!! प्रस्तावना !!
!! नमस्कार !!
आतापर्यंत ४५ व्यक्तीचरित्रे निरनिराळ्या विषयांवर लिहिलेत.त्यात रामायण,महाभारत कांही ऐतिहासिक कांही संतचरित्रे आणि इतर व्यक्तीचरित्रे आपल्यापुढे प्रस्तुत केलेत.आपण सर्वांनी भरभरुन कौतुक केले.कांही विभूतींनी प्रत्यक्ष फोन तर कांहीनी वाॅट्प्सवर प्रतिसाद दिला.त्यामुळे माझा उत्साह द्विगुणित होत गेला.मनोबल वाढत गेले.उर्जा मिळत गेली आणि मी लिहित गेले.
आतां आपल्यासमोर घेऊन येत आहे प्रतिशिवाजी नेताजी पालकर! सरनोबत प्रतिशिवाजी नेतोजी पालकर!वास्तविक ते पालगावचे पाटील म्हणून पालकर नंतर त्यांच्या नावांचा अपभ्रंश होऊन नेतोचीचे नेताजी झाले.इतिहासाचा अभ्यास म्हणजे भूतकाळाच्या अंधारात डोकावून गडप झालेल्या गोष्टी हुडकुन काढणे एवढे सोपे नाही
पाटलाच्या घरांत जन्मलेले नेतोजी पाटीलकी करता करता शिवसंजीवनीच्या स्पर्शाने प्रथम स्वराज्याचे शिलेदार नंतर सरदार त्यानंतर पुरंदरचे किल्लेदार आणि त्या उंच पुरंदरावरुन थेट झेप घेऊन हिंदवी स्वराज्याचे सरनोबत बनले.त्यांच्या नेतृत्वा खाली स्वराज्याची घोडी गनिमांच्या छातीवर थयथय नाचवली.त्याच पराक्रमी सरनोबत पालकरांचा लौकिक "प्रतिशिवाजी" म्हणून सर्वत्र गाजला. असे सर्व सुरळीत चालू असतांना कांही किरकोळ मतभेदाने म्हणा किंवा गनिमी काव्याचा भाग म्हणा नेताजी जन्मजात स्वराज्याचा शत्रू आदिलशहाकडे गेले.नंतर मिर्झाराजे जयसिंगाकरवी औरंगजेब ची चाकरी, शिवाजी राजे आग्र्यातून निसटून गेल्यामुळे अटक, कैद,यातनांचा कहर,धर्म बदल,सहकुटुंब बाटणे..नामांतर होऊन महम्मद कुलीखान बनले.पण एवढा प्रदीर्घ प्रवास खरच शिवाजीमहाराज आणि नेताजीं च्या मतभेदामुळे घडला कां?याचं उत्तर पुढील मुद्यांवरुन स्पष्ट होईल.
शिवाजी महाराज असा नुसता नामोल्लोख झाला तरी वीरश्री जागृत होऊन मनाच्या तारा झंकारतात.छत्रपती शिवराय हा विषयच अत्यंत श्रध्देचा,पराकोटीच्या आदराचा!महाराज शेवटच्या श्वासापर्यंत बोलले तसेच वागले.महाराजांनी ज्यांना जवळ केले,कौल दिला,ज्यांनी आपल्या निष्ठा ज्या तिडिकेने महाराजांच्या व स्वराज्याच्या ठायी वाहल्या अशाच निष्ठावंतात नेताजींचे स्थान होते. अफझल वधाच्यावेळी संपूर्ण स्वराज्य नेतांजी वर सोपवले होते.महाराज मिर्झाराजे जयसिंगा च्या छावणीत जातांना आपल्या वंशाचा एकुलता एक दिवा,काळजाचा तुकडा ओलीस पाठवतांना त्यांच्या हाती सोपवला होता.शत्रू गोटात प्रतिशिवाजी म्हणून ज्यांचा दरारा होता, सिंधू सागरापासून वर्हाडपर्यंत आणि बागवाण खानदेश पासून कर्नाटक पर्यंतचा भाग घोड्यां च्या टापांखाली पिंजून काढला असा रणवीर बुध्दीमान,मुत्सद्दी शिवाजी महाराजांचा जिवलग किंबहुना जणूं श्वासच,सावली,केवळ कांही मुद्यावर मतभेद झाल्याने स्वराज्याशी द्रोह करुन महाराजांना सोडून जाईल, केवळ अशक्य,असंभव,अविश्वसनीयच!
कारण अद्भुत शक्तीने माणसे ओळखण्याची महाराजांची पारख कधीच चुकली नाही.नेताजी खरंच महाराजांवर रुसुन त्यापेक्षा मानमरातब व संपत्तीच्या लोभापायी गेले हे जर खरे मानले तर, महाराजांची मते, धोरणे पूर्णपणे जाणत असतांना ते परत महाराजांकडे येण्याचे धाडस कधीच करु शकले नसते.आणि महाराजांनीही एका देश द्रोह्याला इतक्या सहजपणे स्विकारले नसते. धर्मपीठाला अनेक उदाहरणे देऊन आपले मुद्दे पटवून हिंदुधर्मात पतत घेतले नसते.नेताजींचा दर्जा महाराजांच्या खालोखाल होता.गनिम त्यांना प्रतिशिवाजी म्हणून वचकून होता,असे असतां नेताजी निघून गनिमाला मिळाले हे पचनी पडत नाही.अकरा वर्षे बादशहाच्या अधिन काढल्यावर,त्याचा बर्यापैकी विश्वास संपादन झाल्यावर,सर्व मानमरातब,राहण्यास हवेली,भरपूर संपत्ती मिळाली असतां संधी मिळतांच ते स्वराज्यात परत आले.आणि महाराजांनीही त्यांना शुध्द करुन हिंदु धर्मात घेतले शिवाय आपले सोयरेही केले.याचा अर्थ दोघांमधे नक्कीच कांही राजकीय डावपेच झाले होते हे उघड आहे.
नेताजी जर खरेच देशद्रोही,स्वराज्याचे शत्रू असते तर,नेताजींविषयी औरंगजेबचा बसलेला विश्वास,एवढ्या मोठ्या मोगल राज सत्तेचा पाठींबा,द्रव्यभांडार व स्वतःचे पराक्रमी कर्तुत्व असतांना,स्वराज्याची इतंभूत माहीती व गुपिते जाणत असतांना ते महाराजांना बरीच पीडा देऊ शकले असते.पण त्यांची दृढ निष्ठा भक्ती असल्यामुळेच ते महाराजांकडे परतले आणि महाराजांनीही त्यांना इस्लामी डागातून मुक्त करुन हिंदु करुन घेतले.
नेताजी पालकरांची समाधी नांदेड जिल्ह्या हदगाव तालुक्यातील तामसी नदी किनार्यावर तामसा गांवी आहे.अनेक ऐतिहासिक स्थळांप्रमाणे नेताजींची समाधी आजही दुर्लक्षित आहे.असे हे नेताजी शिवरायां च्या इशार्यासरशी संसारावर,सुखावर निखारा ठेवून सर्वस्वाची कुरवंडी करणार्या त्यांच्या या त्यागामुळेच आज आम्ही ताठ मानेने जगत आहोत.
मिनाक्षी देशमुख.
१८-२-२२२.
क्रमशः
========================
!!! नेताजी पालकर !!!
भाग - १.
