.अध्यक्षा,उपाध्यक्ष, शिक्षण सभापती यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याविषयी सविस्तर चर्चा करून मार्ग काढून शिक्षकांची हेडसांड थांबविण्याची विनंती करण्यात आली.यावेळी शिक्षक समितीचे जिल्हा, तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments