शिक्षक कर्मचाऱ्यांच्या माहे सप्टेंबर 2022 च्या वेतनात घरभाडे भत्ता समाविष्ठ करणे बाबत. -दि.19/9/2022



प्रति,

गटशिक्षणाधिकारी (सर्व) पंचायत समिती

विषय:- शिक्षक कर्मचाऱ्यांच्या माहे सप्टेंबर 2022 च्या वेतनात घरभाडे भत्ता समाविष्ठ करणे बाबत. -

संदर्भ :- 1. सन्मानिय आमदार श्री. प्रशांतजी बंब, यांचे पत्र दि. 13/08/2022 2. मा. मुख्यकार्यकारी अधिकारी व मा. शिक्षणाधिकारी (प्रा) यांचे दिनांक 15/09/2022 रोजीचे बैठक.

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये अपणास कळविण्यात येते की, आपले अधिनस्त असलेले कार्यालयातील अधिकारी व शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभेचा ठराव व स्वयंघोषीत प्रमाणपत्र प्राप्त करुन, सदर प्राप्त पुराव्यांची खात्री करुनच वेतन देयके तयार करण्याच्या सुचना आपल्या स्तरावरुन देण्यात याव्यात. त्यानंतरच वेतन देयके ऑनलाईन सादर करावे.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद औरंगाबाद

Post a Comment

0 Comments