संधी मिळताच नेताजी पालकर बादशहा च्या तावडीतून निसटून शिवाजी महाराजांच्या पायाशी आले.महाराजांनी त्यांना परत हिंदुत्व बहाल केले.इतकेच नव्हे तर त्याच्या मनातील किंतू जावा म्हणून सोयरीकही केली.त्यांना बरेच दिवस महाराजांनी निगराणीत ठेवले. सतत अकरा वर्षे आलमगीरच्या शिकंज्यात अगदी एकाकी होते.ते तर स्वराज्यात आले पण त्यांचा कुटुंबकबिला? आलमगीरच्या ताब्यात असल्याने त्यांचे काय होईल हे उमगुन होते.त्यांना मुद्दाम स्वराज्याच्या गाभ्यात चिपुळणच्या छावणीत ठेवले. जुने जाणते व पूर्वी तैनातीत असलेली ,विश्वासू चाकरमाणसे त्यांच्या बरोबर ठेवली.तसेच त्यांच्या बरोबर मोगल छावणीत असलेले सिद्दी आफताब आणि नर्दुल्लाखान पठाण त्यांच्या दिमतीस दिले.जबाबदार आसामी म्हणून हिरोजी फर्जंदास त्यांच्या सोबत ठेवले.दर ८-१० दिवसांनी त्यांचे वर्तमान कळविण्याची जबाबदारी मोरोपंतावर सोपवली. चिपुळणच्या छावणीत चांगले स्थिरावल्यावर,रुळल्यावर महाराजांच्या आज्ञेनुसार विशाळगड ते थेट फोंड्यापर्यंतच्या गडकोटांना भेटी देऊन तिथल्या शिबंदीची,बंदोबस्ताची पाहणी केली. त्यानिमित्याने मानकरी भेटत, कुणी एखाद्या समस्येवर त्यांचा मनसुबा विचारुन जात.हे सर्व बघून वाटले की,नेताजी आतां लवकरच मूळ पदावर येतील.
एक दिवस सकाळची आन्हिके आटोपून शिवमंदिरात निघाले असतां, प्रताप गडावरुन चौखूर घोडा दवडत हरकारा समोर आला. पायउतार होऊन कसाबसा मुजरा घातला व फुलल्या श्वासाने म्हणाला, सरकार घात झाला... नेताजींनी मंदिरात जाण्याचा बेत रद्द करुन, छावणीच्या सदरेवर आले व मुख्य व्यक्तींना बोलाववुन घेतले. मोरोपंतांनी दिलेली तातडीची थैली त्यांच्या हाती दिली. नेताजींनी कागद वाचला... हे काय केले बाळराजे? संभाजीराजे दुर्गाबाईसह माहुलीघाटावरुन निसटून दिलेरखानास जाऊन मिळाले. आणि पत्र वाचत असतांनाच ते धाडकण कोसळले. कांही वेळाने शुध्दीवर आल्यावर त्यांनी भराभर हुकुम सोडले. छावणीच्या चौकी पहार्याचा कडक बंदोबस्त केला. आणि दोन मावळ्यांच्या आधाराने आपल्या कमर्यात आले. दोन तीन तासांनी थोडे सावरल्यावर चिटणीसांना बोलावून महाराजांसाठी खलिता लिहायला सांगीतला.त्यांत त्यांनी महाराजांना विनंती करत म्हणाले,युवराज चुकले असले तरी त्यांचा अपराध पोटात घालून त्यांना हर प्रकारे परत आणावे.आम्ही गनिमाहाती काय काय भोगले ते कळवावे.बादशहा भयंकर दगाबाज!दिलेरखान त्याचाच खादिम, त्याला वचनाची काय मातबरी? आमचा व आपला राग तो युवराजवर काढल्याशिवाय राहणार नाही.लेकरुं हकनाक हातचे जायचे. खलिता रवाना झाला.
संध्याकाळी हिरोजी मुजर्यास आल्या वर दोघेही बोलत बसले. हिरोजीचा संताप होत होता व काळजीही वाटत होती.अखेर नेताजींनीच त्याला सावरले.म्हणाले,आम्हाला आठवते, मिर्झाराजेकडे त्यांना ओलीस ठेवले होते त्यावेळी ते केवळ नऊ वर्षाचे होते.त्यांच्या हिफाजतीचा जिम्मा महाराजांनी आमच्यावर टाकला होता.त्यांच्या उशासी बसून रात्री जागवल्या.सुरुवातीला थोडे बिचकले,पण लवकरच त्यांनी आपल्या मराठी बाण्याने मिर्झाराजेंना जिंकले.याच दिलेरखानचे गर्विष्ठ तोंड बंद केले होते.शिवाजीराजे तीन वेळा बादशहाच्या हातावर तुरी देऊन निसटले.प्रथम आग्र्यातून,मग मथुरेतून आणि शेवटी ओरंबादे हून, आतां बाळराजेला तो सोडेल का?महाराजांनी कसेही करुन त्यांना परत आणायलाच हवे.
कांही दिवसांनी बातमी आली.युवराज संभाजीराजे परत आले.प्रश्न पुन्हा तोच निर्माण होतो.शिवाजीराजेंचा छावा खरच रागावून दिलेरखानकडे गेला की यातही बापलेकाचे कांही राजकारण होते.संभाजीराजे जर कमकुवत असते तर,बादशहाने केलेला एवढा क्रूर अत्याचार ते सहन करुच शकले नसते. युवराज परत आले. महाराजांनी त्यांचेवर कोल्हापूर व कोकणचा सुभा सोपवला.पण रायगडी नेले नाही. येसूबाई श्रुंगारपुरीच राहिल्या.अशा वार्ता छावणीत येत होत्या. ज्याचा अर्थ नेताजींना लागत नव्हता.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १८-२-२०२२.
========================
!!! नेताजी पालकर !!!
भाग - २.
कांही दिवसांनी बातमी आली,महाराज रायगडी आजारी असून गडाचा राबता बंद झाला.सोयराबाईनी अन्नाजी दत्तोजीना हाताशी धरुन गडावर चौक्या पहारे बसवल्या. मोरोपंत पेशवे आणि सरनोबत हंबीररावांना मोहिमेच्या निमित्याने दूर ठेवले.संभाजीराजेस पन्हाळगड सोडण्यास मनाई केली.
नेताजींनी महाराजांच्या दर्शनासाठी अनुमती मागण्यासाठी माणूस पाडवला पण त्याला पाचाडाहून परतावे लागले.नेताजींना ह्या घडणार्या घटनांचा अर्थच लागत नव्हता. हुकुम नसल्यामुळे पन्हाळगडावर असलेल्या संभाजीराजेंची भेट घेणेही शक्य नव्हते.आणि एक दिवस विजेचा लोळ कोसळावा अशी बातमी आली.छत्रपती शिवाजीराजेंना देवाज्ञा झाली.विशेष म्हणजे संभाजीराजे शिवाय त्याना भडाग्नी देऊन अग्निदाह संस्कार उरकवला.प्रधानमंडळींच्या घरावर चौक्या पहारे बसवले.आणि नेताजींच्या छावणीत सोयराबाईंची असलेल्या माणसांना नेताजींवर नजर ठेवण्याची कामगिरी सोपवली.रामराजेंचे मंचकारोहन करवून,रायगडावरुन फौजा युवराजांना जेरबंद करण्यास पन्हाळगडाच्या दिशेने निघाल्या.परंतु सरनोबत हंबीरराव मोहित्यांनी जलद व आवश्यक ती हालचाल करुन हा कट मोडून काढला.युवराज रायगडी आले.महाराजांच्या निर्वाणानंतर नेतांजींना कांहीही न कळवता,अचानक निघून गेलेले हिरोजी युवराजांच्या हाती जेर झाल्याची बातमी आली.नेताजी फारच कष्टी झाले. हिरोजीच्या गैरहजेरीत माल्होजी घोरपड्यांचा पुत्र संताजी नेताजींची देखभाल करु लागला.
महाराजांचा काळ झाला आणि नेताजी जो खचले ते परत उभारी धरलीच नाही.दिवसेंदिवस विमनस्कपणे शून्यात बघत राहत.कधी कधी दचकुन जागे होऊन बायका मुलांचे नावाने हाका मारत.ते दणकट दिसत असले तरी पूर्वीची तडफ,धमक,धडाडी नव्हती घोड्यावरची मांड व हत्यारावरची पकड ढीली झाली होती.महाराजांच्या हयातीत त्यांनी चिपुळणच्या छावणीत आल्यावर छोट्या मोठ्या ४-२ लढाया केल्या,पण त्यात पूर्वीचा जोश नव्हता.छावणीत सारे त्यांना खूप जपत असे.पण त्यांचा एकटेपणा वाढतच गेला. आफताब शिवाय सगळे हुजरे आणि सेवक दूर केले.रात्रीची झोप जवळ जवळ नाहीशी झाली
असेच बिछाण्यावर निद्रेची आराधना करीत असतांना, त्यांच्या नजरे समोर सारा भूतकाळ अगदी बालपणापासूनच्या घटना साकार झाल्या.आजुबाजुचे त्यांना भान
त्यांना राहिले नाही.या काळ्याकुट्ट अंधारा सारखा त्यांचा भूतकाळही भयानक होता. आणि नेताजींचे मन त्या अंधार्या भूतकाळा च्या अंधार्या जंगलांत घुसलं अगदी खोलवर.. एक तेजस्वी तारा कोकण परिसरात घडत होता.धावरी छोटस गांव.गावातील लोक खाऊन पिऊन सुखी होते.अधून मधून यवनांच्या फौजा येऊन गावाला ओरबाडत. तेवढाच त्रास!बाकी पालकर पाटील देशमुख गाव नीट चालवण्यास समर्थ होते.
