➖🕳♍💲🅿🕳➖
❱❱ महाराष्ट्र शिक्षक पँनल ❰❰
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
〇 अध्ययन निष्पत्ती साधू या..!! 〇
🥀चला वर्ग प्रगत करु या..!!
════════════════
📚 अध्ययन निष्पत्ती नुसार उपक्रम 📚
इयत्ता पहिली - विषय मराठी
💠घटक- माझी शाळा 💠
━━━━━━━━━━━━━━━━
इयत्ता पहिली वर्गाचे मराठी विषयाचे एकूण पाठावर १४ अध्ययन निष्पत्ती आहेत.
त्यापैकी आज आज आपण " माझी शाळा "या पाठाविषयी माहिती घेवू या.
💠माझी शाळा पाठातील अध्ययन निष्पत्ती 💠
======================
🥀चित्रातील सुक्ष्म व दृश्य पैलूचे बारकाईने निरीक्षण करतात.
🥀चित्राचे निरीक्षण करुन चित्रात काय दिसते ते सांगतात.
🥀चित्रवाचनाचा सराव.
🥀स्वतःच्या आवडीच्या खेळाविषयी माहिती सांगतात.
🥀चित्रातील खेळाविषयी प्रश्न विचारुन माहिती जाणून घेतात किंवा त्याबद्दल अनुभव सांगतात.
🥀मुलांना मैदानी व बैढे खेळाविषयी माहिती होणे.
🔹पाठातील अध्ययन निष्पत्ती प्राप्त होण्यासाठी कृती/उपक्रम
========================
🥀विद्यार्थ्यांना चित्राचे निरिक्षण करावयास सांगावे व चित्रातील तपशिलावार बोलायला लावावे.
🥀तुम्हाला आवडणाऱ्या इतर खेळाविषयीची माहिती जमा करा.
🥀चित्रात दिसणाऱ्या वस्तूची नावे सांगा.
🥀सांगा सांगा मी कोण सांगा?
(चित्रे दाखवायचे)
🥀"चला खेळू या अभ्यासाचा खो-खो" अंतर्गत मुलांच्या गळ्यात चित्राचे/ अक्षरारांचे कार्ड टाकून हा खेळ खेळायचा.
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
〇 चला खेळू, अभ्यासाचा खो-खो 〇
════════════════
हसतखेळत आनंददायी अध्ययन अध्यापन होण्यासाठी व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाचे अध्यापनाशी जोड घालून "चला खेळू या, अभ्यासाचा खेळ" हा खेळता येतो.
हा खेळ पहिली ते आठवी वर्गापर्यंत घेता येतो.
_🏂उपक्रमाची कार्यवाही 🏂_
====================
🥀हा खेळ मैदानावर व वर्गात पण घेता येतो.
🥀खो-खो खेळाप्रमाणे नऊ मुले घेऊन नऊ अक्षर कार्ड तयार करावे.
🥀दिलेले चित्राचे नाव हे त्या मुलांचे नाव राहिल.
उदाहरणार्थ :- राम नावाचा मुलगा आहे त्याचा गळ्यात कबड्डीचे चित्र आहे तर त्याचे नाव राम नसून कबड्डी हे आहे.
🥀प्रत्यक्षात हा खेळ खेळताना एकमेकांना खो देताना 'खो' न म्हणता त्याचे गळ्यातील चित्रांच्या नावाचे उच्चारण करावे.
_याचप्रमाणे माझी शाळा या पाठातील इतर खेळाची देखील हसतखेळत अभ्यासक्रमाशी जोडून सराव घेता येतो_
📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
महाराष्ट्र शिक्षक पँनल
════════════════
┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄
════════════════

0 Comments