व एक आदर्श व्यक्तिमत्व मा. *श्री. नितीन सौदंणकर उर्फ आबा शिंपी* आज त्यांच्या नियत वयोमानानुसार प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त होत आहेत.
त्यांनी त्यांच्या संपूर्ण सेवाकाळात एक शिक्षक म्हणून अध्यापनाचे व पदाधिकारी म्हणून आपल्या संघटनेचे अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले.
कै.भा.वा.शिंपी यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत असताना मा. आबा शिंपी यांनी माझ्या सारख्या अनेक तरुण पदाधिकारी यांना नेहमीच संघटनात्मक कामाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले आहे.नव्हे काही चुकले असेल तरीही समजावून सांगितले असेल..
आबा सारखं एक शांत,स्वच्छ,निर्मळ,अभ्यासू, त्यागी,नम्रताशील, सहनशील,नेतृत्व आपल्या संघटनेला मिळाले हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे.
कोणत्याही संघटनेत नसेल असे कार्य आदरणीय आबांचे आहे..आबा आज ही प्रशासनातील प्रशासकीय शासन आदेश आज मागितल्या मागितल्या एका मिनिटात आपल्याला उपलब्ध करून देतात व एक प्रकारे संघटनेच्या कामाला गती प्राप्त करून राज्यातल्या कार्यकर्त्यांना बळ व ऊर्जा प्राप्त करून देतात.
तरी मा.आबा यांनी या पुढील काळात ही राज्यभरातील शिक्षक पदाधिकारी यांना जितके शक्य असेल तितके सहकार्य व मार्गदर्शन करत राहावे.आबासाहेब,आपण नोकरीतून सेवानिवृत्त झालात...शिक्षक समितीतून नाही..आदरणीय आबासाहेब... यापुढे ही आपले अनमोल मार्गदर्शन सदैव लाभेल या अपेक्षेसह...
*औरंगाबाद जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या* वतीने *मा.आबांना त्यांच्या सेवापूर्ती निमित* खूप खूप शुभेच्छा व त्यांचे उर्वरित आयुष्य आनंदाचे, सुख समाधानाचे व निरोगी जावे अशी सदिच्छा व्यक्त करतो.
. *०शुभेच्छूक०*
औरंगाबाद जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती.
💐✒️💐✒️💐✒️💐



0 Comments