परंतु सध्या एक मोठ्या समस्येने गावाला घेरले होते.एक अट्टल दरोडेखोर आसपासच्या गावात दरोडे घालू लागला शिवाय स्रीयांवर हातही टाकत होता.ताकदवार एवढा होता की,एका थापडीत घोड्याला लोळवत होता.क्रौर्याची तर परिसीमाच नव्हती. माणसाला कच्चा तेही चवीचवीने खाण्या इतका क्रूर होता.तो वाघाच्या कातड्याचे कपडे घालायचा म्हणून वाघ...नांव होते व्यंकोजी म्हणून तो व्यंकोजी नावाने ओळखल्या जाई. त्याच्या विरोधात ब्र काढायची कोणाची हिम्मत नव्हती, पण आज एक आवाज उठला....
पालकर पाटलांचा पुतण्या नेतोजी... नुकतेच तारुण्यात पदार्पन झालेला नेतोजी डोंगरात वास्तव्यास असलेल्या तुसडेबाबाकडे तलवारबाजी शिकला.नेताजी घोडसवारीत इतके तरबेज होते की, धावत्या घोड्यावर ताठ उभा राहायचा.त्या दिवशी पालकर पाटील कामानिमित्य मुळगावला गेले होते.आज या गावी दरोडा पडणार असल्याची बातमी मिळाल्याने गावचा कुळकर्णी धास्तावला. ही गोष्ट नेताजींना कळल्यावर त्यांनी आपल्या तरुण मित्रासह गस्त घालण्याचे ठरवले.पण नेताजींना दुसरेच कांही करायचे ठरवले.
गावात गस्त सुरु झाली असतां दुपारीच नेताजी आपल्या टोळीसह गायब झाले ते संध्याकाळीच उगवले.हा क्रम बरेच दिवस सुरु होता.आणि एक दिवस दवंडी पिटवण्यात आली,व्यंकोजी वाघासंबधी बोलण्यासाठी पाटलांच्या वाड्यासमोरच्या पारावर सार्या गावकर्यांनी जमावे. व्यंकोजी वाघापासून जीव सर्वांनाच वाचवायचा असल्याने सारे उपस्थित राहीले. वाड्याच्या समोर असलेल्या पारावर नेताजी उभे राहून म्हणाले! आमची टोळी हत्यारानिशी वाघाच्या शिकारीला जात आहोत.तुम्ही सर्व सावध राहत गस्त चालू ठेवा.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
"=====================
!!! नेताजी पालकर !!!
भाग - ३.
नेताजी गावकर्यांना संबोधित करीत असतांनाच त्यांच्या टोळीने एका अनोळखी तरुणाला पकडून समोर आणले. नेताजी म्हणाले,हा हेर आहे त्या व्यंकोजी वाघाचा. आपल्या गावाची माहिती पोहचवण्याचे काम करतो.दवंडी दिलीच मुळी याला पकडण्या साठी.नेताजींनी त्याला असा ठोसा मारला की तो बेरड धडपडत लोकांच्या गर्दीत पडला. आणि मग लाथाबुक्क्यांचा पाऊस त्याच्यावर पडला.व्यंकोजी वाघाचा छडा लावण्यासाठीच गेल्या ५-६ दिवसांपासून टोळीसह गायब होत होते.या कामी डोंगरावरच्या तुसड्याबाबाची खूप मदत झाली होती.
नेताजींनी एक योजना तयार केली.त्या योजनेर्तंगत त्याच्या ५० जणांच्या टोळीसह डोंगराकडे निघाले.सोबत तुसड्याबाबाही होते. या योजनेची माहिती फक्त निवडक सहकार्यांनाच होती.सारे सशस्र होऊन तुसड्याबाबाच्या मागे न बोलता चालले होते. दोन डोंगर ओलांडल्यावर तुसड्याबाबाने थांबण्याचा इशारा केला.नंतर सारे डोंगरापलि कडे उतरु लागले.खाली दरी आणि दाट झाडी होती.याच दाट झाडीत व्यंकोजी वाघाची गुहा होती.या गुहेतच तो टोळीसह राहत होता.
व्यंकोजी वाघाने स्वप्नातही कल्पना केली नव्हती, एवढ्या दुर्गम भागात येऊन कोणी आपल्यावर हल्ला करायचं धाडस करेल
सगळेजण व्यंकोजीच्या अड्याजवळ पोहचले.
एवढ्यात एका झुडपाआडून व्यंकोजीचा हेर पळतांना दिसल्याबरोबर तुसड्याबाबाने फेकलेला भाला त्याच्या पाठीत घुसल्यामुळे
जीवाच्या आकांताने किंचाळत वेडावाकडा होत खाली कोसळला.आतां वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. सारे वाघाच्या अड्ड्यावर चाल करुन गेले. त्या वेळी व्यंकोजीने गावातील उचलून आणलेल्या एका सुंदर स्रीशी जबरदस्ती करीत असतांनाच बाहेरचा गोंधळ ऐकू आला.तो आपली कुर्हाड फरशी घेऊन गुहेबाहेर निघणार तोच गुहेबाहेर च्या पहारेकर्याची किंकाळी ऐकू आली.समोर रक्ताळलेली तलवार हाती असलेले नेताजी दिसले.वाघाने डरकाळत विचारले, तू कोण आहेस? नेताजी त्या तरुणीला म्हणाला, ताई तुम्ही लवकर इथून निघून जा.व्यंकोजी वाघ म्हणाला,इथे येऊन तू फार मोठी चुक केलीस. गुहेभोवती माझी सारी माणसे पसरली आहेत. क्षणभरासाठी नेताजींचे चित्त विचलित झाले. तीच संधी साधून त्याने नेताजीवर कुर्हाडीचा घाव घालणार तेवढ्यात तुसड्या बाबाने त्याची कुर्हाड आपल्या तलवारीवर झेलली.नेताजीला तेवढा अवधी पुरेसा होता.ते वाघाशी भिडले.दोघांत द्वंदयुध्द सुरु झाले. मृत्युच्या टोकावर दोघांची झुंज सुरु होती. कसाईवृत्तीच्या कसलेल्या वाघाशी झुंजतांना नवख्या नेताजींचे शौर्य कसाला लागले होते. हळुहळु नेताजीचा जोर कमी होऊ लागला. पायही लटपटु लागले. व मागे सरकत असतांना तोल जाऊन धडपडले,मौका साधून वाघाने तलवारीचा घाव नेताजीवर घालणार तोच नेताजीच्या हाताला लागलेला मोठा दगड वाघाच्या तोंडावर फेकून मारला.दगड त्याच्या नाकावर बसल्यामुळे तो गुरासारखा ओरडला. पाठोपाठ नेताजीने त्याच्या कमरेखाली मर्म स्थळावर जोरदार लाथ मारली.वेदनेने कळवळत वाघ मागे पडल्याबरोबर नेताजींनी तलवार त्याच्या छातीत खुपसली वाघ आटोपला. रक्ताने माखलेले वाघाचे धूड नेताजींच्या सेनेने उचलून गावाकडे निघाले.ही सर्व मंडळी पोहचण्याआधीच गावांत ही विजयी वार्ता पोहोचली होती.त्यामुळे गावकरी वांजत्री व घोडा घेऊन तिथे पोहोचले.या सत्काराने नेताजींचा उर भरुन आला.गर्दी पासून दूर उभ्या असलेल्या तुसडयाबाबाना नमस्कार केला. नेताजींची मिरवणूक मोठ्या झोकात पुढे जात होती.आणि तुसड्याबाबाने समाधानाने आपले आनंदाश्रू पुसले.
