.बदली अपडेट
➖➖➖➖➖
शिक्षक संवर्ग सर्वसाधारण बदल्या २०२२
आंतरजिल्हा बदली
दिनांक २१/७/२०२२ व्हि.सी
महत्वाचे मुद्दे
१} ज्या जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षक यांची नोंद झाली नसेल तर अशा शिक्षकांची वैयक्तिक माहिती राज्यस्तरावरून मिळणाऱ्या ॲडिशन शीट मध्ये द्यावी .ज्या शिक्षकांचे अद्यापपर्यंत अपडेटेशन झाले नसेल त्यांची माहिती गोल्डन शीट मध्ये आज रात्री १२ वाजेपर्यंत द्यावी .
२} माध्यमिक शाळांतील ॲडिशन होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची माहिती उद्या रात्री १२ वाजेपर्यंत आभासी शाळेतून बी.ई.ओ लॉगीन वर द्यावी .
३} आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर वरील सर्व युजर डी - ॲक्टिव्हेट होतील ४} कोणत्याही परीस्थितीत रोस्टर अपडेट करावे .
५} ज्या जिल्ह्यात रोस्टर काम पूर्ण वा मंजूर झाले नाही अशा सर्व जिल्ह्यांनी सन २०११ व सन २०२२ च्या रोस्टरची तफावत काढून जे फायनल रोस्टर तयार होईल ते मंजुरी मिळाली नसल्यास माहिती करेक्ट आहे असे वाटल्यास मा.सी.ई.ओ यांची परवानगीसाठी स्वाक्षरी घेऊन अपलोड करावे .याबाबत आर.डी.डी कडून सूचना मिळतील .
६} आंतरजिल्हा बदली फॉर्म कोणत्याही एकाच केडरमध्ये भरावा .
७} एन.ओ.सी बाबत ज्या जिल्ह्यात आपणांस बदली करून जायचे असेल त्या जिल्ह्याची एन.ओ.सी असावी केवळ स्वजिल्ह्याची एन.ओ.सी असून चालत नाही .
८} एन.ओ.सी कितीही जूनी असली तरी अर्ज करू शकता .
९} २२/०७/२०२२ रात्री १२ नंतर कोणतेही ॲडिशन करू नये
१०} शेवटचे दोन दिवस असल्याने
ॲडिशन अपडेटेशन करून घ्यावे .
११} अवघड क्षेत्राच्या याद्या अपडेट कराव्यात .
१२ } जर अवघड क्षेत्राच्या याद्याबाबत काही अडचणी असतील तर त्या निकाली काढाव्यात .
१३} आंतरजिल्हा बदलीमध्ये एन.ओ.सी ला प्राधान्य आहे .
१४} रोस्टरमध्ये ई.डब्ल्यू.एस च्या जागा ओपन धराव्यात .
१५} क्लियर व्हॅकंसी व कंपल्सरी
व्हॅकंसी यादी तयार ठेवावी .
१६} २०२१-२०२२ च्या ज्या जिल्ह्यात संचमान्यता पूर्ण नाहीत त्या जिल्हास्तरावरून तात्काळ संपर्क करावा .
➖➖➖➖➖➖➖➖
*अजून नवीन माहिती आल्यास तात्काळ कळवले जाईल.*
. 🙏🏻 🙏🏻 🙏🏻

0 Comments