नेताजींबद्दल पुढे जाण्याआधी त्यांच्या घराण्याचा इतिहास जाणणे आवश्यक आहे.
परसोजी हे पालीचे पाटील.त्यांना धोंडोजी व कोंडोजी ही दोन पुत्र.थोरला धोंडोजी मोठा कर्तबगार!शहाजीराजे भोसल्यांशी हे घराणे जोडले गेले ते धोंडोजीच्या काळातच! पालकर पाटलांच घराणं मोठं व्हायला शहाजीराजेंचा पाठींबा कारणीभूत होता.पण शहाजीराजेंच्या राजकारणामुळे पुण्यातील त्यांच्या वाड्याची राखरांगोळी झाली त्यावेळी पालकर पाटलालाही फटका बसला होता.पुढे शहाजी राजे निजामाकडे गेले त्याचवेळी चौक गावाचा कारभार पालकरांकडे आल्याने पुनः भरभराट झाली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १९-२-२०२२.
======================
!!! नेताजी पालकर !!!
भाग - ४.
याच धोंडोजी पालकरांचा पुत्र नेतोजी! पुढे मुगलशहा व आदिलशहा एक होऊन निजामशाही बुडवली.कल्याणजवळच्या माहुली किल्ल्याचा आश्रय घेऊन शहाजीराजें नी शेवटची लढाई केली होती.शेवटी तह होऊन राजेंची रवानगी कर्नाटकात झाली.याच काळात धोंडोजीचा मृत्यु झाला.त्यावेळी नेतोजी खूप लहान होते.या लहान वयात ते मावसबहिणीच्या लग्नाला गेले असतां नेतोजींची लहान बहिण पतीच्या घरी जाण्या ऐवजी लगीनघरासकट जळलेली पहावी लागली.त्याचं झालं अस...
वाजंत्रीच्या गजरात मावसबहिणीचा नवरा वधूच्या घराजवळ आला त्याचवेळी काही हशम घोड्यावरुन आले आणि कोणाला कांही कळायच्या आत कणसे कापतात तसे नवरदेवाचे मुंडके उडवले.सारं लग्नघर उधळलं गेलं.सजलेल्या नवरीला आंत नेऊन वाड्याचं दार बंद करण्यात आलं.बंद दरवाजा उघडण्या साठी धडका मारु लागले.दरवाजा उघडत नाहीसे पाहून हशमांनी पूर्ण वाडाच पेटवून दिला,मिळेल ते लुटून हशम निघून गेले.जिथं नंदनवन फुलणार होतं तिथे स्मशान झालं.हे सर्व बाजूच्या घरी असलेले नेतोजी पाहत होते. पित्याच्या मृत्युनंतर त्यांचेवर या घटनेचा चांगलाच घाव बसला.
व्यंकोजी वाघाच्या शिकारीची माहिती आजुबाजुच्या सर्व गावात पसरली.झुंडीझुंडीने लोकं चौकगावी आले.नेतोजी सर्वांचे नायक बनले. गावाला नेतोजींचा अभिमान वाटूं लागला पण नेतोजींना या सार्यात कांही रस नव्हता.नेहमीप्रमाणे ते एकटेच डोंगराकडे तुसड्याबाबांना भेटायला गेले.व्यंकोजी वाघाने भोसल्याचा माणूस म्हणून तुसड्याबाबाचा उल्लेख केला होता,त्याबद्दल जाणण्याची उत्सुकता होती.शहाजीराजेंचे पुत्र शिवाजीराजें शी पालकर घराण्यातील कन्या पुतळाबाईशी विवाह झाला होता.सध्या शिवाजीराजेंनी मावळांत बंडाई माजवल्याच्या बातम्या येत होत्या.नेतोजींना हे सारे जाणण्यासाठी तुसड्याबाबाकडून माहिती मिळेल या आशेने डोंगरापलिकडे असलेल्या त्याच्या झोपडी जवळ येऊन बाबाऽऽ अशी हाळी दिली पण उत्तर न आल्याने त्यांनी झोपडीत प्रवेश केला. तिथे तुसड्याबाबा सार्या सामानासहित गायब होते.ते असण्याची कोणतीही खूण अस्तित्वात नव्हती.निराश मनाने नेतोजी मागे फिरले तोच झोपडीसमोरच्या मोठ्या धोंड्याकडे लक्ष गेले. त्यावर लिहिले होते ओळख झालीच आहे. पुन्हा भेटू! नेतोजी हताशपणे गावाकडे परतले.
निजामशाही संपल्यावर शहाजीराजेंना महाराष्र्टापासून दूर राहण्याच्या अटीवर आदिलशहाने त्यांना आपल्या चाकरीत घेतले.
आपण महाराष्र्टात जाऊ शकत नाही निदान आपला मुलगा तरी सह्याद्रीच्या सानिध्यात असावा या हेतूने आठ वर्षाचे शिवाजीराजेंना मातोश्री जिजाबाईसोबत पुण्याच्या जहागिरीत कोंढाण्याचे सरकारी सुभेदार दादोजी कोंडदेव जे शिवाजीराजेंचे मार्गदर्शक बनले होते त्यांचे बरोबर पाठविले. जिजाबाई जहागिरीचा कारभार शिवाजीराजेंच्या नांवे पाहू लागल्या.
जिजाऊमाता व दादोजी कोंडदेवांनी लहानग्या शिवाजीरेजेंच्या हस्ते स्मशानवत झालेल्या पुण्याच्या भूमीत सुवर्णजडीत नांगर चालवला.लोकांनी श्रीमंती चोचले म्हणून दुर्लक्ष केले.शिवाजीराजेंचे पुण्यात येण्यामागे ॅफार मोठे कारण होते.आणि सोन्याचा नांगर चालवण्यालाही फार मोठा अर्थ होता.कारण होते स्वराज्यनिर्मिती!या विशाल महान हिंदु भूमीवर त्यावेळी एकही हिंदुराजा स्वतंत्र नव्हता.सर्वीकडे यवन व तुर्कांचे राज्य होते. शहाजीराजे,जिजाऊमाता आणि दादोजी यांची स्वाभिमानी अंतःकरणे शिवबाकडून स्वराज्य निर्मितीची अपेक्षा करीत होते. हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा! या इच्छेपायीच सोन्याचा नांगर वापरला होता.
कांही वर्षापूर्वी शहाजीराजेंनी स्वातंत्र्या चा पहिला प्रयत्न करुन कोणत्याही शाहीची नोकरी न करतां पुणे जहागिरी त्यांनी स्वतंत्र केली होती.शहाजीराजे पुण्यात नाही ही संधी साधून आदिलशहाच्या रायाराव नावाच्या सरदाराने पुण्याच्या पुण्यभूमीवर चक्क गाढवाचा नांगर फिरवून पुण्याची राखरांगोळी केली होती. आदिलशहाच्या दहशतीमुळे पुणं उजाड झालं होत.शिवाजीराजेंनी शेतकरी कामकर्यांना पुण्यास येऊन राहण्याचे आव्हान केले होते. पारतंत्र्याची खोलवर रुतलेली पहार सोन्याच्या संपन्न, श्रीमंत नांगराने उकरुन काढून स्वराज्याचे तोरण बांधले होते. मुरुंबादेवीचा डोंगर ताब्यात घेऊन त्यावर रायगडाचे बांधकाम सुरु केले होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १९-२-२०२२.
======================
!!! नेताजी पालकर !!!
भाग - ५.
पाठोपाठ मावळा प्रदेश ताब्यात घेतला. नंतर शिरवळच्या भुईकोट, किल्ले सुभान मंगळात राहणार्या आदिलशाहा अमिन म्हणजे रहीम महमंदकडे जाणार्या मावळच्या देशमुख देशपांडेचा महसूल स्वराज्याकडे वळवला तेव्हा सर्वजण खडबडून जागे झाले.
" जय जय रघुवीर समर्थ " एका साधुचा दणदणीत आवाज ऐकून पालकर वाड्यातील स्री सुपात धान्य घेऊन आलेली बघून तो दिव्य पुरुष म्हणाला, माई, आम्ही भिक्षेसाठी आलो नाही.आज आम्ही नेतोजी नावाच्या हनुमंताचे दर्शन घेण्याच्या हेतूने आलोय! बाजूलाच घोड्याचा खरारा करीत असलेल्या नेतोजींनी ऐकले आणि समोर येऊन भक्तीभावाने त्या स्वामींना दंडवत घातला.आयुष्यमान भव!
खूप पराक्रम करुन अवघा हलकल्लोळ करा. त्या राक्षसासारख्या व्यंकोजी वाघाला तुम्ही संपवले म्हणून कौतुक करायला आलो आणि देवधर्माचं कार्य पण करायचे आहे तेव्हा सर्व गावकर्यांना पारावर जमा व्हायला सांगा. महाराज आपण? आम्ही रामाचे दास,दहाही दिशेने मुक्तपणे हिंडतो म्हणून आम्ही रामदास.
रामदास स्वामी?गावोगावी मारोतीची मंदिरे आणि व्यायामशाळा स्थापन करणार्या साधु पुरुषाबद्दल नेतोजीने ऐकले होते,आज प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला.गदगदलेल्या नेतोजींनी त्यांच्या पायावर लोटांगण घातले.
रामदासस्वामी आल्याची वार्ता वार्या सारखी गावभर पसरली.थोड्याच वेळात गावकरी पारावर जमा झाले.स्वामींनी झोळीतून मारोतीची मूर्ती काढून मनोभावे पुजा केली.आपल्या बरोबर सर्वांना मारोती स्तोस्र म्हणायला लावले.ऐकता ऐकता नेतोजीं च्या अंतःकरणात बलभीम साकार होऊ लागला.बघता बघता रामदासांनी कथेला कधी सुरुवात केली कोणाला कळलेही नाही. देवी देवतांचे वर्णन करुन ते मुख्य मुद्यावर आले... मंडळी, ही आपली पवित्र भूभी सध्या म्लेच्छांच्या अधिन आहे.आणि म्लेच्छ करीत असलेले अन्याय अत्याचाराचे केलेले वर्णन ऐकून नेतोजींच्या नजरेसमोर लग्नाच्यावेळी वधूवेशात जळलेली बहिण आली.जवळपास सर्वांच्याच बाबतीत अशाच प्रकारच्या घटना घडलेल्या होत्या.नेतोजींचे अंतःकरण पेटून उठू लागले.
स्वामी म्हणाले, आपला शिवबाराजा स्वराज्य स्थापतो आहे.आपला हा गाव सुध्दा स्वराज्यात सामील व्हायला नको का? सारे एका सुरात होय म्हणाले.संतुष्ट होऊन स्वामी म्हणाले, गनिमाला निपटून काढण्यासाठी आधी शरीर वज्रासारखे व्हायला हवे.नेतोजींचे उदाहरण तुमच्या समोर आहे.
रामदास स्वामींनी लोकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत चेतवली होती.सारे त्यांना नमस्कार करुन गेले पण नेतोजी मात्र विचारात मग्ग्न होऊन तिथेच थांबले.थोड्या वेळाने स्वामींचे पाय धरत नेतोजी म्हणाले, स्वामी! हा नेतोजी आजपासून स्वराज्यासाठी समर्पित झाला.तथास्तु!
मग स्वामींनी नेतोजींना काही सुत्रे सांगीतली.नेताजी उदंड राजकारण करा.मंत्र मुग्ध नेताजींनी त्यांना शंका विचारलीच! स्वामीजी,आपण इतक्या स्पष्ट व उघडपणे बोध करत फिरता, तर आपल्या जिवीताला धोका नाही होऊ शकत?संरक्षणाची गरज नाही वाटत? मंद हसत स्वामींनी स्वामींनी कुबडीची मूठ फिरवली आतून धारदार गुप्ती दिसली.कुबडी पुर्ववत करत म्हणाले,
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे,असा भूमंडळी कोण आहे?" तेवढ्यात गोसाव्याच्या वेषात ८-१० तरुण अंधारातून पुढे आले.स्वामी म्हणाले हा अमचा शिष्यवर्ग.आम्हास न्यायला आले. " जयजय रघुवीर समर्थ " म्हणत शिष्या सोबत निघून अंधारांत गडप झाले.या अंधार यात्रींनी अनेकांसवे नेतोजींच्याही अंतरंगात शिवसूर्याचा उदय घडवला.
व्यंकोजी वाघाला ठार मारल्यावर, रामदास स्वामींना भेटलेले नेतोजी तीन आठवड्यातच पुण्यांत शिवाजीराजेंच्या वाड्या वर हजर झाले.समोर राजे आणि आईसाहेब बसलेले होते.दादोजीपंत शामराजपंत,कोंडाजी काका उभे होते.शिवबाराजांची मित्रमंडळीत तान्हाजी,सुर्याजी हे मालुसरे बंधू, तसेच नेताजीला घेऊन आलेले नरसप्रभू देशपांडे उपस्थित होते.नेतोजी सामोरा येताच प्रत्यक्ष राजे आसनावरुन उठून म्हणाले,व्यंकोजी वाघा सारख्या दुष्ट कंसाला मारणार्या वीराचे दर्शनाने आम्हाला अतिशय आनंद झाला. ऐकताच नेतोजी पुलकित होऊन राजेंना मुजरा घातला.शामजीपंतांनी पुढे केलेल्या तबकातील सोन्याचे कडे राजेंनी स्वतः नेतोजींच्या हातात घातले.सर्वांनी गर्जना केली हर हर महादेव?
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २०-२-२२.
======================
!!! नेताजी पालकर !!!
भाग - ६.
भारावलेल्या नेताजींनी राजेंचे पाय धरल्यावर, राजे त्यांना उठवत म्हणाले, छे! काका, आपण आमच्यापेक्षा मोठे.पाय नाही धरायचे.स्वराज्याची रीत म्हणून मुजरा स्विकारु. नेताजींच्या नात्यात असलेल्या पुतळाबाईंच्या लग्नात नेतोजी राजेंना भेटले होते.पण ईश्वरी गाठ आतां मारल्या जात होती. नेतोजी आईसाहेब,पंत आणि कोडोजींच्याही पाया पडले.
कामगिरीवर रुजु होण्यासाठी नेतोजींनी पुढच्या एकादशी पर्यंतचा अवधी मागीतल्या वर कोडोंजी चकित झाले, कारण राजेंकडे येण्यास उत्सुक नेतोजीने ऐनवेळी मुदत कां मागतोय?
खरतर रामदास स्वामींची भेट झाल्यापासूनच नेतोजींच्या डोक्यात योजना सुरु होती. स्वराज्यकार्यात जायचे तर,कमीत कमी ५०-६० शिलेदार तयार करुन सोबत न्यायचे. ते तयारीलाही लागले.शिलेदार म्हटलं की, स्वतःचा घोडा आणि हत्यार हवच! स्वतःचे हत्यार आणि घोडा असलेले दहा वीर निघाले. बाकीचे गरीब असल्यामुळे नेतोजींच्या पराक्रमाचा डंका वाजल्यामुळे आसपासच्या गावांतून मदत मिळाली.हे कार्य पूर्ण होत आले असतांनाच कांही कामानिमित्य कोंडाजी पालीला आले.नेतोजींची कीर्ती ऐकून, ते पुन्हा पालीला आले ते नेतोजीचे कौतुक करत सोबत
होते दादाजी नरसप्रभू गुप्ते.दादाजी हे रोहिडखोरे व वेलखंड खोर्याचे देशपांडे नरसप्रभू गुप्त्यांचे चिरंजीव आणि शिवाजीराजें चे सवंगडी!
नेतोजींचा पराक्रम ऐकून नेतोजींसाठी दादाजीसमवेत पोषाख,घोडा पाठवून राजेंनी भेटीस बोलावले होते.म्हणूनच आनंदाने बहरलेले नेतोजी आपली योजना पूर्णत्वास नेण्याकरितां एकादशीपर्यंतची मुदत मागतली होती.म्हणतां म्हणतां १०० शिलेदार तयार होऊन नेतोजीसवे राजेंकडे रायगडाकडे दौडत निघाले.
तोरणा आणि रायगड जणूं दोघे जुळे भाऊ!।तोरणाच्या तटबंदीच्या दुरुस्तीदरम्यान धनाने भरलेला हंडा सांपडल्यामुळे रायगडाच्या दुरुस्तीत उपयोग झाला. हे बांधकाम पाहण्यासाठी राजे रायगडावर आले होते.राजकारण सुरुच होते.शिरवळचा वसुल अमिनकडे जमा होईनासा झाल्याची तक्रार अमिनने शिवाजीराजेंविरुध्द बादशहाकडे केल्यामुळे,मावळच्या सर्व देशमुना बादशहाची फर्मान आल्यामुळे राजेंना अनुकुल असणारे सारे देशमुख घाबरले.बादशाही वरवंटा घरा दारावरुन फिरला तर?
वयोवृध्द नरसप्रभू देशपांडेचा पुत्र दादाजी राजेंचा सवंगडी! पुढच्या भितीने त्यांनी आपले गुप्ते नांव सार्थक केले ते गुप्त झाले.सर्व देशमुख,देशपांडेना धीराचे पत्रे पाठवून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा!या पत्रांचा बरोबर परिणाम झाला.नरसूबाबा परत आले.पंत ही बातमी वाचवून दाखवत होते त्यावेळी घोडदळाचे सेनापती माणकोजी दहातोंडे होते. राजे म्हणाले,सेनापती आपल्याजवळ सेना असल्याशिवाय लोकांत विश्वास नार्माण होणार नाही.आणि अमिनवरही दहशत बसणार नाही.
घरटी एक प्रमाणे सैन्यभरती व्हायला हवी.
राजे बोलत असतांनाच समोरुन १००-१२५ स्वार रायगडाकडे दौडत येतांना दिसले.राजेंची संरक्षण व्यवस्था चोख असली तरी दहातोंडे काळजीने बालेकिल्ला उतरु लागले.राजेंना समजेना नेमकं काय झाले? माणकोजी परत येऊन म्हणाले,राजे आपली हाक देवाने ऐकली.नेताजी १००-१२५ पोरांना घेऊन येत आहे.राजे स्वतःशीच बोलले,म्हणजे आज एकादशी...नेताजींंना यासाठी मुदत हवी होती तर? राजे माणकोजीला म्हणाले, चला या नवीन देशभक्तांचे स्वागत करु या!रक्षक दलासह दोघेही बालेकिल्ला उतरुं लागले.
एव्हाना नेताजी त्यांच्या नवसेनेसह गडाच्या माचीवर पोहचुन ओळीत उभे राहून राजेंची वाट पाहत होते.राजे दिसल्याबरोबर सर्वांनी नम्रपणे मुजरे केले. नेतांजी यासाठी तुम्हाला मुदत हवी होती?नम्रपणे नेतोजी उत्तरले, होय महाराज!हे वारकरी स्वराज्यपंढरीत आणायचे होते. वाऽऽ नेताजीऽ संघटनकौशल्य हा सेनापतीचा गुण दाखवला. पण आपल्याला या पंढरपूरची वारी करणार्या वारकर्यांच रक्षण करण्यासाठी धारकरी हवेत. हे समजावूनच यांना आणलं ना?महाराज हे वारकरी म्हणजे वार करणारेच आहेत. माणकोजीकडे पाहत राजे म्हणाले, सेनापती ही नवसेना तुमच्या ताब्यात घेऊन चांगले प्रशिक्षित करा.नेताजीकाका तुम्ही आमच्या सवे चला.राजेंसवे उत्साहाने नेताजी निघाले. पारतंत्र्याच्या आंधारावर झेप घेणारी तरुणाई गडावर जमुं लागली....
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २०-२-२२.
======================
!!! नेताजी पालकर !!!
भाग - ८.
वाचावीर,शूरवीर नेताजी स्वराज्य निर्मितीच्या जनजागृतीसाठी पुरंदरच्या घेर्यातील गाव नी गाव पिंजून काढत होते. जनमनात देशभक्तिचं रक्त पेटवण्यासाठी रात्रंदिवस स्वतःचं रक्त आटवत होते.नेताजी आपल्या भाषणात म्हणत, अरेऽ गुलामगिरीतल मिष्टान्न खाण्यापेक्षा,स्वराज्या तील मीठ भाकरी गोड लागेल कारण ती आपल्या स्वतःच्या कष्टाची,हक्काची असेल. अरेऽ आपल्या मायबहिणी पळवून विकल्या जातात,भ्रष्ट केल्या जातात.आपले मंदिर पाडून मशिदी केल्या जातात.आपल्या हक्काच शेत नाही,घरातले देव आपले नाही असलं जीणं काय कामाचं?चला... उठा...असेल त्या हत्यारानिशी शत्रूला संपवण्यासाठी.. नेताजीं च्या भाषणाने तरुण पेटून उठून स्वराज्यवेडे होऊ लागले.आणि फौजेत भरती होण्यासाठी अहमहमिका लागली.
सध्या पुरंदर जरी स्वराज्यात नसला तरी महादजी निळकंठ सरनाईकांच्या ताब्यात होता... "निळकंठ" किताब मिळालेले हे आदिलशाही सरदार फार पूर्वीपासून पुरंदरचे किल्लेदार होते.ही किल्लेदारी शहाजीराजेंमुळे टिकली होती.सहाजिकच त्यांचा कल शिवाजी राजेंकडे होता.म्हणूनच नेताजी पुरंदर परिसरात निश्चिंतपणे फिरुं शकत होते.
एकदा १५-२० स्वारांसह जात असतांना कुणी दोघांनी घोडी पाडण्यासाठी एक जाड दोर आडवा धरला होता.ही गोष्ट नेताजींच्या तीक्ष्ण नजरेतून सुटली नाही. तात्काळ सर्वांना थांबण्याचा इशारा करुन स्वतः संतापाने घोड्यावरुन उडी घेतली.आणि दोघांना दरडावले पण दोघांवर कांही परिणाम झाला नाही. नेताजी त्यांच्यावर झपटणार तोच एकाचे मुंडासे थोडे कलले.नेताजी चकित होऊन ओरडले....तुसड्याबाबा तूऽऽ ? मला ओळखले तसेच माझ्या मित्राला ओळखून ठेव हा हुन्नरबाज बहुरुपी बहिर्जी नाईक!बाबा तूं कुठे गेला होतास?किती शोधले?आपण नंतर बोलू.प्रथम राजेंनी ताबडतोब सर्वांना राजगडा वर बोलावलय!आणि दोघेही अदृष्य झाले. अनेक रुपं,अनेक भाषा बोलणारे हरहुन्नरी माणसं राजे कुठुन जमा करतात याचे आश्चर्य करत नेताजी आपल्या सहकार्यासह राजगडा कडे निघाले.एवढ्या तातडीने महाराजांनी कां बोलावले असेल?
इकडे स्वातंत्र्याचे वारे वाहत असतांनाच
गडावर भयंकर बातमी आली. सदूर दक्षिणेत जिंजिला वेढ्यावर असलेल्या शहाजीराजेंना मदतीला आल्याची बतावणी करुन मुस्ताफा खानने रात्री झोपलेल्या शहाजीराजेंवर माणसे पाठवून हल्ला करवला.दुर्देवाची बाब म्हणजे मुधोळच्या बाजी घोरपडेने आपल्या तीन बंधू खंडोजी,अंबाजी आणि भानाजी सह शहाजी राजेंना मुस्ताफारखानाच्या स्वाधीन केले. वास्तविक शहाराजेंच्या प्रयत्नाने या बाजी घोरपडेचे कल्याण झाले होते,पण उपकार विसरुन सापासारखा उलटला व शहाजीराजेंना पकडून दिले.विशेष म्हणजे घोरपडे आणि भोसले एकाच रक्तरेखेतले.कांही पिढ्यांपूर्वी हे घोरपडे भोसलेच होते पण बहामनी सुलताना चा सेनापती महंमद गावनला विशाळगड म्हणजे खेळणा सर करायचा होता.त्यावेळी खेळणागड शंकरराव मोर्यामुळे महमंद गावनच्या फौजेचे प्रचंड नुकसान झाले.निराश होऊन परत फिरण्याच्या बेतात असतांनाच कर्णसिंह भोसलेने पुढाकार घेऊन घोरपडीच्या सह्याने गड सर केला.यात कर्णसिंह मारल्या गेला.पण त्याचा पुत्र भिमासिंहने मोठा पराक्रम करुन बहामनी सुलताला विजय मिळवून दिला
बहामनीने भिमासिंहाचा सत्कार करुन "घोरपडबहाद्दूर" किताब आणि घोरपड ही खूण व घोरपडीच्या रंगाचे निशाण सन्मान म्हणून दिले.तेव्हापासून भोसले शाखेत घोरपडे झाले.पूर्वी जसे शंकरराव मोरेविरुध्ध सुलताना ला विजय मिळवून दिला तोच कित्ता गिरवत बाजी घोरपडेने शहाजीराजेंना पकडून देऊन आदिलशाहीसाठी मर्दुमकी गाजवली.
त्यातच शिवाजीराजेंचे जेष्ठ बंधू संभाजी राजेंना संपवण्यासाठी फर्रादखान बंगळूवर चालून निघाला तर फत्तेखान शिवाजीराजेवर चाल करायला निघाला.
नवनिर्मित स्वराज्यावर भलतेच संकट कोसळले होते.लढावं तर राजेंचे पिताश्री शहाजीराजे शत्रूच्या ताब्यात आणी ना लढावे तर समाजाच्या कल्याणार्थ मांडलेला डाव मोडावा लागणार! शिवबांसमोर मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला.पुत्रधर्म की राजधर्म?राजगडावर बालेकिल्ल्यावरील देवघरात देवीच्या मूर्ती समोर जिजाऊमाता डोळे मिटून बसल्या होत्या अस्वस्थपणे शिवाजीमहाराज उभे होते.त्याची अवस्था बघून जिजाऊमाता म्हणाल्या,शिवबाऽ रयतेचं रक्षण करण राजाचं प्रथम कर्तव्य आहे. तुमच्या तिर्थरुपांचं रक्षण आमचं पातिव्रत्य करेन. तुम्ही निःशंक मनाने रणांगणी जा.तुमचं हे जीवन रयतेचं आहे.फत्तेखानाला पाणी पाजून रयतेला जीवदान द्या.अमचा आशिर्वाद आणि आई भवानी पाठीशी आहे.यशस्वी व्हा. मातृशक्ती आणि देशभक्तीने प्रेरीत राजे निश्चया ने सदरेकडे निघाले. सदरेवर सारे रणरुद्र राजेंची वाट पाहत होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २१-२-२०२२.
======================
!!! नेताजी पालकर !!!
भाग - ८.
वाचावीर,शूरवीर नेताजी स्वराज्य निर्मितीच्या जनजागृतीसाठी पुरंदरच्या घेर्यातील गाव नी गाव पिंजून काढत होते. जनमनात देशभक्तिचं रक्त पेटवण्यासाठी रात्रंदिवस स्वतःचं रक्त आटवत होते.नेताजी आपल्या भाषणात म्हणत, अरेऽ गुलामगिरीतल मिष्टान्न खाण्यापेक्षा,स्वराज्या तील मीठ भाकरी गोड लागेल कारण ती आपल्या स्वतःच्या कष्टाची,हक्काची असेल. अरेऽ आपल्या मायबहिणी पळवून विकल्या जातात,भ्रष्ट केल्या जातात.आपले मंदिर पाडून मशिदी केल्या जातात.आपल्या हक्काच शेत नाही,घरातले देव आपले नाही असलं जीणं काय कामाचं?चला... उठा...असेल त्या हत्यारानिशी शत्रूला संपवण्यासाठी.. नेताजीं च्या भाषणाने तरुण पेटून उठून स्वराज्यवेडे होऊ लागले.आणि फौजेत भरती होण्यासाठी अहमहमिका लागली.
सध्या पुरंदर जरी स्वराज्यात नसला तरी महादजी निळकंठ सरनाईकांच्या ताब्यात होता... "निळकंठ" किताब मिळालेले हे आदिलशाही सरदार फार पूर्वीपासून पुरंदरचे किल्लेदार होते.ही किल्लेदारी शहाजीराजेंमुळे टिकली होती.सहाजिकच त्यांचा कल शिवाजी राजेंकडे होता.म्हणूनच नेताजी पुरंदर परिसरात निश्चिंतपणे फिरुं शकत होते.
एकदा १५-२० स्वारांसह जात असतांना कुणी दोघांनी घोडी पाडण्यासाठी एक जाड दोर आडवा धरला होता.ही गोष्ट नेताजींच्या तीक्ष्ण नजरेतून सुटली नाही. तात्काळ सर्वांना थांबण्याचा इशारा करुन स्वतः संतापाने घोड्यावरुन उडी घेतली.आणि दोघांना दरडावले पण दोघांवर कांही परिणाम झाला नाही. नेताजी त्यांच्यावर झपटणार तोच एकाचे मुंडासे थोडे कलले.नेताजी चकित होऊन ओरडले....तुसड्याबाबा तूऽऽ ? मला ओळखले तसेच माझ्या मित्राला ओळखून ठेव हा हुन्नरबाज बहुरुपी बहिर्जी नाईक!बाबा तूं कुठे गेला होतास?किती शोधले?आपण नंतर बोलू.प्रथम राजेंनी ताबडतोब सर्वांना राजगडा वर बोलावलय!आणि दोघेही अदृष्य झाले. अनेक रुपं,अनेक भाषा बोलणारे हरहुन्नरी माणसं राजे कुठुन जमा करतात याचे आश्चर्य करत नेताजी आपल्या सहकार्यासह राजगडा कडे निघाले.एवढ्या तातडीने महाराजांनी कां बोलावले असेल?
इकडे स्वातंत्र्याचे वारे वाहत असतांनाच
गडावर भयंकर बातमी आली. सदूर दक्षिणेत जिंजिला वेढ्यावर असलेल्या शहाजीराजेंना मदतीला आल्याची बतावणी करुन मुस्ताफा खानने रात्री झोपलेल्या शहाजीराजेंवर माणसे पाठवून हल्ला करवला.दुर्देवाची बाब म्हणजे मुधोळच्या बाजी घोरपडेने आपल्या तीन बंधू खंडोजी,अंबाजी आणि भानाजी सह शहाजी राजेंना मुस्ताफारखानाच्या स्वाधीन केले. वास्तविक शहाराजेंच्या प्रयत्नाने या बाजी घोरपडेचे कल्याण झाले होते,पण उपकार विसरुन सापासारखा उलटला व शहाजीराजेंना पकडून दिले.विशेष म्हणजे घोरपडे आणि भोसले एकाच रक्तरेखेतले.कांही पिढ्यांपूर्वी हे घोरपडे भोसलेच होते पण बहामनी सुलताना चा सेनापती महंमद गावनला विशाळगड म्हणजे खेळणा सर करायचा होता.त्यावेळी खेळणागड शंकरराव मोर्यामुळे महमंद गावनच्या फौजेचे प्रचंड नुकसान झाले.निराश होऊन परत फिरण्याच्या बेतात असतांनाच कर्णसिंह भोसलेने पुढाकार घेऊन घोरपडीच्या सह्याने गड सर केला.यात कर्णसिंह मारल्या गेला.पण त्याचा पुत्र भिमासिंहने मोठा पराक्रम करुन बहामनी सुलताला विजय मिळवून दिला
बहामनीने भिमासिंहाचा सत्कार करुन "घोरपडबहाद्दूर" किताब आणि घोरपड ही खूण व घोरपडीच्या रंगाचे निशाण सन्मान म्हणून दिले.तेव्हापासून भोसले शाखेत घोरपडे झाले.पूर्वी जसे शंकरराव मोरेविरुध्ध सुलताना ला विजय मिळवून दिला तोच कित्ता गिरवत बाजी घोरपडेने शहाजीराजेंना पकडून देऊन आदिलशाहीसाठी मर्दुमकी गाजवली.
त्यातच शिवाजीराजेंचे जेष्ठ बंधू संभाजी राजेंना संपवण्यासाठी फर्रादखान बंगळूवर चालून निघाला तर फत्तेखान शिवाजीराजेवर चाल करायला निघाला.
नवनिर्मित स्वराज्यावर भलतेच संकट कोसळले होते.लढावं तर राजेंचे पिताश्री शहाजीराजे शत्रूच्या ताब्यात आणी ना लढावे तर समाजाच्या कल्याणार्थ मांडलेला डाव मोडावा लागणार! शिवबांसमोर मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला.पुत्रधर्म की राजधर्म?राजगडावर बालेकिल्ल्यावरील देवघरात देवीच्या मूर्ती समोर जिजाऊमाता डोळे मिटून बसल्या होत्या अस्वस्थपणे शिवाजीमहाराज उभे होते.त्याची अवस्था बघून जिजाऊमाता म्हणाल्या,शिवबाऽ रयतेचं रक्षण करण राजाचं प्रथम कर्तव्य आहे. तुमच्या तिर्थरुपांचं रक्षण आमचं पातिव्रत्य करेन. तुम्ही निःशंक मनाने रणांगणी जा.तुमचं हे जीवन रयतेचं आहे.फत्तेखानाला पाणी पाजून रयतेला जीवदान द्या.अमचा आशिर्वाद आणि आई भवानी पाठीशी आहे.यशस्वी व्हा. मातृशक्ती आणि देशभक्तीने प्रेरीत राजे निश्चया ने सदरेकडे निघाले. सदरेवर सारे रणरुद्र राजेंची वाट पाहत होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २१-२-२०२२.
======================
!!! नेताजी पालकर !!!
भाग - ९.
फत्तेखान जेजुरीजवळ बेलसर येथे छावणी टाकून होता.त्याला स्वराज्याबाहेर रोखणे गरजेचे होते.त्याच्या अमर्याद सैन्या लढतांना बाजी उलटलीच तर पळून येण्या साठी किल्ल्याचा आधार हवा होता.सर्व दृष्टीने विचार केल्यावर पुरंदरच योग्य होता.पण हा गड आदिलशहाच्या ताब्यात होता.जरी किल्लेदार महादजी निळकंठ सरनाईक अनुकुल असले तरी निकराच्या लढाईत ते आदिलशहाशी शत्रुत्व पत्करुन स्वामीद्रोह, गद्दारी करेल कां ही शंका होती.अखेर शिवाजी राजेनी पत्र लिहून गडावर येण्याची अनुमती मागीतली पण उद्देश मात्र लिहिला नाही.तोंडी विशद करण्यासाठी वाचावीर सर्वगुणयुक्त, पुरंदरचा पुरता जाणकार नेताजी पालकरला निवडले.नेताजी आपल्या तुकडीसह रवाना झाले.कामगिरी फत्ते झाल्याचा निरोप मिळताच राजे दोन हजार स्वारांसह गडावर आले.स्वतः किल्लेदार महादजी निळकठ नेताजींसह सुहास्य वदनाने गडाच्या दरवाज्या वर राजेंना गडाच्या आंत घेण्यास उभे होते.
बेलसरच्या छावणीत फत्तेखानाच्या दिमतीला बरेच मराठी सरदार होते.मावळच्या देशमुखाला फत्तेखानाला मदत करण्याचे फर्मान आले होते.कोंढाणा किल्ला हातचा गेल्याने बादशहा चवताळला होता.कोंढाणा घेण्यास व शिवाजींचा बंदोबस्त करण्यास खानाला पाठविले होते.बाळाजी हैबतरावास शिरवळचा किल्ले सुभानमंगळ घेण्यास पाठविले व त्याला यश मिळाले.शिवाजींची माणसे गड सोडून पळून गेले.बाळाजीने किल्ला ताब्यात घेतला पण मोर्चा जिंकने म्हणजे युध्द जिंकणे नव्हे हे अजून त्याला उमगायचे होते.
पुरंदरवर राजेंचे सारे सवंगडी जमा झाले. बाळाजीच्या शिरवळ विजयाने सर्वांच्या मनाला इंगळ्या डसल्या होत्या.गोदाजी जगताप, बाजी पासलकर,कावजी मल्हार, भिमाजी वाघ,कोंडाजी पालकर(नेताजींचे काका) बाजी जेधे,नेताजी पालकर सारे वीर इरेला पेटून राजेंना आज्ञा मागत होते.महाराजां नी शिरवळवर कोसळण्यासाठी नेताजी सोडून सर्वांना योग्य सुचना देऊन कावजीच्या नेतृत्वा खाली रवाना केले.हर हर महादेवाच्या गर्जनेत सारे वीर निघाले.नेतांजींना वाटले महाराज आपले नांव विसरले असतील म्हणून तेही निघाले, तेव्हा राजे म्हणाले,तुम्ही कुठं निघालात?आमच्यासवे पुरंदरवर थांबा! नेताजींच्या उत्साहावर पाणी पडले.महाराजां ची अवाज्ञा करुं शकत नव्हते.राजे म्हणाले, या हल्ल्याने फत्तेखान खवळेल आणि पूर्ण ताकदी ने आपल्यावर चालून येईल त्यासाठी हा पुरंदर झुंजता असायला हवा.खानाची फौज गड चढता चढताच गारद व्हायला हवी.तयारीला लागा.नेताजी मोठ्या उत्साहाने आपल्या सेनेला तट बुरजावर दगडं धोंडे जमा करायला सांगीतले.स्वतः मोजक्या लोकांसह गडाच्या पायथ्याशी उतरुन शेतकर्यांची तरणी पोरं तोफनगुंडाळ्यासह गोळा करुन गडावर आणली.वाटेवर मोठमोठे धोंडे आणून ठेवले. चमड्याच्या वाद्या व लाकडी फळकुटांच्या सहाय्याने तराफा बांधण्याचे काम सुरुं केले. गडावरचे गोलंदाजही तोफांची दुरुस्ती करुं लागले.आतां सर्व लक्ष कावजीकडे होते.
पहिल्यांदाच स्वराज्यसेना युध्दासाठी बाहेर पडत होती.स्वराज्यसेनेने शिरवळच्या सुभानमंगळावल जोरदार हल्ला करुन खाशा बाळाजी हैबतरावास ठार केल्याची आनंदी बातमी आली.आणि त्याचे उरलेले सैन्य शरण आले.फत्तेखानची हार झाली.बातमी ऐकताच महाराजांना अतिशय आनंद झाला.सर्वजण विजयीवीरांची अन् चवतळलेल्या फत्तेखानची वाट पाहू लागले.फत्तेखानाची कांहीच हालचाल दिसत नसल्याने स्वराज्याची टोळधाड फत्तेखानची छावणी झोपेत असतांना च छावणीची नासधूस करुन,प्रतिहल्ल्यासाठी खानाची फौज येताच मावळी फौज माघारी वळली.पण माघार घेतेवेळी नेमकी झेंड्याची तुकडी शत्रूने घेरली.झेंडा असलेल्या वीरांवर शत्रू तुटुन पडली.झेंडा पडणार तोच बाजी जेध्यांनी जीव धोक्यात घालून पराक्रमाची शर्थ
केली.झेंडा वाचवल्यामुळे बाजीराव जेध्याचे कौतुक करुन महाराजांनी बाजीला 'सर्जेराव" किताब बहाल केला.पुरंदरवर योजनेप्रमाणे सर्व ठीकठाक चालले होते.फत्तेखानचा निकाल लावून शहाजीराजेंची सुटका करायची होती.
तिकडे फर्रादखान संभाजीराजेंवर चालून गेला.संकटाच्या घेर्यात जिजाऊंच्या आतड्याची तीन माणसे अडकली होती तरी त्या सर्वांना धीर देत होत्या.मातृभक्त शिवबांना ही त्यांचा ताण जाणवला होता.शिवधनुष्य पेलायचं म्हटलं की सारं सहन करणं आलच! ज्या शिवाजीवर आपण हल्ला करायला आलो त्यानेच आपल्यावर हल्ला केला हे बादशहाला कळलं तर?फत्तेखान सर्व ताकदीनिशी पुरंदरकडे निघाला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २१-२-२०२२.
======================
======================
======================
======================
======================

0 Comments